Thursday , August 27 2026
Breaking News

मराठी घेऊन बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनीसाठी अशीष फाफट शिष्यवृत्तीसाठी अर्जाचे आवाहन

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील विज्ञान शाखेतून एक विषय मराठी घेऊन बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनीकडून अशीष फाफट शिष्यवृत्तीसाठी अर्जाचे आवाहन करण्यात आले आहे. अशीष फाफट हे मूळचे राजस्थानमधील फालोदी येथील आहेत. त्यांचे बालपण आणि शिक्षण चेन्नई आणि हैदराबाद येथे झाले. त्यांनी चार्टर्ड अकाउंटंट (CA) आणि सर्टिफाइड पब्लिक अकाउंटंट (CPA) ही दुहेरी पात्रता मिळवली आहे. सध्या ते ह्यूस्टन, टेक्सास येथे वास्तव्यास असून Hewlett Packard Enterprise (HPE) मध्ये फायनान्शियल रिपोर्टिंग आणि SOX गव्हर्नन्सचे डायरेक्टर म्हणून कार्यरत आहेत.

विज्ञान शाखेतून मराठी विषय घेऊन बारावी उत्तीर्ण झालेल्या गरीब, हुशार व होतकरू मुलींना दिलेला अर्ज भरून द्यावा. एकूण तीन विद्यार्थिनीना ही शिष्यवृत्ती दिली जाईल. निवड झालेल्या मुलीना प्रत्येकी दहा हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. यासाठीचे अर्ज, बालगोपाळ किड्स जांबोटी रोड पिरनवाडी येथे उपलब्ध आहेत. याशिवाय आम्ही WahtsApp ग्रुप वरही अर्ज सोडत आहोत तेही भरून प्रा. गोपाळ पाटील याना WhatsApp द्वारे पाठवले तरी चालेल. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख २० मे २०२६. अधिक माहितीसाठी प्रा.डॉ. गोपाळराव पाटील भ्रमण ध्वनी क्रमांक 9619588606 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

कवी चंद्रशेखर गायकवाड यांच ‘कळा या लागल्या जीवा’ कार्यक्रम आणि कवी संमेलनाचे शनिवारी आयोजन

Spread the love  बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या प्रेरणेने शब्दगंध कवी मंडळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *