Thursday , August 27 2026
Breaking News

नंदकिशोर सारडा यांच्या स्मरणार्थ तीन विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती देणार

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील महाविद्यालय मराठी भाषा विषय घेऊन शास्त्र शाखेतून (Science) बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनींसाठी शशिकांत सारडा आपले वडील नंदकिशोर सारडा यांच्या स्मरणार्थ तीन विद्यार्थिनींना हुशार व होतकरू मुलींना प्रत्येकी दहा हजार रुपयांची शिष्यवृत्ती देणार आहेत. शशिकांत सारडा हे सांगलीचे सुपुत्र असून सध्या ते अमेरिकेतील WPS या कंपनीत ज्येष्ठ उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.

मागील वर्षीही तीन विद्यार्थिनींची निवड करून प्रत्येकी दहा हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात आली होती, यातील दोन विद्यार्थिनी हुक्केरी तालुक्यातील व एक विद्यार्थिनी बेळगाव तालुक्यातील होती.
यासाठी विज्ञान शाखेतून मराठी विषय घेऊन बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनीनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी लागणारे अर्ज ‘बालगोपाळ किड्स’ जांबोटी रोड पिरनवाडी येथे उपलब्ध आहेत. भरलेले अर्ज बालगोपाळ किड्स येथे द्यावेत किंवा अर्जाची झेरॉक्स प्रत घेऊन आम्ही ज्या व्हाटस्अप ग्रुप ही बातमी घालील त्या ग्रुप वर अर्ज पाठविला तरी चालेल. अधिक माहितीसाठी डॉ. गोपाळराव पाटील भ्रमणध्वनी क्रमांक 9619588606 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

बिदर जिल्हा महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत मराठीसाठी ठराव

Spread the love    भालकी : बिदर जिल्हा महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वपूर्ण बैठक बुधवार, दि. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *