बेळगाव : मुतगा येथील प्राथमिक कृषी पत्तीन सोसायटीत मागील तीन वर्षांपासून शेतकऱ्यांना बिनव्याजी पीक कर्ज देत नसल्याच्या निषेधार्थ तसेच सोसायटीतील गैरव्यवहाराबद्दल श्रीराम सेना हिंदुस्थानचे प्रमुख सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. मागील काही महिन्यांपूर्वी देखील याच मुद्द्यावरून सचिन पाटील यांनी उपोषण केले होते मात्र स्थानिक लोकप्रतिनिधींच्या …
Read More »आर्मी पब्लिक स्कूलची द. विभागीय ज्युडो स्पर्धेत चमकदार कामगिरी
बेळगाव : आर्मी पब्लिक स्कूल, एमएलआयआरसी बेळगावच्या ज्युडो खेळाडूंनी शिर्डी, महाराष्ट्र येथे नुकत्याच पार पडलेल्या सीबीएसई दुसऱ्या दक्षिण विभागीय ज्युडो चॅम्पियनशिप -2025 स्पर्धेमध्ये 12 पदके जिंकत चमकदार कामगिरी नोंदवली असून या शाळेच्या सहा खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. शिर्डी, महाराष्ट्र येथे गेल्या दि. 4 ते दि. 6 ऑगस्ट …
Read More »बेळगावमध्ये नादसुधा सुगम संगीत शाळेचा स्थापना दिन साजरा
नादसुधा बेळगावमध्ये संगीताचा प्रसार करत आहे आणि मुलांमध्ये संगीताची गोडी निर्माण करत आहे – एल.एस. शास्त्री बेळगाव: येथील नादसुधा सुगम संगीत शाळेचा १६ वा स्थापना दिन सोहळा रविवारी शहरातील टिळकवाडी येथील पिंक व्हरांडा जवळील नादसुधा संगीत शाळेत उत्साहात साजरा करण्यात आला. कवी, कलाकार, पत्रकार एल.एस. शास्त्री म्हणाले, नादसुधा सुगम …
Read More »मराठी विद्यानिकेतनमध्ये ग्रंथपाल दिन साजरा
बेळगाव : मराठी विद्यानिकेतनमध्ये ग्रंथपाल दिन साजरा करण्यात आला. 12 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय ग्रंथपाल दिन म्हणून साजरा केला जातो. यादिवशी भारतीय ग्रंथालय चळवळीचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांची जयंती. डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेला प्रमुख पाहुण्या शाळेच्या ग्रंथपाल हर्षदा सुंठणकर यांनी पुष्पहार अर्पण केला. ग्रंथालयाचे महत्व …
Read More »गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीची बैठक उत्साहात संपन्न
विविध स्पर्धां व परीक्षांच्या आयोजनाबाबत चर्चा बेळगाव : गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीची बैठक उत्साहात संपन्न झाली. बैठकीच्या सुरूवातीला उपस्थितांचे स्वागत इंद्रजित मोरे यांनी केले. या बैठकीमध्ये पुढील दोन महिन्यांमध्ये सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांच्या आयोजनाबाबत चर्चा करण्यात आली. यावर्षी गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी रौप्य महोत्सवी वर्ष …
Read More »समादेवी गल्ली परिसरातील अतिक्रमणावर वाहतूक पोलिसांची कारवाई
बेळगाव : समादेवी गल्ली परिसरात वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणावर आज पुन्हा एकदा वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. मोहीमेदरम्यान रस्त्यावर ठेवलेले टेबल, स्टॉल, फळे-भाजीचे टपरे, दुचाकी व इतर अडथळा ठरणाऱ्या वस्तू हटवण्यात आल्या. पुढील काळात पुन्हा अतिक्रमण केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिसांनी यावेळी दिला. कारवाई दरम्यान वाहतूक पोलीस …
Read More »हुक्केरी येथील बाजारपेठेत युवकाचा निर्घृण खून
हुक्केरी : बाजारपेठेत लोकांची वर्दळ सुरू असतानाच धारदार शस्त्रांनी वार करून एका युवकाचा निर्घृण खून करण्यात आला. सोमवारी सकाळी हुक्केरी शहरात घडलेल्या या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. मल्लिक हुसेन किल्लेदार (वय २५) असे मृत युवकाचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार हुक्केरी पेठेत मोटारसायकलवरून जात असताना दोन संशयितांनी हुसेनवर …
Read More »बेकायदा कन्नडसक्तीच्या विरोधात मराठी भाषिकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार!
बेळगाव : सीमाभागात कन्नडसक्ती तीव्र करण्यात येत आहे. कर्नाटक प्रशासन बेळगावसह सीमाभागात संपूर्ण कानडीकरण करीत आहे. त्यासाठी सरकारी कार्यालय, विविध आस्थापने, बस, सरकारी दवाखाने आदी ठिकाणी लावलेले मराठी भाषेतील फलक बेकायदेशीररित्या काढण्यात येत असून या बेकायदा कन्नडसक्ती विरोधात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली मराठी भाषिक जिल्हाधिकारी कार्यालयावर एकवटले. यावेळी …
Read More »दलित तरुणाला झाडाला बांधून बेदम मारहाण; रामदुर्ग येथील घटना
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग तालुक्यातील गोडची गावात एका दलित तरुणाला झाडाला बांधून मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली आहे. जमिनीच्या वादावरून गावातील सवर्ण समुदायातील काही लोकांशी वाद असलेल्या विठ्ठल लक्ष्मण नायकर या तरुणाचे दुचाकीवरून अपहरण करून त्याला झाडाला बांधून मारहाण करण्यात आली. आरोपींनी गॅस पाईप आणि दोरीने त्याला बेदम …
Read More »संत मीरा, गोमटेश, चिटणीस, केएलएस उपांत्य फेरीत
बेळगाव : टिळकवाडी येथील सुभाष चंद्रबोस लेले मैदानावर गोमटेश विद्यापीठ स्कूल आयोजित सार्वजनिक शिक्षण खात्याच्या टिळकवाडी माध्यमिक विभागीय मुलांच्या फुटबॉल स्पर्धेत संत मीरा, गोमटेश, केएलएस, जी जी चिटणीस शाळेने प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. 17 वर्षाखालील मुलांच्या गटातील पहिल्या सामन्यात जी जी चिटणीस शाळेने ओरिएंटल शाळेचा 1-0 …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta