Monday , September 21 2026
Breaking News

बेळगाव

1 नोव्हेंबर 2024 काळ्या दिनाची पुढील सुनावणी 30 जून रोजी

  बेळगाव : 1 नोव्हेंबर 2024 काळ्या दिनाच्या खटल्याच्या सुनावणीला कार्यकर्त्यांच्या गैरहजेरीमुळे जेएमएफसी द्वितीय न्यायालयाने आजची सुनावणी 30 जून रोजी निश्चित केली आहे. 2024 काळ्या दिनाच्या फेरीत सहभागी झालेल्या समिती नेत्यांसह 40 कार्यकर्त्यांवर पुन्हा दाखल करण्यात आला होता. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती कार्याध्यक्ष मनोहर किनेकर, सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर, खजिनदार प्रकाश …

Read More »

हजारो भाविकांच्या उपस्थितीत महाप्रसादाने निपाणीत महाशिवरात्री सोहळ्याची सांगता

  निपाणी (वार्ता) : येथील महादेव गल्लीतील महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त आठवडाभर विविध धार्मिक कार्यक्रम आणि स्पर्धा झाल्या. त्यातील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.त्यानंतर महाशिवरात्री यात्रा कमिटीचे अध्यक्ष सुनील पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाशिवरात्री सोहळ्याची महाप्रसादाने सांगता करण्यात आली. सुनिल पाटील, शेखर नणदीमठ दांम्पत्य, केएलईचे संचालक अमर बागेवाडी, रविंद्र कोठीवाले, संजय …

Read More »

महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने २०२५ -२६ “आदर्श मराठी शाळा पुरस्कार” जाहीर

  तसेच उल्लेखनिक कामगिरी करणाऱ्या इतर तीन शाळांचा सुद्धा विशेष पुरस्कार देऊन होणार सन्मान बेळगाव : मातृभाषेतून शिक्षण देत वेगवेगळे प्रयोग, उपक्रम आणि दर्जेदार शिक्षणाच्या माध्यमातून आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या बेळगाव आणि खानापूर भागातील मराठी शाळांना त्यांच्या कार्याची दखल घेऊन कै. श्रीनिवास केशवराव म्हापसेकर यांच्या स्मरणार्थ “युवा समिती आदर्श शाळा …

Read More »

बेळगाव येथील मराठा मंडळ फार्मासी कॉलेज येथे आयक्यूएसी अंतर्गत “रिसर्च मेथडॉलॉजी”वर व्याख्यान

  बेळगाव : मराठा मंडळ कॉलेज आँफ फार्मासी येथे आज दि. २१ रोजी सकाळी सदरचे व्याख्यान उत्साहात संपन्न झाले. हा कार्यक्रम महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विष्णू कंग्राळकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी आपल्या मनोगतात संशोधनाची गरज आणि गुणवत्ता वृद्धिंगत करण्यासाठी अशा उपक्रमांचे …

Read More »

येळ्ळूर मराठी मॉडेल शाळेत शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाचा अहवाल प्रकाशन व स्मरणिका वितरण

  बेळगाव : येथील सरकारी मराठी मॉडेल शाळेला 2024 साली 150 वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने शाळेचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव 26 एप्रिल ते 27 एप्रिल 2025 रोजी माननीय श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात संपन्न झाला. या कार्यक्रमाचा अहवाल प्रकाशन तसेच स्मरणिकेचा वितरण कार्यक्रम शाळेत आयोजित करण्यात आला. …

Read More »

रणकुंडये गावच्या हद्दीत गोवा बनावटीची दारू जप्त

  बेळगाव : बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील (बेळगाव तालुका) रणकुंडये गावच्या हद्दीतील रस्त्यावरुन गोवा राज्यातील दारुची वाहतूक करणाऱ्या वाहनावर अबकारी विभागाने धाड टाकून मोठा मद्यसाठा जप्त केला. अबकारी अधिकाऱ्यांनी सीपीआय मंजुनाथ यांच्या नेतृत्वाखालील गोवा राज्यातून दारुची तस्करी केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर कारवाई केली. सुमारे 3 लाख 12 हजार …

Read More »

मक्याच्या शेतात थरारक हत्या; मृतदेहाची विटंबना करून आरोपी फरार

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर तालुक्यातील हिरेनंदीहळ्ळी गावात एकाचा गुप्तांग कापून अत्यंत निर्घृण पद्धतीने खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शनिवारी अज्ञाताचा मृतदेह गावाजवळील मक्याच्या शेतात आढळून आला होता. कलमेश कोटी (वय 50) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, चार दिवसांपूर्वी घडलेला हा खून उशिरा …

Read More »

श्री रामलिंग देवस्थान रामनगरचा वार्षिक जन्मोत्सव व रथ उत्सव उद्या

  बेळगाव : सुपा तालुक्याचे आद्य ग्रामदैवत असलेल्या रामनगर मधील श्री रामलिंग देवस्थान चा वार्षिक जन्मोत्सव सोहळा रविवार दि. 15 ते गुरुवार दि. 26 फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. रविवार दिनांक 15 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीचे औचित्य साधून श्री रामलिंग देवस्थानच्या जन्मोत्सव सोहळ्याला प्रारंभ होणार आहे. या दिवशी महापंचामृताभिषेक व …

Read More »

सुवर्णयश मिळवलेल्या बेळगावच्या हॉकीपटूंचा लेले मैदानावर गौरव

  बेळगाव : दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून बेळगावचे नाव उज्ज्वल करणाऱ्या उदयोन्मुख मुला-मुलींच्या हॉकी संघाचा शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने लेले मैदानावर सत्कार करण्यात आला. यावेळी श्रीराम सेना हिंदुस्तान, मराठा समाज आणि समस्त मराठी भाषिकांच्या वतीने खेळाडूंचा विशेष गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहर महाराष्ट्र एकीकरण …

Read More »

मच्छे येथील संगोळी रायन्ना पुतळ्याचा अवमान नाही : RFSL अहवालातून स्पष्ट

  बेळगाव : मच्छे येथील संगोळी रायन्ना पुतळ्यावर आढळलेल्या चिकट पदार्थाबाबत सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून, प्रादेशिक न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेच्या (RFSL) अहवालात संबंधित नमुन्यांमध्ये वनस्पतीजन्य राळ (प्लांट रेजिन) असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुतळा, त्याच्या आसपासचा रस्ता तसेच जवळील झाडांच्या पानांवरून गोळा करण्यात आलेल्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये आढळलेला …

Read More »