Sunday , December 7 2025
Breaking News

महाराष्ट्र

माणगाव येथे उघड्यावर पडलेल्या विसर्जित गणेश मूर्तींचे कार्यकर्त्यांकडून पून्हा विसर्जन

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : माणगाव (ता. चंदगड) येथील ताम्रपर्णी नदित विसर्जित केलेल्या गणेश मूर्त्या पाणी पातळी कमी झाल्याने उघड्यावर पडलेल्या होत्या. पण माणगाव येथील कार्यकर्त्यांकडून या सर्व गणेश मूर्तीचे पून्हा नदिमध्ये विसर्जन करण्यात आल्याने गणेश मूर्तींची होणारी विटंबना टळली.येथील नदिपात्रात गणेश विसर्जन केले गेले. यानंतर जवळपास सर्वच गणेश मुर्त्या …

Read More »

नरेंद्र दाभोलकर प्रकरणात अखेर आरोप निश्चिती; आरोपींनी आरोप फेटाळले

पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला आठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर बुधवारी गुन्ह्यातील पाच आरोपींवर दोषारोप निश्चित करण्यात आले. डॉ. विरेंद्रसिंह तावडे, शरद कळसकर, सचिन अंदुरे, विक्रम भावे, ऍड. संजीव पुनाळेकर यांच्यावर ही आरोप निश्चिती करण्यात आली. विशेष न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी ही आरोप निश्चिती केली. …

Read More »

तुर्केवाडी येथील अमन शेखने पटकावले सुवर्णपदक

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : भारतीय मिशन ऑलिम्पिक खेल संघ द्वारा मध्य प्रदेश येथील उजैन येथे घेण्यात आलेल्या चौथ्या नॅशनल चॅम्पियनशिप 2021 ऑगस्टमध्ये कबड्डी या खेळ प्रकाराततुर्केवाडी तालुका चंदगड येथील अमन सलाउद्दीन शेख याने सुवर्णपदक प्राप्त करून तालुक्याचे व महाराष्ट्र राज्याचे नाव राष्ट्रीय पातळीवर गाजविलेबद्दल त्याचे अभिनंदन होते आहे.त्याचबरोबर अमनला …

Read More »

डी. बी. पाटील शैक्षणिक विचारमंचाच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रातील अनेक प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील : एस. डी. लाड

चंदगड (रवी पाटील) : कै. शिक्षणतज्ञ डी. बी. पाटील सर ही एक व्यक्ती नसून विचार आहे तो मरू देणार नाही. सध्या शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक समस्या आहेत व त्यामुळे मरगळ आलेली असून ती दूर करण्याचा प्रयत्न डी. बी. पाटील शैक्षणिक विचार मंच नक्कीच करेल अशी ग्वाही मार्गदर्शक एस. डी. लाड यांनी …

Read More »

नामदेव पत्ताडे यांना ‘ऑगस्ट क्रांती पुरस्काराने’ सन्मानित…

चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : एलआयसी विमा या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल कोल्हापूर विभागातील गडहिंग्लज शाखेचे विमा प्रतिनिधी नामदेव धोंडीबा पत्ताडे यांना नुकताच ‘ऑगस्ट क्रांती पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले. नामदेव पत्ताडे हे चंदगड तालुक्यातील विंझणे या गावचे विमा प्रतिनिधी म्हणून मागील १० वर्षांपासून काम करत असताना, त्यांनी गाव-खेड्यातील लोकांना विम्याचे महत्त्व, …

Read More »

वर्गमित्रानी घडविले माणुसकीचे दर्शन…

मित्राच्या निधनानंतर संवगड्यानी केली मदत चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : तडशींनहाळ गावातील तरुण कै.मोहन कांबळे यांचे गेल्या जून महिन्यात निधन झाले. अचानक त्यांच्या जाण्याने त्यांचा कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांच्या पश्चात आई वडील, पत्नी, २ मुली आहेत. वरील झालेली दुर्देवी घटना समजताच कधी काळी आपल्या सोबत खेळणारा आणि एकाच डब्यातील भाकरी …

Read More »

सरपंच नितीन नारायण पाटील यांना सामाजिक सेवेचा आंतरराज्य पुरस्कार जाहीर

चंदगड (प्रतिनिधी) : नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन व हेल्थ अँड नेचर डेव्हलोपमेंट सोसायटी बेळगाव यांच्यावतीने नुकताच आंतरराज्य पुरस्कार जाहीर करण्यात आले. यामध्ये शिनोळी बुद्रुक तालुका चंदगड येथील सरपंच नितीन नारायण पाटील यांना समाजसेवेचा आंतरराज्य पुरस्काराची घोषणा करण्यात आली. कर्नाटक महाराष्ट्र गोवा या तीन राज्यातून कार्यकर्तृत्व सिद्ध केलेल्या विशेष व्यक्तींना प्रत्येक …

Read More »

चंदगड भूषण पुरस्कार प्रांताधिकारी विजया पांगारकर यांना प्रदान

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट समजला जाणारा चंदगड भूषण पुरस्कार 2020-21 सालाकरिता गडहिंग्लज येथील उपविभागीय अधिकारी विजया पांगारकर यांना प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी रोजगार हमी मंत्री भरमू अण्णा पाटील होते. रोखठोक आवाजाचे संपादक व निवड कमिटीचे अध्यक्ष अ‍ॅड. संतोष मळवीकरसह कमिटीने नियोजन केले. यावेळी प्राध्यापक सुनील …

Read More »

आरटीपीसीआर रद्द करावे

चंदगडवासीयांकडून रास्ता रोको आंदोलन… चंदगड (वार्ता) : सीमाभागवासीयांबद्दल महाराष्ट्र व कर्नाटकमध्ये चाललेला वाद हा नवा नाही. पुन्हा एकदा कर्नाटक सरकारच्या जाचक अटीमुळे चंदगड सीमाभागवासीयांवर अन्याय होताना पहायला मिळत आहे. कोल्हापुरातील चंदगड शिनोळी येथे चंदगडवासीयांकडून आर.टी.पी.सी.आर रद्द करावे या मागणीसाठी वेंगुर्ला रोडवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. चंदगड तालुक्यापासून अगदी ठराविक …

Read More »

यड्राव येथे दीड वर्षाच्या मुलीचे भटक्या कुत्र्यांनी तोडले लचके

यड्राव (जि. कोल्हापूर) : यड्राव येथील रेणुका नगरमध्ये पटांगणात खेळणाऱ्या बालिकेवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केले. भटक्या कुत्र्यांनी तिचे डोके, मान व डाव्या हाताच्या दंडाचे लचके तोडून गंभीर जखमी केले. मनस्वी अक्षय गायकवाड (वय दीड वर्षे) असे तिचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास यड्राव येथील रेणुकानगर दक्षिण भागात …

Read More »