Monday , September 21 2026
Breaking News

एम.ए. (मराठी) साठी प्रवेश प्रक्रिया सुरू

Spread the love

 

बेळगाव : राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या (Rani Channamma University) मराठी विभागाच्या एमए 2022-23 साठीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. कोणत्याही पदवीचा विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र आहे. प्रवेशासाठी दंडाशिवाय अर्ज भरण्याची अंतिम तारीख 18 नोव्हेंबर आहे. UUCMS (https://uucms.karnataka.gov.in) मध्ये ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत, आधारकार्ड, दहावीचे प्रमाणपत्र, जात आणि उत्पन्न प्रमाणपत्र, पदवीचे प्रमाणपत्र, दोन फोटो यासह विद्यापीठात संपर्क साधावा, अथवा पोस्टाने पाठविल्यास युयुसीएमएसद्वारेच आलेले अर्ज स्वीकारले जातील. अधिक माहितीसाठी मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. चंद्रकांत वाघमारे (9480539762), प्रा. डॉ. मनीषा नेसरकर (9900484161), डॉ. मैजोदिन मुतवल्ली (9972457859), डॉ. संजय कांबळे (9164358489) यांच्याशी संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *