Sunday , June 28 2026
Breaking News

‘डिजिटल अरेस्ट’ धमक्यांना जनतेने घाबरू नये : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love

 

बेळगाव : डिजिटल अरेस्ट च्या नावाखाली नागरिकांना धमकावून पैसे उकळण्याचे प्रकार वाढत असल्याने, कर्नाटक राज्य पोलिसांनी सतरतेचा इशारा दिला आहे. पोलीस विभागात डिजिटल अटक अशी कोणतीही संकल्पना अस्तित्वात नसून, अशा प्रकारचे कॉल, मेसेज किंवा नोटीस पूर्णपणे बनावट असल्याचे पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी पत्रकान्वये कळविले आहे.

पोलीस आयुक्त बोरसे यांनी पत्रकात म्हटले आहे की, फसवणूक करणारे स्वतःला पोलीस, सायबर क्राईम अधिकारी किंवा सरकारी अधिकारी म्हणून नागरिकांशी संपर्क साधतात. तुमच्यावर गुन्हा दाखल आहे किंवा तुमची डिजिटल अरेस्ट झाली आहे अशी धमकी देऊन ते भीती निर्माण करतात व तातडीने पैसे भरण्यास भाग पाडतात.

या प्रकारांमध्ये नागरिकांकडून वैयक्तिक माहिती, ओटीपी किंवा बँक तपशील ही मागितले जातात. कोणतीही अटक कायदेशीर प्रक्रियेनुसार प्रत्यक्षरीत्या केली जाते. फोन, व्हिडिओ कॉल किंवा ऑनलाईन माध्यमातून अटक करण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे नागरिकांनी अशा दाव्यांवर विश्वास ठेवू नये. तसेच पोलिसांनी नागरिकांना अनोळखी कॉल किंवा मेसेज पासून सावध राहण्याचे, कोणतीही संवेदनशील माहिती शेअर न करण्याचे आणि घाबरून पैसे ट्रान्सफर न करण्याचे आवाहन केले आहे.

संशयास्पद प्रकरण आढळल्यास त्वरित जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार द्यावी. सायबर फसवणूक झाल्यास तक्रार केंद्र सरकारच्या सायबर गुन्हे पोर्टल www. cybercrime.gov.in वर नोंदवता येते तसेच 1930 या हेल्पलाईन क्रमांकावरही संपर्क साधता येतो असेही कळविण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

घुमटमाळ मारुती मंदिर आणि बांडगी शैक्षणिक ट्रस्टतर्फे विद्यार्थिनींचा सत्कार

Spread the love  बेळगाव : “मुलींनो जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर डोळसपणे प्रेम करा, आपल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *