Sunday , December 21 2025
Breaking News

बेळगाव

आर. पी. डी. महाविद्यालयाचा बी. ए., बी. कॉम., बी. बी. ए. निकाल जाहीर

  बेळगाव :  आमच्या महाविद्यालयाला यु जी सी कडून स्वायत्त दर्जा मिळाल्यानंतर प्रथमच बी. ए., बी. कॉम. आणि बी. बी. ए. या अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे निकाल जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे की, आम्ही यु जी सी व आर. सी. यु. बेळगावच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करत आहोत. स्वायत्त महाविद्यालयाचे वर्ग …

Read More »

पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवणार नाही याची काळजी घ्या : सीईओ राहुल शिंदे

  कागवाड : उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. मंगळवारी (दि. 11) कागवाड तालुक्यातील मंगसुळी गावातील बहुग्राम पिण्याच्या पाण्याच्या प्लांटला भेट दिली असता ते बोलत होते. दर 15 दिवसांनी पाण्याचे टँकर स्वच्छ करावेत. या भागात उन्हाळ्यात पाणीटंचाई …

Read More »

सीमाभागातील रुग्णांना जास्तीतजास्त अर्थसहाय्य करू; मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांचे आश्वासन

  बेळगाव : मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष प्रमुख श्री. रामेश्वर नाईक यांची प्राचार्य श्री. आनंद आपटेकर, वैद्यकीय समन्वयक महाराष्ट्र एकीकरण समिती बेळगाव यांनी भेट घेतली. माननीय श्री. एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री असताना श्री. मंगेश चिवटे यांच्या मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष प्रमुख नेतृत्वाखाली प्रथमच सीमाभागातल्या 865 गावांना वैद्यकीय सहायता निधीतून मदत मिळण्यास …

Read More »

महाकुंभमेळा दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना 25 लाखाचे अर्थसहाय्य

  बेळगाव : 14 जानेवारीमध्ये प्रयगराज येथे महाकुंभमेळ्याप्रसंगी चेंगराचेंगरी दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या चार भाविकांच्या कुटुंबीयांना सरकारकडून 25 लाख रुपये सहाय्य निधी देण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज सकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. महाकुंभमेळ्याप्रसंगी गेल्या 14 जानेवारी रोजी प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीची दुर्घटना घडून …

Read More »

अरुणा गोजे-पाटील यांना “तेजस्विनी महाराष्ट्र गौरव” पुरस्काराने सन्मानित

  बेळगाव (रवी पाटील) : ग्राहक सेवा सामाजिक बहुउद्देशीय संस्था संचलित ग्राहक रक्षण समितीच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा “तेजस्विनी महाराष्ट्र सन्मान पुरस्कार” यंदा बेळगावच्या प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या, पत्रकार, साहित्यिक आणि शिक्षणप्रेमी अरुणा गोजे-पाटील यांना प्रदान करण्यात आला. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून हा सन्मान देण्यात आला. अरुणा गोजे-पाटील या अखिल …

Read More »

गणाचारी गल्ली येथे समुदाय भवनवरून तणाव; वादावादीचा प्रकार

  बेळगाव : गणाचारी गल्ली (बकरी मंडई) येथे समुदाय भवन आणि खाटीक समाज देवस्थान बांधकामावरून उद्भवलेला वाद चिघळला आहे. मंगळवारी सायंकाळी गणाचारी गल्लीतील नागरिक आणि खाटीक समाजातील प्रमुख नेत्यांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी खडेबाजार पोलिसांनी यामध्ये हस्तक्षेप करून दोन्ही गटातील नागरिकांना हुसकावून लावले. यावेळी किरकोळ दगडफेक झाल्यामुळे काही सदस्य जखमी झाले. …

Read More »

न्यू गुडशेड रोड येथे साडेसात लाखाचा दारूसाठा जप्त

  बेळगाव : शहरातील मध्यवर्ती ठिकाणी न्यु गुडशेड रोड येथे गोवा बनावटीचा 7 लाख 30 हजार रुपयाचा दारूसाठा जप्त करण्यात आला. होळी आणि रंगपंचमीसाठी ही दारू गोव्याहून टाटा एस या वाहनातून आज मंगळवारी पोचली होती. राकेश अनिल चौगुले या वाहन चालकाने गुडशेड रोडवरील आपल्या घराजवळ टाटा एस हे चार चाकी …

Read More »

रंगांची उधळण करताना सावधान; अन्यथा कायदेशीर कारवाई

    बेळगाव : होळी आणि धुलिवंदन उत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. मार्केट पोलिसांकडून हा उत्सव शांततेत साजरा केला जावा यासाठी बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. विनाकारण अनेकजण पादचाऱ्यांवर, महिलांवर रंगांची उधळण करत असतात. संबंधितांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यास रंग उधळणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा मार्केटचे पोलिस …

Read More »

श्री मळेकरणी देवीच्या परिसरात होणार वार्षिक उत्सव; सामंजस्याने तोडगा

  बेळगाव : गेली १०५ वर्षे उचगाव येथे होळी पौर्णिमेनिमित्त पाच दिवसांचा श्री मळेकरणी देवी सप्ताह साजरा केला जातो. मात्र यंदा हा उत्सव थांबवण्याचा निर्णय देसाई बंधू कमिटीने घेतला होता. त्यांनी देवीच्या जागेवर आपला हक्क सांगत ग्रामपंचायत अध्यक्ष मथुरा तेरसे आणि ग्रामस्थांवर बेळगाव न्यायालयात याचिका दाखल केली होती. निर्माण झालेला …

Read More »

गर्भाशयाचे लवकर निदान आणि उपचार गरजेचे : डॉ. सुरेखा पोटे

  संजीवीनी महिला आरोग्य जागृती मास कार्यक्रमात महिलांना मार्गदर्शन बेळगाव : गर्भाशयाचे लवकर निदान आणि उपचार केल्याने पुढील परिस्थितीची प्रगती टाळता येते आणि लक्षणे कमी होतात त्यासाठी डॉक्टरांचा वेळेत सल्ला घेणे महत्त्वाचे असल्याचे मत डॉ. सुरेखा पोटे यांनी व्यक्त केले. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त संजीवीनी फौंडेशनच्या वतीने आयोजित महिला आरोग्य जागृती …

Read More »