
बेळगाव : कर्नाटक ज्युदो असोसिएशन, बंगळूर आणि बेळगाव जिल्हा ज्युदो संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ४३व्या कर्नाटक राज्य मिनी व सब-ज्युनियर ज्युदो अजिंक्यपद स्पर्धा २०२६-२७चे उद्घाटन बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ (राजू) सेठ यांच्या हस्ते झाले.
बेळगाव येथील युवा सक्षमीकरण व क्रीडा सभागृहात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यभरातून युवा ज्युदोपटूंनी स्पर्धेत सहभाग घेतला असून, आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करण्याची संधी त्यांना मिळत आहे.
युवा खेळाडूंमध्ये शिस्त, तंदुरुस्ती, आत्मविश्वास आणि क्रीडाभावना विकसित करण्यासाठी अशा स्पर्धा महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
उद्घाटनप्रसंगी आमदार आसिफ सेठ यांनी युवा खेळाडूंना शुभेच्छा देत, पूर्ण क्षमतेने खेळावे, शिस्त कायम राखावी आणि क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.
यावेळी स्पर्धेचे आयोजक, क्रीडा अधिकारी, प्रशिक्षक, खेळाडू तसेच विविध मान्यवर उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta