बेळगाव : बेळगाव शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, शाहापूर परिसरातील ऐतिहासिक सिद्धार्थ बोर्डिंगची संरक्षण भिंत कोसळल्याची घटना गुरुवारी घडली. शहापूर नाथ पै सर्कलजवळ असलेल्या सिद्धार्थ बोर्डिंगची संरक्षण भिंत सततच्या मुसळधार पावसामुळे अचानक कोसळली. अखंड पावसामुळे भिंतीचा पाया कमकुवत झाल्याने ही दुर्घटना घडल्याचे प्राथमिक माहितीतून समोर …
Read More »जनतेच्या प्रश्नांसाठी सरकार थेट जिल्ह्यात : मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार
मंत्री, आमदारांसह जिल्ह्यातील विकासकामे व नागरिकांच्या समस्यांचा सखोल आढावा; तातडीच्या निर्णयांचे संकेत बेळगाव : राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेऊन स्थानिक प्रश्नांना तातडीने मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारने हाती घेतलेल्या जिल्हा दौऱ्यांतर्गत कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार गुरुवारी बेळगावात दाखल झाले. जिल्ह्यातील विकासकामे, नागरिकांच्या समस्या आणि प्रशासनाच्या …
Read More »सुपीक जमीन रेल्वेसाठी गेली; आता न्याय द्या!
बेळगाव-धारवाड रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार; योग्य मोबदला व कुटुंबातील एकाला नोकरीची मागणी बेळगाव : “विकासाला आमचा विरोध नाही; पण विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांवर अन्याय खपवून घेतला जाणार नाही,” असा ठाम इशारा देत बेळगाव-धारवाड नवीन रेल्वे मार्गासाठी संपादित करण्यात आलेल्या सुपीक शेतजमिनींना न्याय्य मोबदला मिळावा, तसेच जमीन गमावलेल्या प्रत्येक …
Read More »‘बेळगाव कर्नाटकचेच’ म्हणत जिल्हाधिकाऱ्यांचा सरकारला धोरणात्मक अहवाल
मुंबईतील उच्चाधिकार समिती बैठकीनंतर कर्नाटकची प्रतिउत्तरात्मक हालचाल : सीमाभागात संतापाची लाट बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद निर्णायक टप्प्यात असतानाच कर्नाटक प्रशासनाने महत्त्वाची रणनीतिक चाल खेळली आहे. बेळगावचे जिल्हाधिकारी यांनी राज्य सरकारकडे सादर केलेल्या धोरणात्मक अहवालात “बेळगाव हा कर्नाटक राज्याचा अविभाज्य भाग असून त्यावर कोणताही वाद ग्राह्य धरता येणार नाही,” अशी …
Read More »कल्लोळजवळ कृष्णेचा रौद्रावतार; दत्त मंदिर पाण्याखाली, प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा
चिक्कोडी : महाराष्ट्रातील कोकण आणि पश्चिम घाट परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम आता कर्नाटकच्या सीमाभागातही दिसू लागला आहे. चिक्कोडी तालुक्यातील कल्लोळ गावाजवळून वाहणाऱ्या कृष्णा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून, नदीकाठावरील प्रसिद्ध श्री दत्त मंदिर पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे. सध्या कृष्णा नदीत सुमारे १ लाख ३५ हजार क्युसेक …
Read More »सतीश पाटील यांच्या पाठपुराव्याला यश; चांगळेश्वरीनगर मुख्य रस्त्याच्या दुरुस्तीला प्रारंभ
येळ्ळूर : येळ्ळूर येथील चांगळेश्वरीनगर परिसरातील मुख्य रस्त्याची दुरवस्था दूर करण्यासाठी अखेर ग्रामपंचायतीच्या वतीने दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. माजी ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील यांनी ग्रामपंचायत पीडीओ पूनम गडगे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर बुधवारी (दि. ८) रस्त्यावरील खड्डे बुजवून मुरूम व खडी टाकण्याचे काम हाती घेण्यात आले. त्यामुळे …
Read More »बिजगर्णी शिक्षण संस्थेतर्फे देणगीदारांचा सन्मान
बिजगर्णी : येथील पश्चिम विभाग शिक्षण संस्था व हायस्कूलतर्फे शाळेच्या भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष एस एम जाधव उपस्थित होते. यावेळी गावचे सुपुत्र योगेश निलजकर अमेरिका यांनी सायकली व गणवेश दरवर्षी प्रमाणे यंदाही दिले, एस एम जाधव यांनी इमारतीला रंगकाम व विद्यार्थ्यांना शैक्षणिक …
Read More »बिजगर्णी हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
बिजगर्णी : येथील पश्चिम विभाग शिक्षण संस्था संचलित बिजगर्णी हायस्कूल मध्ये विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप तसेच शैक्षणिक साहित्य दिले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस एम जाधव उपस्थित होते.विद्यार्थिनीनी स्वागत गीत सादर केले. दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. प्रास्ताविक वाय एच पाटील यांनी करून राबवित …
Read More »प्लास्टिकमुक्त बेळगावासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग आवश्यक : मदन बामणे
रोटरॅक्ट क्लब ऑफ बेळगाव साऊथच्या वतीने ‘प्लास्टिक फ्री डे’ निमित्त श्री कलमेश्वर हायस्कूल, सावगाव येथे मदन बामणे यांचे प्रेरणादायी व्याख्यान सावगाव : रोटरॅक्ट क्लब ऑफ बेळगाव साऊथच्या वतीने जागतिक प्लास्टिक फ्री डे निमित्त श्री कलमेश्वर हायस्कूल, सावगाव येथे पर्यावरण जनजागृतीपर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी पर्यावरणप्रेमी व संजीविनी …
Read More »राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत ज्योती सेंट्रल स्कूलच्या मास्टर वेदांतची रौप्यपदकाला गवसणी
बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूल, कॅम्प-बेळगाव येथील राष्ट्रीय जलतरणपटू मास्टर वेदांत आनंद मिसाळे याने कर्नाटक स्विमिंग असोसिएशन आयोजित NRJ State Sub-Junior Swimming Championship 2026–27 या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत 14 वर्षांखालील मुलांच्या 200 मीटर बटरफ्लाय (Butterfly) प्रकारात द्वितीय क्रमांक (रौप्यपदक) पटकावून शाळेच्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta