Monday , August 24 2026
Breaking News

दिल्लीमध्ये झालेल्या कार अपघातात आमदार अभय पाटील जखमी

Spread the love

 

 

दिल्ली : बेळगाव दक्षिण मतदारसंघाचे आमदार अभय पाटील यांच्या कारला रविवारी रात्री दिल्ली येथे भीषण अपघात झाला. या अपघातात आमदार अभय पाटील यांच्यासह कारमधील सर्वजण किरकोळ जखमी झाले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.

दिल्लीतील ए.पी. एस्टेट परिसरातील रस्त्यावर रविवारी रात्री सुमारे ९.३० वाजता इनोव्हा आणि स्विफ्ट कारमध्ये अपघात झाला. इनोव्हा कारमध्ये दिल्लीतील किरारी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अनिल झा आणि बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील हे होते.

दरम्यान, स्विफ्ट कार लक्ष्मी नगरकडून येत असताना तिची धडक रस्त्याच्या दुभाजकाला बसली. त्यानंतर कार रेलिंग ओलांडून समोरून येणाऱ्या इनोव्हा कारवर आदळली.

या अपघातात स्विफ्ट कारमधील ३२ वर्षीय अभिषेक पांडे यांच्यासह काही जण जखमी झाले. अपघातानंतर जखमींना तातडीने एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अपघातामुळे रस्त्यावर निर्माण झालेला अडथळा दूर करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास दिल्ली पोलिसांकडून सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

ज्येष्ठ नागरिक सोसायटीतर्फे ज्ञान व मनोरंजनाचा कार्यक्रम उत्साहात

Spread the love  बेळगाव : बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रामार्फत ज्ञान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *