बेळगाव : नुकतीच श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ लक्ष्मी रोड, भारतनगर शहापूर बेळगाव यांची वार्षिक बैठक श्री महागणपती मंदिर येथे संपन्न झाली. या बैठकीत मागील वर्षाचा जमाखर्च आणि नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. सर्वानुमते अध्यक्षपदी श्री. सचिन शांताराम केळवेकर यांची तर उपाध्यक्षपदी दीपक अशोक सावळेकर यांची निवड झाली. सचिवपदी संदीप …
Read More »चौथ्या दिवशी शेतकऱ्यांचे बेमुदत धरणे सुरूच
बेळगाव : विविध मागण्यांच्या पूर्ततेच्या मागणीसाठी अखिल कर्नाटक रयत संघ, अखिल कर्नाटक महिला रयत संघ आणि हरित सेना बेंगळुरू तसेच कर्नाटक राज्य शेतकरी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगावात आज चौथ्या दिवशीही शेतकऱ्यांनी धरणे धरले. म्हादई – कळसा – भांडुरा प्रकल्पाचे कामकाज लवकरात लवकर सुरु करण्यात यावे, शेतकऱ्यांच्या पंपसेटसाठी आणलेला …
Read More »कोलकात्ता घटनेच्या निषेधार्थ उद्या बेळगावात सरकारी, खासगी रुग्णालयांची ओपीडी सेवा बंद
बेळगाव : पश्चिम बंगालमध्ये महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येच्या निषेधार्थ उद्या दि. 17 रोजी बेळगावातील सरकारी, खासगी रुग्णालयांची ओपीडी सेवा बंद राहणार असल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनचे बेळगावचे अध्यक्ष डॉ. रवींद्र अनगोळ यांनी दिली. पश्चिम बंगालमध्ये महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येच्या घटनेला आठवडा उलटून गेला तरी सरकारने कोणतीही कारवाई …
Read More »पंचमसाली लिंगायत आरक्षण लढ्यासाठी 15 सप्टेंबर रोजी बेळगावात पंचमसाली लिंगायत अधिवक्ता महापरिषद
बेळगाव : पंचमसाली लिंगायत आरक्षण लढ्यासाठी 15 सप्टेंबर रोजी बेळगावात पंचमसाली लिंगायत अधिवक्ता महापरिषद घेणार असून बेळगाव अधिवेशनात संघर्षाबाबत निर्णय घेणार असल्याचे श्रीजयमृत्युंजय यांनी सांगितले. बेळगाव येथील जिल्हास्तरीय वकिलांची गुरुवारी रात्री एका खासगी हॉटेलमध्ये बैठक घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, गेल्या साडेतीन वर्षांपासून आम्ही लिंगायत पोटजातींना ओबीसी आरक्षणासाठी प्रचार …
Read More »मुजावर आर्केड येथील लिफ्ट तुटली; लोकांची धावपळ
बेळगाव : नेहरू नगर येथील मुजावर आर्केड येथे लिफ्ट तुटून लोक आत अडकल्याची घटना घडली. तांत्रिक बिघाडामुळे लिफ्ट तुटली आणि त्यात सुमारे सात जण होते. आर्केड कर्मचारी आणि तांत्रिक तज्ज्ञ लिफ्टची दुरुस्ती करत आहेत. काही दिवसांपूर्वीच लिफ्टच्या खराब परिणामामुळे संपूर्ण कारखाना जळून खाक झाला होता, त्यामुळे शहरातील नागरिक हैराण …
Read More »श्री गणेशोत्सव मंडळ लक्ष्मी चौक सावगावच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड
बेळगाव : सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ लक्ष्मी चौक सावगावच्या २०२४ सालासाठीच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. अध्यक्षपदी कल्लाप्पा भरमा पाटील तर उपाध्यक्षपदी अमृत पुंडलिक वेताळ यांची गुरुवार (दि.१५) गावातील माऊली मंदिरात पार पडलेल्या मंडळाच्या बैठकीत सर्वानुमते निवड करण्यात आली. खजिनदारपदी प्रशांत यल्लप्पा कदम उपखजिनदार प्रभाकर मीनाजी पाटील, सेक्रेटरी …
Read More »जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर रयत संघटनेचे उपोषण मागे
निपाणी (वार्ता) : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बेळगांव येथील सरकारी क्रिडांगणावर रयत संघटनेतर्फे संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्यदिनी गुरुवारी (ता.१५) उपोषण करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याची ग्वाही दिली. त्यानंतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषण मागे घेतले. देशाला स्वातंत्र्य मिळून ७८ वर्षे पूर्ण झाली आहेत. तरीही शेतकऱ्यांना कोणत्याही सरकारने …
Read More »समर्थ सोसायटीतर्फे गुणवत्तापात्र विद्यार्थ्यांचा सन्मान
बेळगाव : येथील समर्थ अर्बन सोसायटीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही सोसायटीच्या सभासदांच्या पाल्यांचा गौरव करण्याचा कार्यक्रम स्वातंत्र्यदिनी संध्याकाळी आशीर्वाद मंगल कार्यालयात संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. सोनाली सरनोबत या उपस्थित होत्या. अध्यक्षस्थानी सोसायटीचे उपाध्यक्ष श्री. अभय जोशी हे होते. समर्थ सोसायटीच्या सभासदांच्या पहिली ते नववी पर्यंतच्या 175 …
Read More »बेळगावात ७८ वा जिल्हा स्वातंत्र्यदिन साजरा; जिल्हा क्रीडांगणावर लक्षवेधी परेड
बेळगाव : ब्रिटीश राजवटीपासून भारताला स्वातंत्र्य मिळून आज ७८ वर्षे झाली आहेत. आज ७८ वा स्वातंत्र्यदिन बेळगाव जिल्हास्तरावर मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. बेळगाव शहरातील नेहरू स्टेडियमवर बेळगाव जिल्हा पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीतासह तिरंगा ध्वजाला सलामी देण्यात आली. यावेळी महापौर …
Read More »राजहंसगड येथील रेशन दुकान सुरू करण्याची ग्रामस्थांची मागणी
बेळगाव : राजहंसगड येथील रेशन दुकान मागील एक वर्षांपासून बंद करण्यात आले आहे, राजकीय आकसापोटी सरकारी अधिकाऱ्यांवर दबाव आणून थातुरमातुर कारणे देऊन रेशन दुकान बंद करण्यात आले आहे. त्यामुळे येथील नागरीकांची गैरसोय होत आहे. मागील आठ वर्षांपासून विजय कुकडोळकर हे घर नंबर 50/4 मध्ये रेशन वाटप करत होते, त्यानंतर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta