
रामदुर्ग तालुक्यातील घटना
रामदुर्ग : तालुक्यातील हलगट्टी गावाजवळ झालेल्या भीषण रस्ता अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सौंदत्ती आगाराच्या केएसआरटीसी बसला भरधाव वेगातील दुचाकीची जोरदार धडक बसल्याने हा अपघात झाला. या दुर्घटनेत मल्लेश हणमंत लमाणी यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार, हलगट्टी गावाजवळून जात असताना भरधाव वेगातील दुचाकी थेट बसवर आदळली. या धडकेत दुचाकीस्वाराच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेची माहिती मिळताच रामदुर्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी रामदुर्ग सार्वजनिक रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. याप्रकरणी रामदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास सुरू आहे.
Belgaum Varta Belgaum Varta