Sunday , June 28 2026
Breaking News

बेळगावात आयपीएल सट्टेबाजी रॅकेटचा पर्दाफाश; रिव्हॉल्वर बाळगणाऱ्यासह तीन आरोपी अटकेत

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव शहरात आयपीएल सट्टेबाजी रॅकेट उघडकीस आले असून मार्केट पोलिसांनी शहरात चालू असलेल्या अवैध धंद्यांवर धडक कारवाई केली असून सट्टेबाजी करणारे रॅकेट उघडकीस आणले आहे. तसेच बेकायदेशीररीत्या रिव्हॉल्वर वापरून दहशत निर्माण करणाऱ्या एका व्यक्तीला देखील मार्केट पोलिसांनी अटक केली आहे. आज झालेल्या कारवाईत एकूण तीन जण पोलिसांच्या ताब्यात आहे.

मार्केट पोलीस स्थानकाच्या हद्दीत पीएसआय हुसेनसाब केरुर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आयपीएल क्रिकेट सट्टेबाजी चालवणाऱ्या मोहम्मद सादिक मल्लिदावर, मोहसीन मोहम्मद हनीफ खलिफा आणि सुफियान शेख यांना अटक केली असून त्यांच्याकडून दोन मोबाईल फोन आणि रोकड रक्कम जप्त करण्यात आली आहे. तीनही आरोपी ऑनलाइन पद्धतीने सत्तेबाजीचे जाळे चालवीत असल्याची माहिती पोलिसांना उपलब्ध झाली असून याबाबत पोलीस पुढील तपास करीत आहे. खराब झालेल्या दुसऱ्या कारवाईत खडेबाजार पोलीस ठाण्याच्या पथकाने कॉलेज रोड परिसरात दाखवून नागरिकांमध्ये भीती निर्माण करणाऱ्या गोकाक येथील बसवराज बंडीवडर याला अटक केली असून त्याच्याकडे बेकायदेशीररित्या वापरत असलेले रिव्हॉल्वर देखील पोलिसांनी जप्त केले आहे. बेळगाव शहरात चालू असलेल्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी बेळगाव पोलिसांकडून ही विशेष मोहीम राबविली जात असून पुढील तपास सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

घुमटमाळ मारुती मंदिर आणि बांडगी शैक्षणिक ट्रस्टतर्फे विद्यार्थिनींचा सत्कार

Spread the love  बेळगाव : “मुलींनो जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर डोळसपणे प्रेम करा, आपल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *