बेळगाव : रोजगार हमी योजनेंतर्गत काम करणार्या मजुरांच्या विविध मागण्या पूर्ण कराव्यात या मागणीसाठी बेळगावात गुरुवारी ग्रामीण कुली कामगार संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. ग्रामीण कुली कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली बेळगावात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारी निदर्शने करून आंदोलन करण्यात आले. कुली कामगारांना फेब्रुवारी, मार्च 2021 आणि एप्रिल, मे, जून 2022 या …
Read More »सौंदत्ती तालुक्यातील हुलीकट्टी गावात बिबट्याचा वावर
सौंदत्ती : सौंदत्ती तालुक्यातील हुलीकट्टी गावात जमिनीवर बिबट्याच्या पायाचे ठसे आढळल्याची घटना घडली. बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आल्याने आजूबाजूच्या ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली आहे. हे वृत्त समजताच सौंदत्ती विभागीय वन अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेत बिबट्याच्या पायाचे ठसे शोधून काढले. तसेच, एक विशेष पथक तयार करण्यात आले असून वनविभागाचे कर्मचारी सौंदत्ती …
Read More »जायंटस ग्रुप ऑफ बेलगाम प्राइड सहेलीतर्फे बाईक रॅली
बेळगाव : जायंटस ग्रुप ऑफ बेलगाम प्राइड सहेली यांनी बेळगावमध्ये वाढते प्रदूषण बघून आज कॉलेज रोडपासून संभाजी चौक सर्कल पर्यंत बाईक रॅली काढली. प्रत्येकाने आपल्या बाईकवर सेव पल्युशन बॅनर लावले होते. बाईक रॅलीची सुरुवात अतुल पुरोहित पासून केली व सांगता संभाजी चौकात झाली. सुरुवातीला प्रार्थना झाली. बाईकमुळे होणारे प्रदूषण …
Read More »सक्षम जाधव वाढदिनी आयोजित गोल्डन स्क्वेअर बुद्धीबळ स्पर्धेला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद
बेळगाव : बुद्धीबळ, स्केटिंग, कराटे, क्रिकेट अशा विविध खेळांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविलेल्या सक्षम जाधव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गोल्डन स्क्वेअर बुद्धिबळ अकादमी विशेष एकदिवसीय जलद बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. भाग्यनगर येथील गोल्डन स्क्वेअर बुद्धिबळ अकादमीच्या सभागृहात फिडे तसेच एआयसीएफच्या नियमांनुसार स्विस लीग पद्धतीने ही स्पर्धा खेळविण्यात …
Read More »सुळगा (हिं) रोडवरील अंबिका लॉजवर धाड; 4 जण ताब्यात
बेळगाव : बेळगावात एका लॉजवर धाड टाकून पोलिसांनी वेश्या व्यवसायात असणाऱ्या चौघांना अटक केली आहे. महिला पोलीस स्थानकाच्या टीमने सुळगा हिंडलगा रोडवरील अंबिका लॉजिंग आणि बोर्डिंगवर धाड टाकून वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या चौघांना गजाआड केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिला पोलीस स्थानकाच्या पोलीस निरीक्षक श्रीदेवी पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने लॉजिंगवर …
Read More »पोषण अभियान योजनेची योग्य अंमलबजावणी करण्याची जबाबदारी : आमदार लक्ष्मी हेब्बाळकर
बेळगाव : प्रधानमंत्री पोषण निर्माण अभियानांतर्गत माध्यान्ह न्याहरी योजनेंतर्गत शालेय मुलांना अंडी, केळी आणि शेंगदाणा चक्की वाटपाचा शुभारंभ आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते करण्यात आला. बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील निलजी गावातील शासकीय मराठी प्राथमिक शाळेत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना हेब्बाळकर म्हणाले की, शिक्षणासोबतच माध्यान्ह न्याहरीमुळे मुलांमधील …
Read More »खिळेगाव- बसवेश्वर योजना डिसेंबर अखेर पूर्ण
आ. श्रीमंत पाटील : पुरेपूर निधीसाठी मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन अथणी : खिळेगाव -बसवेश्वर पाणी योजनेसाठी अनुदानाची कमतरता नसून मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन अधिकाऱ्यांना कडक सूचना दिली आहे. आपण दिलेल्या आश्वासनानुसार डिसेंबरअखेरपर्यंत ही योजना पूर्ण करू. अथणी व कागवाड तालुक्यातील शेतकऱ्यांना खिळेगाव-बसवेश्वर योजनेचे पाणी देणे हे आपले स्वप्न आहे आणि ते आपण कोणत्याही …
Read More »आमदारांच्या प्रयत्नामुळे स्मशानभूमीसाठी दोन एकर जागा
उगार बुद्रुकजवळील परमेश्वरवाडी येथे हस्तांतर : आ. श्रीमंत पाटील यांचे ग्रामस्थांतर्फे अभिनंदन कागवाड : कागवाड तालुक्यातील उगार बुद्रुक जवळील परमेश्वरवाडी गावात स्मशानभूमी नव्हती. याची दखल घेऊन माजी मंत्री व कागवाडचे आ. श्रीमंत पाटील यांनी पाठपुरावा केला. त्यामुळे या गावाला 1 एकर 36 गुंठे शेतजमीन शासनाकडून खरेदी करून मिळाली. याचे हस्तांतर …
Read More »आरक्षणाची मागणी, कर्नाटक मराठा फेडरेशनची दिल्लीत धडक
केंद्रीय मंत्र्यांसह विविध मान्यवरांच्या भेटीगाठी बेळगाव : कर्नाटक राज्यातील मराठा समाजाच्या प्रगतीसाठी गेली वीस वर्ष सातत्याने विविध मागण्या केल्या जात आहेत. प्रत्येक सरकार मराठा समाजाला आश्वासने देत आहे. राज्यातील विद्यमान भाजप सरकारच्या यशात मराठा समाजाचे मोलाचे योगदान आहे. त्यामुळे कर्नाटकात मराठा समाजाचा इतर मागास वर्ग – 2 अ (ओबीसी-2 …
Read More »बेळगाव जिल्हा शिवसेनेच्यावतीने उद्धवजींचा वाढदिन उत्साहात
फटाक्यांची आतषबाजी करून करण्यात आले लाडूंचे वाटप बेळगाव : बेळगाव जिल्हा शिवसेनेच्यावतीने लोकमान्य टिळक चौक येथे शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. कुद्रेमानी येथील वयोवृद्ध शिवसैनिक नागोजी कागीणकर यांच्या हस्ते केक कापून उद्धवजींचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी उद्धवजीना दीर्घायुष्य लाभो अशी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta