

बेळगाव : नुकत्याच बेंगलोर येथील केन्सिंगटन जलतरण तलावात संपन्न झालेल्या कर्नाटक राज्य संघटनेच्या सब ज्युनिअर, ज्युनिअर डायव्हिंग स्पर्धेत बेळगाव आबा हिंद स्पोर्ट्स क्लबचे जलतरणपटूनी उत्कृष्ट कामगिरी करताना तीन वैयक्तिक चॅम्पियनशिप व जनरल चॅम्पियनशिपसह सहा सुवर्ण एक रौप्य एक कांस्य अशी आठ पदके मिळविली.
17 वर्षाखालील गटात कुमार युवराज मोहनगेकर याने वन मीटर व थ्री मीटर स्प्रिंग बोर्ड मध्ये 2 सुवर्णपदक तसेच वैयक्तिक चॅम्पियनशिप मिळवली त्याचबरोबर 14 वर्षाखालील गटात कुमार अर्णव चिवटे याने वन मीटर व तीन मीटर स्प्रिंग बोर्ड मध्ये 2 सुवर्णपदक व वैयक्तिक चॅम्पियनशिप मिळवली, त्याचबरोबर कुमारी तन्वी मुचंडी हीने तीन मीटर स्प्रिंग बोर्ड एक सुवर्ण पदक तर वन मीटर स्प्रिंग बोर्ड मध्ये एक रौप्य पदक पटकावून वैयक्तिक चॅम्पियनशिप मिळवली. त्याचबरोबर कुमारी श्रेया जोगमनावर हिने वन मीटर स्प्रिंग बोर्ड मध्ये सुवर्णपदक पटकाविले. तसेच तीन मीटर स्प्रिंग बोर्ड मध्ये कुमारी ओवी जाधव हिने कांस्यपदक पटकाविले.
वरील सर्व डायव्हिंगपटूंना आबा हिंदी स्पोर्ट्स क्लबचे एन आय एस जलतरण प्रशिक्षक श्री. विश्वास पवार, भरत पाटील यांचे बहुमोल मार्गदर्शन तसेच बेळगाव दक्षिणचे आमदार श्री अभय पाटील, नगरसेवक नितीन जाधव, नगरसेवक जयंत जाधव, आबा स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष शितल हुलभते, हिंद स्पोर्ट्सचे अध्यक्ष श्री. अरविंद संगोळी यांचे प्रोत्साहन लाभते.
कुमार युवराज मोहनगेकर, अर्णव चिवटे, श्रेया जोगमनावर व तन्वी मुचंडी यांची 7 ते 12 सप्टेंबर रोजी इंदोर, मध्य प्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय ड्रायव्हिंग स्पर्धेसाठी कर्नाटक राज्य संघात अभिनंदनीय निवड झाली आहे.

Belgaum Varta Belgaum Varta