Thursday , August 27 2026
Breaking News

शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात केल्यास जीवन समृद्ध होईल : उद्योगपती शिरीष गोगटे

Spread the love

बेळगाव : “शिवाजी महाराजांच्या सारखा दुसरा राजा झाला नाही आणि होणार नाही. त्यांच्या जीवनातील काही गोष्टी जरी आपण आत्मसात केल्या तर आपले जीवन समृद्ध होईल” असे विचार उद्योगपती शिरीष गोगटे यांनी व्यक्त केले.
गोगटे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजला संलग्न विविध आस्थापनामधील सुमारे दीडशे कर्मचाऱ्यांना काल शिवाजी महाराजांच्या जीवनावरील “राजा शिवाजी” हा चित्रपट दाखवण्यासाठी ते त्या सर्वांना नर्तकी – स्वरूप सिनेमागृहात घेऊन आले. त्यांनी प्रारंभी शिवाजी महाराज आणि लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन केले. आपल्या कर्मचाऱ्यांसमोर छत्रपती शिवरायांची महती सांगितली आणि त्यानंतर सर्वांना तो चित्रपट दाखविला. याप्रसंगी नर्तकी- स्वरूपचे संचालक अविनाश पोतदार यांनी त्या सर्वांचे स्वागत केले. आणि पहिल्या दिवसापासून हा चित्रपट हाउसफुल होत असल्याची माहिती दिली.
चित्रपट पाहिल्यानंतर उपस्थितानी समाधान व्यक्त केले.

About Belgaum Varta

Check Also

न्यू गुड्स शेड रोडच्या कायमस्वरूपी दुरुस्तीसाठी महापालिका आयुक्तांना निवेदन

Spread the love  बेळगाव : बेळगाव रेल्वे स्थानकाच्या दक्षिण प्रवेशद्वाराला जोडणारा आणि डेक्कन हॉस्पिटलसमोरील अत्यंत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *