Sunday , June 28 2026
Breaking News

सोशल मीडियावरील अफवांमुळे गॅस बुकिंगसाठी ग्राहकांची ऑनलाइन झुंबड

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरवाढीनंतर आता घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ५०० रुपयांची वाढ होणार असल्याची अफवा सोशल मीडियावर वेगाने पसरली आहे. या अफवेमुळे ग्राहक पॅनिक होत ऑनलाइन बुकिंग करीत आहेत.
प्रत्यक्षात आज बुक केलेले सिलिंडर ग्राहकांना सुमारे २० ते २५ दिवसांनंतर मिळत आहे. त्यामुळे तातडीने बुकिंग करूनही ग्राहकांना अपेक्षित फायदा होणार नाही. यात महत्त्वाची बाब म्हणजे, गॅस सिलिंडरचा दर बुकिंगच्या दिवशी निश्चित होत नाही. ग्राहकांना सिलिंडर मिळालेल्या दिवशी लागू असलेला दरच द्यावा लागतो. त्यामुळे दरवाढीच्या भीतीने आधीच बुकिंग करून ठेवले, तरी त्याचा कोणताही आर्थिक फायदा होत नाही. अफवांवर विश्वास ठेवून अनावश्यक बुकिंग करू नये. अशा पॅनिक बुकिंगमुळे वितरण यंत्रणेवर ताण येऊ शकतो. खरोखर गरज असलेल्या ग्राहकांना वेळेवर सिलिंडर मिळण्यात अडचणी निर्माण होतात. गॅस वितरण सुरळीत राहण्यासाठी आणि सर्व ग्राहकांना वेळेवर सेवा मिळण्यासाठी संयम राखणे आवश्यक असल्याचेही एजन्सींकडून सांगण्यात येत आहे. याआधीही गॅसबाबत टंचाईच्या अफवा उठल्या होत्या. तेव्हा तर एजन्सींवर रांगा लागल्या होत्या. त्यामुळे आता प्रशासनानेही या अफवांबाबत स्पष्टता देण्याची गरज नागरिकांतून व्यक्त होत आहे.
——————————————————————–
‘गॅस दरवाढीबाबत सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चामुळे ग्राहकांमध्ये अनावश्यक भीती निर्माण झाली आहे. मात्र, ग्राहकांनी हे लक्षात घ्यावे की, गॅस बुकिंगच्या दिवशीचा दर लागू होत नाही, तर सिलिंडर मिळालेल्या दिवशीचा दरच आकारला जातो. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवून पॅनिक बुकिंग करू नये. यामुळे वितरण व्यवस्थेवर ताण येऊन इतर ग्राहकांना अडचणी निर्माण होतात.
-गजेंद्र तारळे, सिलेंडर वितरक, निपाणी.

About Belgaum Varta

Check Also

मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये ‘अग्नि सुरक्षा’ प्रात्यक्षिकासह विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती

Spread the love    निपाणी (वार्ता) : बेळगाव मराठा मंडळ संचलित निपाणी येथील मॉडर्न इंग्लिश …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *