बेळगाव : बागलकोटमध्ये शिवजयंती मिरवणुकीवर समाजकंटकांनी केलेल्या दगडफेकीच्या निषेधार्थ उद्या श्रीराम सेनेने राज्यभर आंदोलनाची हाक दिली आहे. या घटनेत पोलीस अधीक्षकांसह अनेक शिवभक्त जखमी झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. बागलकोट शहरातील पंका मशिदीजवळून शिवजयंतीची मिरवणूक जात असताना काही समाजकंटकांनी अचानक चपला आणि दगडफेक केली. या अनपेक्षित घटनेत …
Read More »खानापुरातील डोंबारी समाजाच्या स्मशानभूमीवर अतिक्रमणाचे राजकारण; संतप्त समाजाचे आंदोलन
खानापूर : खानापूर तालुक्यातील शाहुनगर येथे डोंबारी समाजाच्या हक्काच्या स्मशानभूमीवर स्थानिक बड्या प्रस्थांनी ताबा मिळवल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या अनधिकृत अतिक्रमणाविरोधात आणि प्रशासकीय दिरंगाईविरोधात आज दलित संघर्ष समितीने बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शनं केली. खानापूर येथील सर्व्हे नंबर ९३/ए १ मध्ये गेल्या तीन शतकांपासून डोंबारी समाज आपल्या …
Read More »आर. एल. लॉ कॉलेजच्या आठ विद्यार्थ्यांची दिवाणी न्यायाधीशपदी निवड
बेळगाव : बेळगावमधील नामांकित केएलएस राजा लखमगौडा विधी महाविद्यालयाच्या आठ विद्यार्थ्यांनी कर्नाटक न्यायिक सेवा परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. या विद्यार्थ्यांची दिवाणी न्यायाधीश म्हणून निवड झाली असून, त्यांच्या या कामगिरीमुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. न्यायाधीशपदी निवड झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये मौनेश बडिगेर, नवीन कोपार्डे, हळ्याळप्पा, प्रियांका …
Read More »मराठी केंद्र शाळा मच्छे येथे शिवजयंती उत्साहात साजरी
बेळगाव : मच्छे येथील मराठी केंद्र शाळेत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. उपस्थितांचे स्वागत व पाहुण्यांचा परिचय सहशिक्षक शेळके सर यांनी करून दिला. तर वक्त्यांचा परिचय प्रशांत नांदोडकर यांनी करून दिला. शाळेचे मुख्याध्यापक कडांगळें सर, शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष गजानन छप्रे, तसेच उपाध्यक्ष मोहिनी बाळेकुंद्री व …
Read More »काकतीमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; महिलेसह आठ जणांना चावा
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील काकती गावात एका पिसाळलेल्या कुत्र्याने प्रचंड दहशत माजवली असून शाळेत मुलांना सोडायला गेलेल्या एका महिलेसह सात ते आठ जणांना चावा घेतल्याची घटना घडली आहे. काकती गावातील शास्त्री नगर भागात आज सकाळी पिसाळलेल्या कुत्र्याने नागरिकांवर एकामागून एक हल्ले केले. मुलांना शाळेत सोडायला जाणाऱ्या एका महिलेला कुत्र्याने …
Read More »बेळगाव शहर उपनगरात उद्या, परवा वीजपुरवठा खंडित
बेळगाव : हेस्कॉम दुरुस्तीचे काम हाती घेणार असल्याने शनिवार दि. २१ व रविवार दि. २२ शहर व उपनगरात सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे, अशी माहिती हेस्कॉमने पत्रकाद्वारे दिली आहे. शनिवारी दि. २१ सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत राणी चनम्मा नगर …
Read More »महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे १ मार्चला मराठी भाषा गौरव दिन सोहळा; अभिनेते हेमंत ढोमे यांची प्रमुख उपस्थिती
बेळगाव : मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगाव यांच्या वतीने दिमाखदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जानेवारी महिन्यात पार पडलेल्या सामान्यज्ञान स्पर्धेत बेळगाव आणि सीमाभागातील सुमारे ३,००० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत यशस्वी स्पर्धकांचे बक्षीस वितरण, आदर्श शाळा पुरस्कार वितरण आणि २०२५ …
Read More »बालकवींच्या कवितांनी रंगली काव्यमय संध्या; रसिकांची उत्स्फूर्त दाद
बेळगाव : हिरवे हिरवे गार गालिचे, हरीत तृणांच्या मखमालीचे, आनंदी आनंद गडे ईकडे तिकडे चोहीकडे, गर्द सभोती रान साजणी तू तर चाफेकळी अशा बहारदार कवितानी काव्यसंध्या रंगली. लोकमान्य ग्रंथालय प्रणित बुक लव्हर्स क्लबच्या साप्ताहिक कार्यक्रमात सौ.सुनीता पाटणकर व डॉ. रश्मी फडके यानी बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांच्या कवितांवर आधारित …
Read More »जिल्हा प्रशासनाच्यावतीने शिवजयंती निमित्त आयोजित स्वरांजली सुगम संगीत कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद
बेळगाव : जिल्हा प्रशासन, कन्नड व संस्कृती खाते, जिल्हा पंचायत आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिवाजी उद्यानात गुरूवारी सायंकाळी गायक विनायक मोरे व अक्षता मोरे यांचा “स्वरांजली” सुगम संगीत कार्यक्रम झाला. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन झाले. संस्कृती खात्याच्या अधिकारी विद्यावती बजंत्री …
Read More »मराठी मॉडेल शाळा येळ्ळूर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी
बेळगाव : आज 19 फेब्रुवारी रोजी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यासाठी येळ्ळूर गावातील हिंदवी स्वराज्य युवा संघटना येळ्ळूरचे कार्यकर्ते, एस.डी.एम.सी. अध्यक्षा, उपाध्यक्ष, सदस्य व सदस्या उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षा सौ. दिव्या संदिप कुंडेकर होत्या. पहिल्यांदा मान्यवरांचे पांढरी टोपी व पुष्प देऊन स्वागत व …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta