Thursday , May 7 2026
Breaking News

अवैध कृत्यांविरोधात शहर पोलिसांची तीव्र मोहीम; पाच जणांना अटक

Spread the love

 

बेळगाव : शहरातील अवैध कृत्यांविरोधात शहर पोलिसांनी तीव्र मोहीम हाती घेतली असून चार पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्वतंत्र छापे घालून कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत मटका व्यवसाय आणि अमली पदार्थांचे सेवन करीत असणाऱ्या पाच जणांना अटक केली असून विविध पोलीस स्थानकाच्या पथकाने सदर कारवाई केली आहे. हिरेबागेवाडी पोलीस स्थानकाचे पीआय सुंदरेश होळेन्नावर यांच्या पथकाने अमित महादेव शेवटे या इसमाला जनता हॉटेल परिसरात मटका खेळत असताना ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे मार्केट पोलीस स्थानकाचे पीएसआय विठ्ठल हावन्नवर त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भरतेश हायस्कूल जवळ मटका खेळत असणाऱ्या प्रभाकर जाधव नामक इसमाला अटक केली असून त्याला ताब्यात घेतले आहे. खडेबाजार पोलीस स्थानकाच्या हद्दीतील स्थानक परिसरात संशयास्पद वर्तन करणाऱ्या श्रेयस अनंत मांजरेकर याला ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणी केली असता त्याने गांजा सेवन केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याचप्रमाणे मारिहाळ पोलीस स्थानकाचे पीएसआय मंजुनाथ हुलकुंद यांनी गांजा सेवन केल्याप्रकरणी विनायक फकीरा राजगोळी आणि गजानन अशोक आगाशिमनी अटक केली असून या सर्व आरोपींविरोध केपी कायदा तसेच एनडीपीएस कायद्या अंतर्गत विविध पोलीस स्थानकात गुन्हे नोंद करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

रामकृष्ण मिशन आश्रमाच्या रौप्य महोत्सव कार्यक्रमास 8 मे पासून प्रारंभ

Spread the love  बेळगाव : स्वामी विवेकानंद यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या किल्ल्यातील रामकृष्ण मिशन आश्रमाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *