Monday , July 27 2026
Breaking News

बेळगाव

अबकारी खात्याची कारवाई; पिरनवाडी क्रॉस येथे 43.93 लाखाची दारू जप्त

  बेळगाव : अबकारी खात्याच्या पथकाने पिरनवाडी क्रॉस येथे गोव्याहून दारूची बेकायदा वाहतूक करणारी एक लॉरी आणि तिच्यात दडविलेली 43 लाख 93 हजार 700 रुपये किमतीची दारू असा एकूण 63,93,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची घटना आज पहाटे घडली. बेळगावचे अप्पर अबकारी आयुक्त डॉ वाय. मंजुनाथ, अबकारी जंटी आयुक्त फिरोज खान, …

Read More »

काळ्यादिनाच्या सायकल फेरीत हजारोंच्या संख्येने सहभागी व्हा

  बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत आवाहन बेळगाव : मराठी सीमाभाग अन्यायाने १ नोव्हेंबर १९५६ रोजी तात्कालीन म्हैसूर व आताच्या कर्नाटक राज्यात डांबण्यात आल्यामुळे गेल्या ६७ वर्षापासून आपण काळा दिन गांभीर्याने हा काळा दिन सुतक दिन म्हणून पाळत असतो. येत्या एक नोव्हेंबर रोजी होणाऱ्या काळा दिनाच्या सायकल फेरीत सीमाभागातील …

Read More »

आ. अभय पाटील पालिका आयुक्तांना ब्लॅकमेल करत आहेत : मंत्री सतीश जारकीहोळी

  बेळगाव : आ. अभय पाटील छोट्या गोष्टींना मोठे करत आहेत. पालिका आयुक्तांना ते ब्लॅकमेल करत आहेत. बेळगावच्या महापौर सोमनाचे या आमदार अभय पाटील यांच्या हातचे बाहुले बनल्या आहेत असा सनसनाटी आरोप सार्वजनिक बांधकाम खात्याचे व जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी केला. बेळगाव महानगरपालिकेच्या कौन्सिल हॉलमध्ये पत्रकारांशी बोलताना मंत्री जारकीहोळी …

Read More »

सीमोल्लंघन नियोजनासाठी बैठक

  बेळगाव : बेळगाव शहरातील ज्योती कॉलेज मैदानावर पारंपरिक पद्धतीने दरवर्षी होणाऱ्या रितिरिवाजाप्रमाणे सीम्मोल्लंघन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. सिद्ध भैरवनाथ मंदिरात शनिवारी सायंकाळी शहरातील पारंपरिक पद्धतीने ज्योती कॉलेज मैदानावर होणारे सीम्मोल्लंघन वेळेत पूर्व व्हावे याचे नियोजन करण्यासाठी शहर देवस्थान कमिटीचे अध्यक्ष रणजित चव्हाण- पाटील यांच्या नेतृत्वाखाली नियोजन बैठकीचे आयोजन …

Read More »

बेळगाव जिल्ह्यात ९० वाढीव मतदान केंद्रे

  बेळगाव : आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. निवडणुकीत सुसूत्रपणा आणण्यासाठी बेळगाव जिल्ह्यातील मतदान केंद्रांची संख्या वाढविण्यात यावी. असा प्रस्ताव राज्य मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठविला होता. केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यास मंजुरी दिली असून, बेळगाव जिल्ह्यातील १८ पैकी १२ विधानसभा मतदारसंघांतील मतदान केंद्रांची …

Read More »

शेतकरी महिलांसाठी बस थांबवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा

  बेळगाव : शिवारात विविध कामांसाठी ये-जा करणाऱ्या शेतकरी महिलांसाठी बस थांबवावी; अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी परिवहन अधिकारी के. के. लमाणी यांना दिला. वडगाव, शहापूर आदी भागातील शेतकरी आणि महिला आपल्या शिवारात विविध कामांसाठी जात असतात. मात्र, शेतकरी महिलांनी हात करूनही बस थांबविली जात नाही. त्यामुळे महिला शेतकऱ्यांची अडचण …

Read More »

बिजगर्णीत दोन गटांत वादावादी; सहा जणांवर गुन्हे दाखल

  बेळगाव : पुढील वर्षी बिजगर्णी (ता. बेळगाव) येथे महालक्ष्मी यात्रा भरविण्याबाबत शुक्रवारी (ता. २०) दुपारी झालेल्या बैठकीतील वादावादीनंतर रात्री पुन्हा दोन गटांत हाणामारी झाली. त्यात काहीजण किरकोळ जखमी झाले. या घटनेनंतर गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. याप्रकरणी सहाजणांवर वडगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. बिजगर्णी गावात यंदा …

Read More »

घरपट्टी वाढीच्या ठरवावरून महानगरपालिकेत आरोप-प्रत्यारोप

  बेळगाव : घरपट्टी वाढीच्या मुद्यावरून महापौरांना आलेल्या कारणे दाखवा नोटीशीमुळे महापालिकेचे राजकारण चांगलेच तापले असून आमदार अभय पाटील आणि पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्यातील संघर्ष वाढला आहे. परिणामी महापालिकेच्या बरखास्तीची शिफारस सरकारकडे करू, अशा इशारा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिला आहे. घरपट्टी वाढीच्या ठरावात मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी फेरफार …

Read More »

तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक उद्या

  बेळगाव : काळादिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. रविवार दिनांक २२ रोजी दुपारी ठिक २.०० मराठा मंदिर (रेल्वेओव्हरब्रिज) येथे हि बैठक आयोजित करण्यात आली आहे. १ नोव्हेंबर १९५६ रोजी सीमाभाग अन्यायाने त्यावेळच्या म्हैसूर व आताच्या कर्नाटक राज्यात डांबण्यात आला. या अन्यायाविरोधात केंद्र सरकारचा …

Read More »

देवस्थान मंडळाकडून सिमोलंघनाच्या कार्यक्रमाला महापौर आणि उपमहापौरांना निमंत्रण

  बेळगाव : मंगळवार दिनांक 24 रोजी विजयादशमी साजरी केली जाणार आहे. या दिवशी बेळगाव शहर मंडळाच्या वतीने सायंकाळी साडे चार वाजता कॅम्प येथील मराठी विद्यानिकेतनच मैदानावर परंपरागत सिमोलंघनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला बेळगावच्या महापौर शोभा सोमनाचे आणि उपमहापौर रेश्मा पाटील यांना बेळगाव शहर देवस्थान मंडळाच्या वतीने …

Read More »