Sunday , June 28 2026
Breaking News

दहावी परीक्षेत राज्यात संयुक्त पाचवा क्रमांक मिळवलेल्या अनुष्का देसाई हिचा आमदार विठ्ठल हलगेकरांकडून सत्कार

Spread the love

 

खानापूर : तालुक्यातील विद्यार्थिनींनी दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून तालुक्याचा नावलौकिक वाढवला आहे. विशेषत मुली शिक्षणात आघाडी घेत असल्याचे चित्र पाहायला मिळत असून ही बाब अभिमानास्पद असल्याचे प्रतिपादन आमदार विठ्ठल हलगेकर यांनी केले.
हलशीवाडी येथील अनुष्का रघुनाथ देसाई हिने दहावीच्या परीक्षेत ६२१ गुण मिळवत खानापूर तालुक्यात दुसरा क्रमांक तसेच राज्यात संयुक्तपणे पाचवा क्रमांक पटकावला. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल आमदार हलगेकर यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना आमदार हलगेकर म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड क्षमता असून योग्य मार्गदर्शन आणि मेहनतीच्या जोरावर ते मोठे यश मिळवू शकतात. विशेषतः मुली शिक्षणात पुढे येत असल्याचे पाहून समाधान वाटते. भविष्यातही विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात प्रगती साधावी आणि खानापूर तालुक्याचे नाव राज्य व देशपातळीवर उज्ज्वल करावे असे आवाहन केले.
प्रारंभी पिकेपीएसचे माजी सदस्य अनंत देसाई, रघुनाथ देसाई यांनी उपस्थितांचे स्वागत केले यावेळी राजू लक्केबैलकर, भरमाणी पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य अर्जुन देसाई, राजन सुतार, मानसी देसाई, प्रशांत देसाई आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

शिवाजीनगर अपघातातील जखमी सेवानिवृत्त पोस्टमास्तर मारुती दळवी यांचे निधन; मणतुर्गा येथे आज अंत्यसंस्कार

Spread the love  खानापूर : खानापूर शहरातील शिवाजीनगर परिसरात दोन दुचाकींच्या झालेल्या भीषण अपघातात गंभीर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *