
बेळगाव : श्री तुकाराम को- ऑपरेटीव्ह बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक 23/08/2026 रोजी बँकेच्या श्रीमान अर्जुनराव मेघोजीराव दळवी सभागृहात बँकेचे चेअरमन श्री. प्रकाश आ. मरगाळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
बँकेचे मॅनेजर श्री. संकोच कुंदगोळकर यांनी बँकेच्या वतीने उपस्थित सर्व सभासदांचे स्वागत केले. व अहवाल साली बँकेच्या मयत झालेल्या सभासद व हितचिंतक यांना शांती लाभावी म्हणून संचालक मंडळ, सभासद व कर्मचारी वमनि दोन मिनिटे शांतता पाळून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
त्यानंतर बँकेचे ज्येष्ठ संचालक श्री. प्रदीप ओऊळकर यांनी वार्षिक अहवाल वाचन केले. व बँकेचे असिस्टंट मॅनेजर श्री. प्रविण पाटील यांनी 17/08/2025 रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचन केले. सभासदांनी एक मताने इतिवृत्तास मान्यता दिली.
शाखा प्रबंधक श्री. सागर हावळाणाचे यांनी ताळेबंद व नफा-तोटा पत्रक सादर केले. लोन सुप्रिडेड श्री. रणजित शिंदे यांनी सन 2026-2027 सालाचे अंदाजपत्रक सादर केले. बँकेचे आकौंटंट श्री. संदीप मोरे यांनी लेखा परिक्षण अहवालाचे वाचन केले. यावर सभासदांनी चर्चा करून व मौलीक सुचना करून सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.
बँकेचे ज्येष्ठ सभासद श्री. शिवाजी तारीहाळकर, श्री. रघुनाथ बांडगी, श्री. देवकुमार बिर्जे आदिनी बँकेच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले व शैक्षणिक कर्जासाठी अल्प व्याज दरात कर्ज उपलब्ध करून देणे आणि हृदय शस्त्रक्रियेकरीता रू. 150000/- चे कर्ज द्यावे अशा मौलीक सुचना मांडल्या. सदर सुचनांची नोंद घेण्यात आली. चेअरमन श्री. प्रकाश मरगाळे यांनी बँकेच्या प्रगतीचा आढावा घेऊन सभासदांनी दिलेले सहकार्य व दाखविलेला विश्वास याबद्दल समाधान व्यक्त केले.
बैंकचे संचालक श्री. राजेंद्र पवार यांनी आभार प्रदर्शन केले. या सभेस व्हा. चेअरमन श्री. नारायण पाटील, श्री. संजय बाळेकुंद्री, श्री. प्रविण जाधव, श्री. विजय पाटील, श्री. महादेव सोंगाडी, श्री. सुनिल आनंदाचे, श्री. संदीप मुतकेकर, श्री.राजू मरवे, सौ. वंदना अ. धामणेकर, श्रीमती पल्लवी सरनोबत व श्री. विनोद आंबेवाडीकर, तसेच सभासद गोपाळ हंडे, लक्ष्मण गणू मेणसे, महेंद्र माने, शिवाजी हावळाणाचे, मिलिंद अनगोळकर, बाबू कोले, वैजनाथ पाटील, कालाप्पा नाकाडी आदि मान्यवर सभासद उपस्थित होते. बँकेचे मॅनेजर श्री. संकोच कुंदगोळकर यांनी सूत्रसंचालन केले.

Belgaum Varta Belgaum Varta