Thursday , August 20 2026
Breaking News

गणेशोत्सव-ईद-ए-मिलाद पूर्वी पोलिसांचा दणका!

Spread the love

 

टिळकवाडी पोलिसांकडून सहा संशयितांवर बीएनएसअंतर्गत कारवाई; समाजकंटकांवर पोलिसांची करडी नजर

बेळगाव : गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद हे सण शांततेत पार पडावेत, सणासुदीच्या काळात कोणत्याही अनुचित घटना घडू नयेत आणि शहरातील कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी बेळगाव पोलीस आयुक्तालयाने प्रतिबंधात्मक कारवाईचा धडाका सुरू केला आहे.

या पार्श्वभूमीवर टिळकवाडी पोलिसांनी जुन्या रावडी शूटरसह गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या सहा संशयितांवर भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अंतर्गत प्रतिबंधात्मक गुन्हे दाखल केले आहेत.

कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये हरीओम अनंत खाडे (४०, आनंदवाडी), प्रकाश ऊर्फ बाळूमामा ऊर्फ लाला पवार (४२, नाथ पै नगर, अनगोळ), अरपात सुब्बानी माचेकर (राजहंस गल्ली, अनगोळ), शादाब अब्दुलगणी मकानदार (राजहंस गल्ली, अनगोळ), कैफ समीर कातगी (राजहंस गल्ली, अनगोळ) आणि नितीन पांडुरंग पेडणेकर (४४, भाग्यनगर, अनगोळ) यांचा समावेश आहे.

सणांच्या काळात समाजकंटकांकडून वातावरण बिघडविण्याचा कोणताही प्रयत्न होऊ नये, किरकोळ वादाचे रूपांतर गंभीर घटनांमध्ये होऊ नये आणि संवेदनशील परिस्थिती निर्माण होण्यापूर्वीच त्यावर नियंत्रण मिळवता यावे, यासाठी पोलिसांनी रेकॉर्डवरील संशयितांवर लक्ष केंद्रित केले आहे.

दरम्यान, पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारितील इतर पोलीस ठाण्यांकडूनही पोलीस रेकॉर्डवरील संशयित आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर शहरातील पोलिसांची गस्त, बंदोबस्त आणि संशयितांवरील निगराणी अधिक कडक होणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

हिंडलगा कारागृहात वेश्याव्यवसाय आणि अवैध धंदे; तरुणाकडून पर्दाफाश

Spread the love  बेळगाव : हिंडलगा कारागृह पुन्हा एकदा चर्चेत आले असून, कारागृहातील कथित गैरप्रकारांबाबत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *