येळ्ळूर : सीमासत्याग्रही काॅम्रेड कृष्णा मेणसे यांचे नुकतेच निधन झाले. नवहिंद क्रीडा केंद्राच्यावतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धाजंली वाहण्यात आली. सदर शोकसभेच्या अध्यक्षस्थानी श्री. शिवाजी सायनेकर होते.
प्रारंभी दोन मिनिटे मौन पाळण्यात आले. सेक्रेटरी आनंद पाटील यांनी काॅ. कृष्णा मेणसे यांच्या कार्याचा आढावा घेतला. नवहिंद सोसायटीचे चेअरमन प्रकाश अष्टेकर यांनी, काॅ. कृष्णा मेणसे यांनी येळ्ळूर येथील साराबंदी लढ्यात अग्रभागी होते. आपल्या भागातील एक लढवय्या सीमा तपस्वी व कामगार नेता आपल्यातून निघून गेल्याने सीमा भागात पोकळी निर्माण झाली असल्याचे श्रद्धांजली भाषणात म्हटले. व्हा. चेअरमन अनिल हुंदरे, दत्ता उघाडे, उदय जाधव यांनी श्रद्धांजलीपर भाषणे केली.
या प्रसंगी न्यू नवहिंद मल्टीपर्पज सोसायटीचे चेअरमन नारायण जाधव, व्हा. चेअरमन वाय. एन. पाटील, वाय. सी. गोरल, नारायण बस्तवाडकर, उदय जाधव, सी. बी. पाटील, श्रीधर धामणेकर, हणमंत पाटील, पी. एन. कंग्राळकर, प्रमोद जाधव नितीन कुगजी, सुधीर माणकोजी, सुरेश पाटील, बाळू दणकारे आदि नवहिंद क्रीडा केंद्राचे कार्यकर्ते उपस्थित होते.