बेळगाव : चलवेनहट्टी येथे आजी माजी सैनिक संघटनेच्या वतीने गावच्या प्रवेशद्वारावर स्वागत कमान उभे करण्यात आली आहे आजी- माजी सैनिक संघटनेच्या माध्यमातून पुर्ण झालेल्या या कमानीचा उध्दाटन सोहळा सोमवार दिनांक ११ नोव्हेंबर रोजी सकाळी होणार ११ वाजता होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून यमकनमर्डी मतदार संघाचे आमदार तसेच बेळगाव जिल्हाचे पालकमंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री मा.सतिश अण्णा जारकीहोळी हे उपस्थित राहणार असून सतिश आण्णा जारकीहोळी यांचा हस्ते फित कापून उद्घाटन होणार आहे प्रसंगी काकती पोलिस स्थानकाचे निरीक्षक सुरेश टी. शिंगेसह सामाजिक क्षेत्रात मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी अगसगे ग्रामपंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच सदस्य उपस्थित राहणार आहेत. यावेळी आजी माजी सैनिक संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार असून या नुतन कमानीमुळे गावच्या सौंदर्यात भर पडत असून या उद्घाटन सोहळ्याला चलवेनहट्टी ग्रामस्थासह पंचक्रोशीतील समस्त नागरीक यांनी उपस्थित राहवे, असे आवाहन आजी माजी सैनिक संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
Check Also
महामेळाव्यास परवानगी नाकारली तर कर्नाटकातून येणाऱ्या वाहनांना महाराष्ट्र सीमेवर अडवू
Spread the love शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा इशारा कोल्हापूर : बेळगाव येथे ९ डिसेंबर …