Thursday , August 27 2026
Breaking News

विजेचा धक्का बसून घराच्या छतावरून खाली पडल्याने 9 वर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू

Spread the love

 

चिकोडी : विजेचा धक्का बसून घराच्या छतावरून खाली पडल्याने 9 वर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना चिक्कोडी तालुक्यातील इंगळी गावात घडली आहे. सान्वी कांबळे असे मृत बालिकेचे नाव असून ती इंगळी येथील प्राथमिक शाळेत तिसरी इयत्तेत शिक्षण घेत होती.

मंगळवारी सायंकाळी घराच्या छतावर खेळत असताना अचानक विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने तिला विजेचा धक्का बसला व ती खाली कोसळली. तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी अंकली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

About Belgaum Varta

Check Also

एकच उपमुख्यमंत्री पदाच्या चर्चेला सतीश जारकीहोळींचा पूर्णविराम

Spread the love  ‘जनसेवेसाठी विशिष्ट पदाची गरज नाही’; विरोधकांकडून राजकीय फायद्यासाठी मुद्द्याचे भांडवल बंगळूर : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *