Thursday , August 27 2026
Breaking News

बेळगाव उत्तर विभाग आयजीपीपदी संदीप पाटील यांची नियुक्ती

Spread the love

 

बेंगळूर : राज्य सरकारने अनेक वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले असून बेळगाव उत्तर विभागाचे आयजीपी म्हणून संदीप पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या कार्यरत असलेले डॉ. चेतन सिंग राठोड यांच्या जागी ही बदली करण्यात आली आहे.

कर्नाटक सरकारने बुधवारी जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार, २००४ बॅचचे आयपीएस अधिकारी संदीप पाटील हे बेळगाव उत्तर विभागाचे नवे पोलीस महानिरीक्षक (आयजीपी) म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. सध्या या पदावर कार्यरत असलेले डॉ. चेतन सिंग राठोड यांची सीआयडी आर्थिक गुन्हे शाखेच्या आयजीपीपदी बदली करण्यात आली आहे.

याचबरोबर, नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या अनुपम अग्रवाल यांच्याकडे कर्नाटक राज्य राखीव पोलीस दल (केएसआरपी) आयजीपीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. प्रशासनाच्या हितासाठी या सर्व बदल्या तात्काळ प्रभावाने लागू करण्यात येणार असल्याचे शासनाचे अप्पर सचिव संजय बी. एस. यांनी आदेशात नमूद केले आहे.

संदीप पाटील यांनी गेल्या १५ वर्षांत बेंगळुरू शहर आणि राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागात अनेक महत्त्वाची पदे भूषवली असून, त्यांचा तो प्रदीर्घ अनुभव आता बेळगाव जिल्ह्यासह संपूर्ण उत्तर परीक्षेत्रासाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

कवी चंद्रशेखर गायकवाड यांच ‘कळा या लागल्या जीवा’ कार्यक्रम आणि कवी संमेलनाचे शनिवारी आयोजन

Spread the love  बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या प्रेरणेने शब्दगंध कवी मंडळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *