

बेळगाव : येळ्ळूर रस्त्यावर बेवारस कुत्र्यांच्या वाढत्या वावरामुळे नागरिक आणि वाहनधारकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. जागतिक छायाचित्रण दिनाच्या निमित्तानेच जणू बेवारस कुत्र्यांनी येळ्ळूर रस्त्यावर ‘रास्तारोको’ केल्याचा प्रकार बुधवारी पाहायला मिळाला.
रस्त्याच्या मध्यभागी जवळपास अर्धा तास कुत्र्यांचा कळप ठाण मांडून बसल्याने वाहनधारकांना रस्ता मोकळा होण्याची प्रतीक्षा करावी लागली. कुत्री जोरजोरात भुंकत असल्याने अनेक महिला वाहनधारक घाबरून काही अंतरावरच वाहने थांबवत होत्या. तर काही पुरुषही कुत्री बाजूला होईपर्यंत रस्ता पार करण्याचे टाळत होते.
बेवारस कुत्र्यांचा वाढता उपद्रव नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न बनला असून, महापालिका प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

Belgaum Varta Belgaum Varta