Sunday , December 21 2025
Breaking News

बेळगाव

रेशन वितरणात सर्व्हर डाऊनची समस्या : रेशन वितरकांनी दिले निवेदन

  बेळगाव : रेशन वितरणाच्या नवीन सर्व्हरमधील तांत्रिक बिघाड दूर करण्यात यावा, या मागणीचे निवेदन आज कर्नाटक राज्य सरकारी शिधावाटप वितरक संघटनेच्या वतीने अन्न व सार्वजनिक वितरण उपसंचालक बेळगाव यांना देण्यात आले. रेशन वितरणासाठी सर्व्हर डाऊनची समस्या निर्माण होत आहे. यामुळे शिधावाटप वितरक व ग्राहकांना त्रास होत असून शासनाने हा …

Read More »

कर्नाटक सॉफ्ट बॉल क्रिकेट असोसिएशच्या वतीने क्रिकेट स्पर्धांचे आयोजन…

  आयपीएलच्या धर्तीवर नियोजन … बेळगाव : राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला एक टीम केली असून, बेळगांव जिल्ह्यासाठी आपली टीम तयार झाली असून बेळगांव जिल्ह्याच्या टीम चे नाव “राजा शिवाजी बेळगाव” असे असून या बेळगाव टीमचे प्रायोजक डॉ. अंजलीताई फांऊडेशनकडे असून या स्पर्धा १ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या काळात बेंगलोर येथे …

Read More »

उद्योजक संतोष पद्मन्नावर खून प्रकरणातील आरोपीना चार दिवसांची पोलीस कस्टडी

  बेळगाव : उद्योजक संतोष पद्मन्नावर खून प्रकरणात न्यायालयीन कोठडीत रवानगी केलेल्या चार आरोपीना आज अधिक चौकशीसाठी न्यायालयाच्या परवानगीने माळमारुती पोलिसांनी ताब्यात घेतले. न्यायालयाने या आरोपीना चार दिवसांची पोलीस कस्टडी दिली आहे. बेळगाव शहरातील अंजनेय नगर येथील रिअल इस्टेट व्यवसायिक संतोष पद्मण्णावर यांचा त्यांची पत्नी उमा पद्मण्णावर हिने आपल्या फेसबुक …

Read More »

नूतन मनपा आयुक्त शुभा बी. यांनी स्वीकारला पदभार

  बेळगाव : बेळगाव मनपाच्या नूतन आयुक्तपदी शुभा बी. यांची नियुक्ती करण्यात आली असून आज त्यांनी पदभार स्वीकारला. यावेळी बेळगावच्या विकासासाठी सर्वांना विश्वासात घेऊन काम करण्याची ग्वाही त्यांनी दिली. बेळगाव महापालिका आयुक्तपदी कार्यरत असलेले अशोक दुडगुंटी यांची बदली झाल्यानंतर आज नूतन आयुक्तपदी शुभा बी. यांची नियुक्ती झाली. माजी आयुक्त अशोक …

Read More »

कित्तूर उत्सवाच्या पूर्वतयारीची जिल्हाधिकारी आणि आमदारांनी केली पाहणी

  बेळगाव : उद्यापासून सुरु होणाऱ्या कित्तूर उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कित्तूर येथील नियोजित कार्यक्रमस्थळाची पाहणी तसेच कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसंदर्भात आज जिल्हाधिकारी आणि स्थानिक आमदारांनी भेट देऊन पाहणी केली. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आणि कित्तूरचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी आज कित्तूर येथील कार्यक्रमस्थळाची पाहणी केली. व्यासपीठ, जनतेची आसन व्यवस्था यासह संपूर्ण कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर सुरु …

Read More »

चोरीच्या संशयावरून गणपत गल्लीत महिलांना मारहाण

  बेळगाव : दिवाळीपूर्वीच्या सणासाठी बेळगाव बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी असते. अशातच महिलांना चोरीच्या संशयावरून स्थानिकांनी मारहाण केल्याची घटना आज बेळगावच्या गणपत गल्लीत घडली. बेळगावच्या गणपत गल्ली मार्केटमध्ये आज सकाळी चोरीच्या संशयावरून महिलांना मारहाण करण्यात आली. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी गर्दी वाढत आहे. अशा घटनांमध्ये चोरीच्या घटना घडत आहेत. स्थानिकांनी तातडीने खडेबाजार …

Read More »

राष्ट्रीय विद्याभारती अथलेटिक्स स्पर्धेसाठी संत मीराचे खेळाडू रवाना

  बेळगांव : मध्यप्रदेश सतना येथे होणाऱ्या 35 व्या अखिल भारतीय विद्याभारती राष्ट्रीय अथलेटिक्स स्पर्धेसाठी अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या अथलेटिक्स खेळाडू रवाना झाले आहेत. सतना येथील सरस्वती विद्यालय शाळेच्या मैदानावर होणाऱ्या 35 व्या राष्ट्रीय अथलेटिक स्पर्धेसाठी अनगोळ येथील शाळेचे खेळाडू समीक्षा विनायक बुद्रुक, नताशा महादेव चंदगडकर, भावना …

Read More »

गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीचे 24 वे मराठी बाल साहित्य संमेलन 16 नोव्हेंबर रोजी

  बेळगाव : गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीची बैठक मराठी विद्यानिकेतन कॅम्प बेळगाव येथे संपन्न झाली. बैठकीत सर्व प्रथम उद्योजक रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला याबद्दल गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीच्या वतीने अभिनंदनाचा ठराव मांडून महाराष्ट्र राज्य सरकारचे अभिनंदन …

Read More »

श्री शनी मंदिर ट्रस्टच्या वतीने खासदार शेट्टर यांचा सत्कार

  बेळगाव : पाटील गल्ली येथील अध्यापक कुटुंबियांच्या श्री शनी मंदिराला खासदार जगदीश शेट्टर यांनी भेट देऊन दर्शन घेतले. खासदार शेट्टर यांच्या हस्ते पूजा, आरती करून जगकल्याणार्थ प्रार्थना करण्यात आली. पूजेचे पौरोहित्य मंदिराचे ट्रस्टी प्रकाश अध्यापक यांनी केले. यावेळी युवा नेते आणि भाजप ओबीसी मोर्चाचे किरण जाधव उपस्थित होते. श्री …

Read More »

मराठीला अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल शब्दगंधतर्फे आनंदोत्सव

  बेळगाव : येथील शब्दगंध कवी मंडळातर्फे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडण्यासाठी रविवारी बैठक पार पडली. शब्दगंधचे अध्यक्ष प्रा. अशोक अलगोंडी यांनी अभिनंदनाचा ठराव मांडताना अभिजात दर्जा मिळाल्यामुळे मराठीचे संवर्धन आणि संशोधन करण्यासाठी मदत होणार असल्याचे म्हटले. त्यामुळे महाराष्ट्र शासन, साहित्यिक, संशोधक आणि मराठी संस्थांचे अभिनंदन …

Read More »