Sunday , June 28 2026
Breaking News

विश्वकर्मा उद्यानातील वृक्षांना पर्यावरणप्रेमी शिक्षक नामदेव चौगुले यांच्याकडून पाणीपुरवठा

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : पर्यावरण संवर्धनाचा संदेश केवळ भाषणातून नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतून देणारे येथील पर्यावरणप्रेमी शिक्षक नामदेव चौगुले यांनी पुन्हा एकदा आपली बांधिलकी सिद्ध केली आहे. लेटेक्स कॉलनी परिसरातील विश्वकर्मा उद्यानातील वृक्षांना भर उन्हाळ्यात टँकरद्वारे नियमित पाणीपुरवठा करून त्यांनी वृक्षसंवर्धनाचा आदर्श निर्माण केला आहे.
विश्वकर्मा उद्यानाची संकल्पना साकारण्याचा संकल्प करून त्याला प्रत्यक्षात उतरवले. या उपक्रमानंतर त्यांच्या कुटुंबीयांनीही पर्यावरणाच्या कार्यात सक्रिय सहभाग नोंदवला आहे. अपूर्वा चौगुले, प्राची गोरे -चौगुले, रणजित गोरे आणि कॅनडास्थित सपना तेंडोलकर, प्रकाश कडगांवकर यांच्या सहकाऱ्यांने वृक्षारोपण करून या उपक्रमाला बळ दिले. लेटेक्स कॉलनीतील नगरपालिका जागेत विकसित करण्यात आलेल्या या उद्यानामुळे परिसरात हरित पट्टा निर्माण झाला असून पक्ष्यांसाठी नैसर्गिक अधिवास उपलब्ध झाला आहे. या झाडांची काळजी घेण्यासाठी पंधरा दिवसांनी नियमित पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे वृक्षांची वाढ चांगल्या प्रकारे होत असून परिसरातील नागरिकांमध्येही पर्यावरणाबाबत जागरूकता वाढताना दिसत आहे.
नामदेव चौगुले यांनी, आपण लाखो रुपयांची गाडी खरेदी करू शकतो. पण सावली विकत मिळत नाही. ती झाडे लावूनच मिळवावी लागते, असा संदेश दिला. त्यांच्या या कृतीशील उपक्रमामुळे समाजात पर्यावरण संवर्धनाबाबत सकारात्मक प्रेरणा निर्माण होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये ‘अग्नि सुरक्षा’ प्रात्यक्षिकासह विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती

Spread the love    निपाणी (वार्ता) : बेळगाव मराठा मंडळ संचलित निपाणी येथील मॉडर्न इंग्लिश …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *