Thursday , August 20 2026
Breaking News

श्रावणानिमित्त बंगळूर-बेळगाव-बंगळूर एक्स्प्रेसच्या दोन फेऱ्यांना आजपासून सुरुवात

Spread the love

 

बेळगाव : श्रावण महिन्यानिमित्त गावी येणाऱ्या नोकरदारांसह प्रवाशांची सोय व्हावी, यासाठी नैऋत्य रेल्वेने बंगळूर-बेळगाव-बंगळूर एक्स्प्रेसच्या दोन विशेष फेऱ्यांची घोषणा केली आहे. या विशेष फेऱ्यांना आज, गुरुवार दि. २० ऑगस्टपासून सुरुवात होत असून रेल्वेचे बुकिंगही सुरू झाले आहे.

बंगळूरहून बेळगावकडे येणारी एक्स्प्रेस २० आणि २२ ऑगस्ट रोजी धावणार आहे. ही रेल्वे बंगळूर येथील एसएमव्हीटी रेल्वे स्थानकातून सायंकाळी ७ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ८.२५ वाजता बेळगाव येथे पोहोचेल.

तर परतीच्या प्रवासात बेळगाव-बंगळूर एक्स्प्रेस २१ आणि २३ ऑगस्ट रोजी धावणार आहे. बेळगाव रेल्वे स्थानकातून ही गाडी सायंकाळी ५.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजता बंगळूर येथे पोहोचेल.

श्रावण महिन्यात अनेक नोकरदार आणि नागरिक गावी ये-जा करत असल्याने रेल्वे प्रवाशांची संख्या वाढते. या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या दोन विशेष फेऱ्यांमुळे बंगळूर-बेळगाव मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. प्रवाशांनी उपलब्ध वेळापत्रक आणि आरक्षणाची माहिती तपासून प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

गणेशोत्सव-ईद-ए-मिलाद पूर्वी पोलिसांचा दणका!

Spread the love  टिळकवाडी पोलिसांकडून सहा संशयितांवर बीएनएसअंतर्गत कारवाई; समाजकंटकांवर पोलिसांची करडी नजर बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *