Thursday , May 7 2026
Breaking News

बोळेवाडी येथील शर्यतीत आडीतील बैलगाडी प्रथम

Spread the love

 

रेंदाळची गाडी द्वितीय; शर्यती शौकिनांची गर्दी

निपाणी (वार्ता) : बोळेवाडी येथे सिद्धेश्वर, महालक्ष्मी व मरगुबाई यात्रेनिमित्त ४ ते ६ मे अखेर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी (ता.६) सकाळी दहा वाजता दुर्गा माता तरुण मंडळातर्फे आयोजित विना लाठी काठी जनरल बैलगाडी शर्यतीमध्ये आडी मधील पप्पू यांच्या बैलगाडीने प्रथम क्रमांक पटकावून १५,००१, रुपयांचे रोख बक्षीस आणि ढाल मिळवले.
या शर्यतीमध्ये रेंदाळच्या राजू मोरे यांच्या बैलगाडीने द्वितीय क्रमांक मिळवून रोख १०,००१ रुपये तर कोल्हापूरच्या पंकज काटकर यांच्या बैल जोडीने तृतीय क्रमांकाचे ७,००१, ढाल व निशाण मिळविले. पाडा -बैलगाडी शर्यतीत अमित हरेर- बेनाडी, केतन पाटील- खेबवडे आणि राहुल खोत -कोडणी यांच्या बैलगाड्यांनी प्रथम ते तृतीय क्रमांकाची१०,००१, ७,००१, ५,००१, रुपयांची बक्षिसे पटकावली.

जनरल घोडा-बैलगाडी शर्यतीत हेमंत हरेर -आडी, सोहन- दानोळी आणि शिवाजी पाटील -गुडाळ यांच्या गाड्यांनी प्रथम ते तृतीय क्रमांकाची ७,००१, ५,००१, ३,००१ रुपयांची बक्षिसे मिळवली. जनरल घोडागाडी शर्यतीमध्ये प्रदीप सादळे- रांगोळी, पाटील- भिवशी आणि किशोर पुजारी पट्टणकोडोली यांनी प्रथमच तृतीय क्रमांकाची ७,००१, ५,००१, ३,००१ रुपयांची बक्षिसे मिळवली. नवतर जनरल घोडागाडी शर्यतीत शुभम पाटील, अनिकेत गुरव कागल व‌ अबू यरनाळे-यरनाळ यांच्या गाड्यांनी प्रथम ते तृतीय क्रमांकाची ५,००१, ३,००१, २,००१ रुपयांची बक्षिसे तर आदत दुस्सा बैलगाडी शर्यतीमध्ये तन्वीर चौगुले-शमनेवाडी, कैय्युम मुजावर-हातकणंगले आणि पंढरी पाटील-केनवडे यांच्या गाड्यांनी प्रथम ते तृतीय क्रमांकाची ५,००१, ३,००१, २,००१ रुपयांची बक्षिसे मिळवली.
बोरगाव येथील युवराज पाटील यांच्या हस्ते शर्यती मैदानाचे उद्घाटन झाले. तर बाबुराव खोत, हनुमंत खोत, ओंकार म्हातुकडे, राहुल खोत, सागर पठाडे, आकाश म्हातुकडे, मनीष म्हातुकडे, पांडुरंग खोत, वसंत मंगावते, अण्णाप्पा शेट्टी, आप्पासाहेब खोत, मनोज म्हातुकडे, सचिन म्हातुकडे यांच्यासह दुर्गामाता तरुण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.

About Belgaum Varta

Check Also

निपाणी परिसरात विद्यार्थ्यांनी अनुभवला शून्य सावली दिवस

Spread the love  आकाश निरभ्र असल्यामुळे निरीक्षण संधी निपाणी (वार्ता) : तू जहाँ जहाँ चलेगा, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *