Tuesday , December 16 2025
Breaking News

बेळगाव

स्मृतिदिनी वाहण्यात आली बाळासाहेबांना आदरांजली

  मशाल धगधगती ठेवण्याचे करण्यात आले शिवसैनिकांना आवाहन बेळगाव : बेळगाव जिल्हा शिवसेना (सीमाभाग) यांच्यावतीने शिवसेनाप्रमुख माननीय कै. बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन गांभीर्याने आचरण्यात आला. शिवसेना बेळगाव जिल्हाप्रमुख हणमंत मजुकर यांनी, माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन केले. ज्येष्ठ पत्रकार संजय सूर्यवंशी यांनी दीप प्रज्वलित केला. महाराष्ट्र एकीकरण शहर समितीचे …

Read More »

राष्ट्रीय पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांकडून पालिका कर्मचाऱ्यांना त्रास!

  बेळगाव : राष्ट्रीय पक्षाचे नवनिर्वाचित नगरसेवक व राजकीय नेत्यांच्या त्रासापासून मुक्त करण्याची मागणी महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडे केली आहे. महापालिकेच्या महसूल, आरोग्य, व बांधकाम विभागाचे कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी यांची महत्वपूर्ण बैठक स्थायी समिती सभागृहात झाली. या बैठकीत कर्मचाऱ्यांनी तक्रारींचा पाढाच वाचला. नूतन नगरसेवक व राष्ट्रीय पक्षाचे पदाधिकारी यांच्याकडून त्रास …

Read More »

ऊस दरावरून साखर आयुक्त कार्यालयाला टाळे

  रयत संघटनेचा पवित्रा : दर मिळेपर्यंत आंदोलन सुरूच निपाणी (वार्ता) : ऊसाला प्रतिटन ५५०० रुपये मिळावे यासाठी रयत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांचे तीन महिन्यापासून आंदोलन सुरू आहे. पण या मागणीकडे सरकारचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. ऊस दरप्रश्नी कारखानदारांनी एकजूट केली असून त्याचा फटका ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. यामुळे आक्रमक …

Read More »

यात्रा काळात सोयी सुविधा उपलब्ध करून द्या

  कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेचे प्रशासनाला साकडे बेळगाव : पुढील महिन्यात पाच ते सात डिसेंबर दरम्यान सौंदत्ती येथील श्री रेणुका देवीचे यात्रा संपन्न होत आहे. या पार्श्वभूमीवर यात्रा काळात मोठ्या संख्येने येणाऱ्या सोयी सुविधांची दखल घेत प्रशासनाने योग्य ती व्यवस्था करावी, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेच्या वतीने …

Read More »

रिंगरोड विरोधी मोर्चासंदर्भात म. ए. समितीचे पोलीस आयुक्तांना निवेदन

  बेळगाव : बेळगाव तालुक्याच्या ३४ गावातील शेकडो एकर सुपीक जमीन संपादित करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा रिंग रोड प्रकल्प रद्द करा अन्यथा सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडू असा इशारा देत महाराष्ट्र एकीकरण समितीने येत्या 28 नोव्हेंबरला बेळगावात मोर्चाचे आयोजन केले आहे. रिंगरोडसाठी जमीन संपादित करण्याबाबत राष्ट्रीय महामार्ग मंडळाने एका इंग्रजी …

Read More »

“त्या” वायरल फोटोचे गौडबंगाल काय?

  बेळगाव : विधानसभेची निवडणूक जसजशी जवळ येत चालली आहे तसतसे बेळगावातील राजकारण रंगू लागले आहे. प्रखर हिंदुत्ववादी नेता म्हणून ओळखले जाणारे रमाकांत कोंडुसकर समितीच्या संपर्कात येताच राष्ट्रीय पक्षांच्या नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. रमाकांत कोंडुसकर हे जनतेतील नेते म्हणून ओळखले जातात. रस्त्यावरील त्यांची ताकद प्रचंड आहे. रमाकांत हे …

Read More »

पंडित नेहरू हायस्कूलच्या विद्यार्थीनीची राष्ट्रीय ज्युडो स्पर्धेसाठी निवड

  बेळगाव : कोलार येथे झालेल्या राज्यस्तरीय ज्युडो स्पर्धेत पंडित नेहरू हायस्कूलची इयत्ता 9 ची विद्यार्थीनी कु. ऐश्वर्या गोल्लार हिने 82 किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळविला तसेच कु. कार्तिक पावसकर याने 55 किलो वजन गटात द्वितीय क्रमांक मिळविला. आता ऐश्वर्या गोल्ल्यार हिची निवड दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय ज्युडो स्पर्धेसाठी …

Read More »

सुभाषचंद्रनगर समुदाय भवनाचा वर्धापन दिन उत्साहात

  बेळगाव : शहरातील सुभाषचंद्रनगर येथील सुभाषचंद्रनगर नागरिक संघटनेने बांधलेल्या समुदाय भवनाचा 11 वा वर्धापन दिन भरगच्च कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. समुदाय भवन सभागृहात आयोजित वर्धापन दिन सोहळ्याच्या प्रारंभी राधिका तेंडुलकर यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले. त्यानंतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. उपाध्यक्ष चंद्रशेखर …

Read More »

बालदिनानिमित्त ‘एंजल’तर्फे शाळांमध्ये मिठाई -खाऊचे वाटप

  बेळगाव : शहरातील एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका मीनाताई बेनके यांच्या नेतृत्वाखाली बाल दिनाचे औचित्य साधून शहरातील विविध शाळांमधील मुलांना मिठाई व खाऊचे वाटप करण्यात आले. एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका मीनाताई बेनके यांनी बेळगाव उत्तर मतदारसंघातील सरकारी कन्नड व मराठी शाळांना मिठाईचे वाटप केले. त्याचप्रमाणे त्यांनी फुलबाग गल्ली येथील शाळा नंबर 7, …

Read More »

बेनकनहळ्ळीत रस्ते बांधकामाचा शुभारंभ

  आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते भूमिपूजन बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या बेनकनहळ्ळी गावातील रस्त्यांच्या विकासासाठी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आमदार निधीतून 45 लाख रु. अनुदान मंजूर केले आहे. आज महालक्ष्मी नगर, बेनकनहळ्ळी येथे स्थानिक रहिवाशांच्या उपस्थितीत भूमिपूजन करून रस्त्याच्या बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला. रस्त्यांच्या कामाच्या शुभारंभप्रसंगी आ. लक्ष्मी हेब्बाळकर …

Read More »