बेळगाव : महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्न अजूनही सुटला नसताना आता कर्नाटक राज्य सरकारकडून नवी कुरापत सुरू आहे. महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यावर कर्नाटक दावा सांगण्याचा गांभीर्यानं विचार करत असल्याचं कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितलं आहे. सांगली जिल्ह्यातील जत तालुका हा दुष्काळी आहे. तिथे पाण्याची तीव्र टंचाई भासते. यामुळं तेथील …
Read More »येळ्ळूर येथे शुक्रवारी ‘रिंगरोड’विरोधात जनजागृती बैठक
येळळूर : ‘रिंगरोड’विरोधात सोमवार दिनांक 28 रोजी नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘चाबूक मोर्चा’ काढण्याचा निर्णय तालुका म. ए. समितीने घेतला आहे. सदर मोर्चाला पाठिंबा देऊन जनजागृती करण्यासाठी येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने शुक्रवार दिनांक 25 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता श्रीचांगळेश्वरी देवालयात ‘जनजागृती सभे’चे आयोजन करण्यात आले आहे. या …
Read More »हिंडलगा ग्राम पंचायतीकडून सीसीटीव्ही बसवण्यास सुरुवात
बेळगाव : हिंडलगा पंचायतीने कचरा फेकणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेतला आहे. बेळगाव तालुक्यातील हिंडलगा ग्रामपंचायतीच्या व्याप्तीत नागरिक सर्वत्र कचरा टाकत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीने कचरा टाकणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी अभिनव उपाय योजिला आहे. मंगळवारी ग्रा.पं.चे अध्यक्ष नागेश मन्नोळकर यांनी सीसी कॅमेरे बसवण्याच्या कामाला सुरुवात केली. तसेच ग्रामपंचायतीने कचरा टाकणाऱ्यांना …
Read More »विद्यार्थ्याची वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या
बैलहोंगल : समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बैलहोंगल शहरात घडली आहे. परशुराम कोनेरी (रा.कोडीवाड, ता. बैलहोंगल) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. इतर विद्यार्थी कॉलेजला निघून गेल्यानंतर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. कॉलेजमधून परतल्यानंतर विद्यार्थ्याने दरवाजा अवघडल्याने इतर विद्यार्थ्यांनी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी …
Read More »रेल्वेच्या धडकेत दोन गायींचा मृत्यू
बेळगाव : रेल्वेच्या धडकेत दोन गायींचा मृत्यू झाला. हा अपघात बेळगाव शहरातील तिसऱ्या व चौथ्या रेल्वे गेट दरम्यान सोमवारी रात्री घडला. रेल्वेने धडक दिल्याने गायींचा मृत्यू झाल्याचे स्थानिकांनी सांगितले. माहिती मिळताच महामंडळाचे स्वच्छता निरीक्षक गणाचारी व त्यांच्या पथकाने घटनास्थळ गाठून गायींचे मृतदेह बाहेर काढून त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.
Read More »हिंडलगा हायस्कूल माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन उत्साहात
बेळगाव : हिंडलगा येथील हिंडलगा हायस्कूलच्या 1987-88 सालच्या बॅचमधील विद्यार्थी -विद्यार्थिनींचे स्नेहसंमेलन तब्बल 34 वर्षानंतर सोमनाथ लॉन, बॉक्साइट रोड हिंडलगा येथे अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात उत्साहात पार पडले. हिंडलगा हायस्कूलच्या सदर बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी संघटितपणे स्वखर्चातून शाळेच्या नूतन इमारतीची रंगरंगोटी करण्याद्वारे शाळेबद्दलची आपली आत्मीयता प्रकट केली. या रंगरंगोटी केलेल्या शाळा …
Read More »सीमाप्रश्नी पुन्हा तारीख पे तारीख
बेळगाव : 23 नोव्हेंबर रोजी होणारी सीमाप्रश्नी सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे. उद्याच्या सुप्रीम कोर्टाच्या कामकाजात सीमाप्रश्नी खटल्याचा समावेश होणार नाही. संपूर्ण सीमावासीयांचे लक्ष उद्या होणाऱ्या निकालाकडे होते. अनेक समितीप्रेमी हा निकाल “याची देही याची डोळा” पाहता, ऐकता यावा म्हणून दिल्लीला रवाना झाले आहेत. मात्र सुप्रीम कोर्टात या खटल्यावर …
Read More »ट्रकच्या धडकेत पादचारी गंभीर
बेळगाव : ट्रकची धडक बसून रस्त्यावरून जाणारा पादचारी गंभीर जखमी झाल्याची घटना छ. शिवाजी उद्यानासमोरील एसपीएम रोडवर सकाळी 7 च्या दरम्यान घडली. श्रीराम स्वामी (रा. शिवाजीनगर) असे जखमी झालेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच श्रीराम सेना हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले. तसेच आपल्या …
Read More »चाबूक मोर्चाच्या पाठिंब्यासाठी बार असोसिएशनला विनंती
बेळगाव : शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या बेळगावच्या नियोजित रिंगरोड विरोधात येत्या सोमवार दि. 28 नोव्हेंबर रोजी काढण्यात येणाऱ्या भव्य चाबूक मोर्चाला संपूर्ण पाठिंबा द्यावा, अशी विनंती बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे बेळगाव बार असोसिएशनला करण्यात आली आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांना उध्वस्त करणाऱ्या बेळगाव रिंगरोडचा प्रकल्प रद्द करण्यात यावा या मागणीसाठी येत्या …
Read More »सीमा आंदोलनातील हुतात्म्यांच्या कुटुंबियांना स्वातंत्र्य सैनिकांप्रमाणेच दुप्पट निवृत्ती वेतन
सीमा भागात पूर्वीप्रमाणे मुख्यमंत्री सहायता निधीचा लाभ मिळणार मुंबई : महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात राज्य शासन संपूर्णपणे सीमा भागातील बांधवांच्या भक्कमपणे पाठीशी उभे आहे. यासंदर्भातील कायदेशीर लढाईसाठी एकजुटीने प्रयत्न करीत असून त्यासाठी वरिष्ठ विधीज्ञ वैद्यनाथन याची नियुक्ती करण्यात आली आहे. न्यायालयीन प्रक्रियेच्या समन्वयासाठी मंत्री सर्वश्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta