बेळगाव : अलीकडे पडलेल्या मुसळधार पावसामुळे भात पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यासाठी सरकारने शेतकर्यांना प्रति एकर 50 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे करण्यात आली आहे. बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांच्या नेतृत्वाखाली आज शुक्रवारी सकाळी उपरोक्त मागणीचे …
Read More »जगजंपी ’हॅपी होम’ योजनेत सामील होण्याची संधी : मल्लिकार्जुन जगजंपी यांचे आवाहन
बेळगाव : 50 ते 60 वर्षापर्यंतच्या नागरिकांना आपले भावी जीवन सुखाने जगता यावे याकरिता बेळगावपासून 11 कि.मी. अंतरावर असलेल्या बेळगुंदी गावानजीक निसर्गरम्य वातावरण असलेल्या सुमारे साडेचार एकर जागेत 155 फ्लॅटस् तयार करण्यात येणार असून या योजनेत नागरिकांनी सहभागी होऊन या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जगजंपी बजाज उद्योग समूहाचे मालक …
Read More »आरपीडी कॉलेजची कार्यशैली लक्ष्यवेधी
बेळगाव : एसकेई सोसायटीचे राणी पार्वती देवी महाविद्यालय हे बेळगावातील प्रसिद्ध आणि नामवंत महाविद्यालय. उत्तम शैक्षणिक दर्जा, कुशल आणि दर्जेदार प्राध्यापक वृंद, भव्य आणि निसर्गरम्य व नॅककडून ‘अ’ – श्रेणी प्राप्त महाविद्यालय, उत्तम शिक्षण, सुंदर परिसर, भव्य क्रीडांगण, अद्ययावत आणि भव्य ग्रंथालय अशा सर्व सोयीनी युक्त असे महाविद्यालय अशा अनेक …
Read More »बस सेवा सुरळीत करण्याची तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची मागणी
बेळगाव : शाळा-महाविद्यालयीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यामुळे बेळगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील कोलमडलेली बससेवा विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून तात्काळ सुरळीत करण्यात यावी आणि आवश्यक ठिकाणी अतिरिक्त बसेसची सोय करावी, अशी मागणी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे करण्यात आली आहे. बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांच्या नेतृत्वाखाली …
Read More »नियती फौंडेशनकडून गरीब विद्यार्थिनीला लॅपटॉप भेट
बेळगाव : डिप्लोमा आर्किटेक्चरच्या एका गरीब विद्यार्थिनीला बेळगावातील नियती फौंडेशनच्या वतीने अभ्यासासाठी लॅपटॉप भेट देण्यात आला. नियती फौंडेशनचे डॉ. समीर सरनोबत आणि डॉ. सोनाली सरनोबत यांच्या पुढाकारातून एका गरीब विद्यार्थिनीला अभ्यासासाठी लॅपटॉप भेट देऊन मदतीचा हात देण्यात आला. बेळगावातील वसंतराव पोतदार पॉलिटेक्निकमध्ये डिप्लोमा आर्किटेक्चर इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षात शिकत असणारी वैष्णवी …
Read More »तालुका समितीच्यावतीने नुकसान भरपाईसाठी उद्या निवेदन
बेळगाव : गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे भात पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत योग्य ती नुकसान भरपाई द्यावी याकरिता तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे उद्या म्हणजे शुक्रवारी दिनांक 26 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकार्यांना निवेदन सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकरी, आजी-माजी लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी निवेदन देण्याकरिता उपस्थित राहावे असे आवाहन …
Read More »बायपासची स्थगिती कायम; शेतकर्यांना दिलासा
बेळगाव : वादग्रस्त हलगा-मच्छे बायपास रस्त्यासंदर्भात आज झालेल्या न्यायालयीन सुनावणीप्रसंगी शेतकर्यांच्या हरकत अर्जातील मुद्दे पटल्याने आणि शेतकर्यांची बाजू भक्कमपणे मांडण्यात आल्यामुळे बायपासच्या कामावरील स्थगिती आदेश न्यायालयाने पुन्हा य कायम केला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे शेतकर्यांची बाजू भक्कम असल्याचे परत एकदा स्पष्ट झाले असून त्यामुळे शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे. हलगा-मच्छे बायपास …
Read More »आक्षेपार्ह सीडी प्रकरण; पोलीस आयुक्त, डीसीपी, निरीक्षकांविरुद्ध एफआयआर
शहर न्यायालयाचा आदेश, पोलिस अधिकार्यांची उच्च न्यायालयात धाव बंगळूर : शहर न्यायालयाने कब्बन पार्क पोलिसांना बंगळुरचे पोलीस आयुक्त कमल पंत, डीसीपी (मध्य) एम. एन. अनुचेत आणि कब्बन पार्क पोलीस ठाण्याचे निरीक्षक बी. मारुती यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत. सामाजिक कार्यकर्ते दिनेश कल्लहळ्ळी यांनी 2 मार्च 2021 रोजी तत्कालीन मंत्री …
Read More »….तब्बल 66 वैद्यकीय विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह!
हुबळी : महाविद्यालयात आयोजित केलेल्या एका कार्यक्रमामुळे कोरोना संसर्गाचा उद्रेक होऊन हुबळीच्या एसडीएम वैद्यकीय महाविद्यालयातील जवळपास 66 विद्यार्थी कोरोना बाधित झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. यामुळे प्रशासन हादरले असून महाविद्यालयातील कार्यक्रमात सुमारे 200 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. जिल्हाधिकारी नितीश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज गुरुवारी सकाळी 10 वाजेपर्यंत जवळपास …
Read More »पराभवाचे खापर जारकीहोळींच्या माथ्यावर….!
संकेश्वर (प्रतिनिधी) : बेळगांव विधान परिषद निवडणुक हार-जीतचा फैसला जारकीहोळी बंधुंवर असल्याचे सांगितले जात आहे. भाजप आणि काँग्रेस पक्षाने पराजयाची खापर जारकीहोळी बंधुंवर फोडण्याचा इरादा पक्का केलेला दिसत आहे. बेळगांव विधानपरिषदची निवडणूक तशी तिरंगी अत्यंत चुरशीने होणार आहे. निवडणुकीत भाजपाने महांतेश कवठगीमठ यांना तर काँग्रेसने चन्नराज हट्टीहोळी यांना आखाड्यात उतरविले …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta