Thursday , August 27 2026
Breaking News

बेळगावनगरीत भरणार आंबा महोत्सव : मिळणार शेतकऱ्यांकडून थेट खरेदीची संधी

Spread the love

 

बेळगाव : जिल्हा बागायती विभागाच्या वतीने बेळगाव, क्लब रोडवरील ह्युम पार्क येथे आंबा प्रदर्शन व विक्री मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवार दिनांक 8 ते रविवार दिनांक 10 मे दरम्यान सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत हा आंबा प्रदर्शन व विक्री मेळा भरणार आहे.
या मेळ्यात शास्त्रीय पद्धतीने काढलेले तसेच नैसर्गिकरीत्या पिकवलेले आंबे शेतकरी थेट ग्राहकांकरिता विक्रीस ठेवणार आहेत, त्यामुळे नागरिकांना ताजे व दर्जेदार आंबे थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. यामुळे आंबा प्रेमींसाठी हा आंबा महोत्सव एक पर्वणीच ठरणार आहे.
या मेळ्याचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम खात्याचे व जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते होणार असून महिला व बालविकास खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी होणाऱ्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बेळगाव उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आसिफ (राजू) सेठ हे राहणार आहेत, अशी माहिती बागायत विभागाच्या संयुक्त संचालकांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

About Belgaum Varta

Check Also

एकच उपमुख्यमंत्री पदाच्या चर्चेला सतीश जारकीहोळींचा पूर्णविराम

Spread the love  ‘जनसेवेसाठी विशिष्ट पदाची गरज नाही’; विरोधकांकडून राजकीय फायद्यासाठी मुद्द्याचे भांडवल बंगळूर : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *