Monday , September 21 2026
Breaking News

बेळगाव

मुसळधार पावसामुळे बेळगाव शहर, बेळगाव तालुका, खानापूर व निपाणी मधील शाळांना उद्या सुट्टी

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी बुधवार, ८ जुलै २०२६ रोजी बेळगाव शहर, बेळगाव तालुका, खानापूर व निपाणी तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील सर्व अंगणवाडी केंद्रे, प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच पीयूसी (बारावीपर्यंतच्या) महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. गेल्या …

Read More »

मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार ९ जुलैला बेळगाव दौऱ्यावर; विकासकामांचा घेणार आढावा

  सुवर्ण विधानसौधात उच्चस्तरीय बैठक; विविध खात्यांच्या प्रगतीचे करणार परीक्षण, अधिकाऱ्यांना देणार महत्त्वाचे निर्देश बेळगाव : कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे गुरुवार, ९ जुलै रोजी बेळगाव दौऱ्यावर येत असून, बेळगाव प्रादेशिक विभागस्तरीय विविध शासकीय खात्यांच्या कामकाजाचा आणि विकासकामांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेणार आहेत. सुवर्ण विधानसौध येथे होणाऱ्या उच्चस्तरीय बैठकीत …

Read More »

बेळगावात मुसळधार पावसाचा इशारा; संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन हाय अलर्टवर

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्रातील घाटमाथा परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने सर्व यंत्रणांना हाय अलर्टवर राहण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी जिल्हा विपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत संबंधित विभागांना आवश्यक तयारी पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. जिल्ह्यातील नद्यांच्या पाणीपातळीत …

Read More »

“छोट्या-छोट्या गोष्टींत आनंद शोधा, भरपूर हसा; आनंदी जीवनाची गुरुकिल्ली” : डॉ. प्रकाश फडणीस

  बेळगाव: “प्रत्येकाच्या जीवनात ताणतणाव हे असतातच, दुःख कोणालाही चुकलेले नाही, पण त्यातही आनंदी जगण्याचे अनेक पर्याय आपल्याला शोधता येतात, छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद शोधा, भरपूर हसा, हसण्याने तणाव कमी होतातच पण त्याबरोबरच कमालीचे शारीरिक व मानसिक लाभ मिळतात” असे विचार डॉ. प्रकाश फडणीस यांनी बोलताना व्यक्त केले. जायंट्स ग्रुप …

Read More »

धोनीला बेळगावला बोलवा; भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नाकडेही विद्यार्थ्यांचे लक्ष : जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आगळीवेगळी मागणी

  बेळगाव : शहरातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना बेळगावला आमंत्रित करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी आगळीवेगळी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. यावेळी विद्यार्थ्यांनी गेल्या पंधरा दिवसांत जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रशासनाने केलेल्या प्रभावी कार्याचे कौतुक करत जिल्हाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. तसेच शहरातील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या …

Read More »

कणबर्गी शासकीय हायस्कूलमध्ये मासिक पाळी स्वच्छता व्यवस्थापन जनजागृती सत्र

  बेळगाव : रोटरी क्लबच्या वतीने कणबर्गी येथील शासकीय हायस्कूलमध्ये विद्यार्थिनींसाठी मासिक पाळी स्वच्छता व्यवस्थापन (MHM) विषयावरील जनजागृती सत्र आयोजित करण्यात आले. या उपक्रमाचा सुमारे ११० विद्यार्थिनींनी लाभ घेतला. सत्रामध्ये मासिक पाळीदरम्यान आवश्यक स्वच्छता, संतुलित आहार, वैयक्तिक आरोग्याची काळजी आणि सुरक्षिततेबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच विद्यार्थिनींमधील गैरसमज दूर करून …

Read More »

शाळा क्र. १९च्या प्रभारी मुख्याध्यापिका सविता चंदगडकर-निकम यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त कृतज्ञतेचा अविस्मरणीय सोहळा

  बेळगाव : काळाच्या ओघात अनेक चेहरे येतात आणि निघून जातात. मात्र काही व्यक्तिमत्त्वे आपल्या कार्याचा असा अमिट ठसा उमटवून जातात की, त्यांची ओळख केवळ एका पदापुरती मर्यादित राहत नाही, तर ती अनेक पिढ्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनते. विद्यार्थ्यांच्या मनात ज्ञानाची ज्योत प्रज्वलित करत, संस्कारांची बीजे रुजवत आणि शिक्षणाला माणुसकीची …

Read More »

‘एसआयआर’ फॉर्म कन्नडसोबत मराठीतही उपलब्ध करून द्या; सकल मराठा समाज नेते किरण जाधव यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

  बेळगाव : भारत सरकार आणि निवडणूक आयोगाच्या वतीने सध्या देशभरात राबविल्या जाणाऱ्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) मोहिमेच्या पार्श्वभूमीवर, बेळगाव जिल्ह्यातील मराठी भाषिक मतदारांना येणाऱ्या अडचणी दूर व्हाव्यात यासाठी सकल मराठा समाजाचे नेते किरण जाधव यांनी, सोमवार दिनांक ६ जुलै रोजी बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान …

Read More »

निपाणी जवळील तवंदी घाटातील अपघातात दोन जण जागीच ठार

  निपाणी (वार्ता) : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर तवंदी घाटाच्या उतारावर वेगाने येणाऱ्या ट्रकची कारला जोराची धडक बसल्याने भीषण अपघात घडला. या अपघातात कोल्हापूर येथील दोन मेडिकल रिप्रेजेंटिव्ह (वैद्यकीय प्रतिनिधी) जागीच ठार झाले. तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात सोमवारी (ता.६) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास झाला. या अपघाताची भीषणता …

Read More »

खानापूरात पावसाचा कहर; बेळगाव जिल्हा अक्षरशः जलमय!

  सहा दिवसांत विक्रमी २६४.२ मिमी पाऊस; नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले बेळगाव : बेळगाव जिल्ह्यावर पावसाने अक्षरशः धडक दिली असून गेल्या पाच-सहा दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेने जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेषतः खानापूर तालुक्यावर पावसाचा सर्वाधिक मारा झाला असून अनेक ठिकाणी नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. सखल भागात पाणी साचल्याने …

Read More »