

बेळगाव : तामिळनाडूतील ऐतिहासिक तंजावर येथे दि. २३ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित १ ले सरफोजीराजे भोसले द्वितीय मराठी साहित्य संमेलनासाठी बेळगाव सीमाभागातून साहित्यिक व साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याच्या दृष्टीने नियोजन बैठक घेण्यात आली.
या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून डॉ. शरद गोरे भूषविणार आहेत.
अखिल भारतीय साहित्य परिषदेतर्फे आयोजित या साहित्य संमेलनात सीमाभागातील शिवसंदेश भारत तसेच अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, बेळगावचे सदस्य सहभागी होणार आहेत. मराठी साहित्य, संस्कृती व इतिहासाची समृद्ध परंपरा तंजावरशी जोडलेली असल्याने या संमेलनाला विशेष महत्त्व आहे.
बैठकीस अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, कर्नाटक प्रदेशाध्यक्ष सीमाकवी रवींद्र पाटील, जिल्हाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण, शिवसंत संजय मोरे, डी. बी. पाटील, रमेश भोसले सर, प्रा. मनीषा नाडगौड, स्मिता किल्लेकर, रोशनी हुंद्रे, संजीवनी खंडागळे व पूजा सुतार उपस्थित होते.
यावेळी तंजावर येथील साहित्य संमेलनासाठी सीमाभागातून जाणाऱ्या साहित्यिक व साहित्यप्रेमींच्या प्रवासाचे नियोजन, सहभाग आणि आवश्यक तयारीबाबत चर्चा करण्यात आली.
मराठी साहित्याच्या समृद्ध परंपरेचा जागर आणि सीमाभागातील मराठी साहित्यिकांचा तंजावरच्या ऐतिहासिक भूमीवर सहभाग या उद्देशाने मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.
अधिक माहितीसाठी संपर्क : 9591929325

Belgaum Varta Belgaum Varta