बेळगाव : कावळेवाडी येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्था व राज्य मराठी विकास संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने कावळेवाडी प्राथमिक शाळेत शालेय विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. इ पाचवी ते सातवी व आठवी ते दहावी अशा दोन गटात स्पर्धा घेण्यात आल्या. अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक अविनाश कांबळे …
Read More »‘एसआयआर’च्या नावाखाली मराठी मतदारांवर घाला?
एकाही मराठी भाषिकाचे नाव वगळू देणार नाही; बूथ निहाय यंत्रणा तातडीने उभी करण्याचे महाराष्ट्र एकीकरण समितीचे आदेश बेळगाव : विशेष मतदार यादी पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेच्या माध्यमातून मराठी भाषिक मतदारांची नावे वगळण्याचा कोणताही प्रयत्न यशस्वी होऊ दिला जाणार नाही. प्रत्येक मराठी भाषिक मतदाराचे नाव मतदार यादीत कायम राहावे, यासाठी समितीच्या …
Read More »कृष्णा–पंचगंगा नदीला पूर; दत्त मंदिर परिसरात सतर्कतेचा इशारा
बेळगाव : महाराष्ट्रातील पश्चिम घाट परिसरासह बेळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. परिणामी, दोन्ही नद्यांच्या संगमावर असलेले प्रसिद्ध संगमेश्वर मंदिर पूर्णपणे पुराच्या पाण्यात बुडाले असून, परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या २४ तासांत कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पाणीपातळीत तब्बल …
Read More »व्याजाच्या रकमेसाठी जीवे मारण्याची धमकी, दोघे जेरबंद
बेळगाव : बेकायदेशीररीत्या व्याजाचा धंदा करून कर्जदाराकडून मोठ्या प्रमाणात व्याज वसूल करत जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या दोघा आरोपींना रायबाग पोलिसांनी रविवारी अटक केली. रोहिदास गल्ली येथील विठ्ठल तुकाराम माने यांनी आरोपींकडून ३.१० लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, आतापर्यंत तब्बल १८.६० लाख रुपये व्याजापोटी भरूनही आरोपी आणखी पैशांची मागणी …
Read More »26 व्या वर्षीही अखंड अमरनाथ यात्रेला प्रारंभ; कपिलेश्वर मंदिराच्या वतीने यात्रेकरूंचा सत्कार
बेळगाव : मागील 26 वर्षांची अखंड परंपरा जपत यंदाही बेळगाव शहरातून अमरनाथ यात्रेला उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. सोमनाथ हलगेकर आणि अमित चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अमरनाथ यात्रेसह बद्रीनाथ, केदारनाथ, यमुनोत्री, गंगोत्री तसेच पंचकेदार यात्रा आयोजित करण्यात आली आहे. यावर्षीही गतवर्षीप्रमाणे कपिलेश्वर मंदिराचे सेवेकरी मोठ्या संख्येने या पवित्र यात्रेत सहभागी झाले …
Read More »हिरेण्यकेशी नदीच्या पाणी प्रवाहात वाढ; धुपदाळ जलाशयातून पाण्याचा विसर्ग
बेळगाव : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे हिरेण्यकेशी आणि घटप्रभा नद्यांमध्ये पाण्याची आवक वाढली असून, त्याचा परिणाम म्हणून धुपदाळ जलाशय पूर्ण क्षमतेने भरला आहे. त्यामुळे जलाशयातून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली. रविवारी सकाळी मंत्री जारकीहोळी यांनी घटप्रभा …
Read More »रयत गल्लीत वीजपुरवठा विस्कळीत; संतप्त नागरिकांचा आंदोलनाचा इशारा
बेळगाव : रयत गल्ली परिसरात गेल्या आठ दिवसांपासून सतत वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. कधी कधी रात्री १२ वाजता गेलेली वीज दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजेपर्यंत येत नसल्याची तक्रार स्थानिकांकडून करण्यात येत आहे. वारंवार तक्रारी करूनही समस्या कायम असल्याने जनतेत तीव्र नाराजी पसरली आहे. शहापूर …
Read More »उप्पार गल्ली खासबाग येथे चिंचेचे झाड कोसळून चार घरे उद्ध्वस्त
बेळगाव : गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे बेळगाव शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील खासबाग येथील उप्पार गल्लीत रविवारी एक प्रचंड चिंचेचे झाड मुळासकट उन्मळून पडल्याने चार घरांचे मोठे नुकसान झाले. या घटनेत अनिल मुतकेकर, आनंद भादवणकर, एकनाथ भादवणकर आणि प्रशांत गोरले …
Read More »रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणचा अनोखा उपक्रम; डॉक्टर, सीएंचा गौरव, ‘संपत्ती निर्मिती’वर मार्गदर्शन
बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे “संपत्ती निर्मिती व संवर्धनाची कला” या विषयावरील माहितीपूर्ण परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. यावेळी डॉक्टर्स डे आणि चार्टर्ड अकाउंटंट्स डे निमित्त शहरातील मान्यवर डॉक्टर तसेच एका सनदी लेखापालाचा विशेष सत्कार करून त्यांच्या समाजाप्रतीच्या योगदानाचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात क्लबच्या अध्यक्षा रोटेरियन डॉ. …
Read More »राजे शहाजी महाराज समाधीस्थळाच्या संवर्धनासाठी केंद्रीय समिती स्थापन करा : खासदार धैर्यशील माने यांना निवेदन
बेळगाव : आज ५ जुलै २०२६ रोजी खासदार धैर्यशील माने यांच्या कोल्हापूर येथील निवासस्थानी झालेल्या या बैठकीला बेळगाव महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुसकर यांच्यासोबतच सागर पाटील, आनंद आपटेकर आणि राजेंद्र बैलूर हे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्तेही उपस्थित होते. या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत दावणगेरे (होदगीरे) येथील राजे शहाजी महाराज …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta