Sunday , September 8 2024
Breaking News

Uncategorized

इनोव्हा कार अपघातातून निडसोसी स्वामीजी सुखरुप बचावले

अपघातात कार चालक, दोघे शिष्य किरकोळ जखमी संकेश्वर (महंमद मोमीन) : निडसोसी मठाचे चालते-बोलते देव समजले जाणारे पंचंम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींच्या इनोव्हा कार पलटी होऊन झालेल्या अपघातात निडसोसी मठाचे पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजी बालबाल सुखरुप बचावले आहेत. कार चालक रमेश माळी आणि कार मधील श्रींचे दोघे शिष्य किरकोळ जखमी झाले …

Read More »

संभाजीराजे छत्रपतींना पोलंड सरकारकडून मुख्य अतिथी म्हणून आमंत्रण

कोल्हापूर : संभाजीराजे छत्रपती यांना ३ ते ६ जुलै २०२२ या कालावधीत पोलंड देशाची राजधानी वॉर्सा येथे होणाऱ्या विशेष सोहळ्यास मुख्य अतिथी म्हणून आमंत्रित केले आहे. “आझादी का अमृत महोत्सव” अंतर्गत भारत सरकार व पोलंड सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने दोन राष्ट्रांतील संबंध वृद्धींगत करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. …

Read More »

रोटरी क्लब ऑफ बेळगावचा अधिकार ग्रहण समारंभ संपन्न

बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगावच्या अध्यक्ष आणि नवीन संचालक मंडळाचा अधिकार ग्रहण समारंभ नुकताच फौंड्री क्लस्टर येथे आयोजित एका भव्य समारंभात झाला. अध्यक्षीय बॅटन नूतन अध्यक्ष बसवराज विभूती यांना देण्यात आले. अक्षय कुलकर्णी यांनी सचिव म्हणून तर खजिनदार म्हणून शैलेश मांगले यांनी पदभार स्वीकारला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रोटरीचे सन …

Read More »

“अरिहंत”च्या माध्यमातून सर्वसामान्यांचे हित

युवा नेते उत्तम पाटील : निपाणी शाखेचा वर्धापन दिन निपाणी (वार्ता) : ग्रामीण भागातील शेतकरी, व्यवसायिक सर्वसामान्य नागरिक आणि कष्टकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून बोरगाव येथे अरिहंत क्रेडिट सौहार्द संस्थेची स्थापना केली. त्याच्या माध्यमातून निपाणी शहर आणि ग्रामीण भागात शाखा सुरू करून गरजवंतांना वेळोवेळी कर्जपुरवठा केला. त्यामुळे अनेकांचे जीवनमान उंचावण्यास हातभार …

Read More »

एकनाथ खडसे- सचिन आहिर यांना मंत्रिपदाची लॉटरी लागणार?

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ खडसे आणि सचिन आहिर यांचा विधान परिषद निवडणूकीत विजय झाला. पहिल्या फेरीनंतर एकनाथ खडसे यांना 29 तर सचिन आहिर यांना 26 मते मिळाली. विधान परिषदेत विजयी झाल्यानंतर एकनाथ खडसे आणि सचिन आहिर यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. त्यामागील कारणेही तशीच आहेत… म्हणून सचिन आहिर यांना …

Read More »

हरगापूर येथील आदर्श वाचनालय..

संकेश्वर (महंमद मोमीन) : हरगापूर ग्रामपंचायतने ग्रामस्थांना वाचनालयाची ओढ लावलेली दिसताहे. हरगापूर ग्रामपंचायतचे माजी अध्यक्ष पवन पाटील यांच्या विशेष प्रयत्नांतून हरगापुरात आदर्श वाचनालयाची निर्मिती झालेली दिसत आहे. हरगापूर सार्वजनिक वाचनालय व माहिती केंद्रात वाचकांसाठी हुक्केरीचे आमदार राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्तीं यांनी एक हजार पुस्तके उपलब्ध …

Read More »

मराठी भाषेतून परिपत्रके त्वरित द्या, अन्यथा पुन्हा रस्त्यावर उतरू : दीपक दळवी

बेळगाव : भाषिक अल्पसंख्यांक कायद्यानुसार येत्या 20 दिवसात प्रशासनाने बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषिकांना सरकारी परिपत्रके मराठी भाषेत उपलब्ध करून द्यावीत अन्यथा बेळगावचे प्रशासन ठप्प करण्याची ताकद महाराष्ट्र एकीकरण समितीकडे आहे. लोकशाही मार्गाने केलेल्या आमच्या मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास समिती आपले अस्तित्व दाखविण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा मध्यवर्ती म. ए. समितीचे …

Read More »

मतमोजणी केंद्राची जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्याकडून पाहणी

बेळगाव : जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांनी मंगळवारी शहरातील ज्योती महाविद्यालयाला भेट दिली आणि वायव्य पदवीधर शिक्षक आणि कर्नाटक पश्चिम शिक्षकांच्या निवडणूक मतमोजणी केंद्राची पाहणी केली. केवळ मतमोजणी केंद्रच नव्हे, तर निरीक्षक कक्ष, पोस्टल मतदान कक्ष, माहिती कक्ष यासह विविध कक्षांची स्थापना; तक्त्याची अंमलबजावणी आणि मीडिया सेंटरच्या …

Read More »

विधवांना सन्मानाने जगण्याचा अधिकार देण्याचा हेरवाडचा निर्णय स्वागतार्ह : जिल्हाधिकारी राहुल रेखावार

सर्व ग्रामपंचायतींकडून या निर्णयाची अंमलबजावणी; हीच लोकराजाला आदरांजली ठरेल कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतीशताब्दी वर्षानिमित्त राजर्षी शाहू महाराज यांचे कार्य व त्यांचे विचार यांचा सर्वदूर प्रसार करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात विविध उपक्रम राबविले जात आहेत. राजर्षी शाहू महाराज यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक क्रांतिकारी बदल समाजात घडवून आणले. विधवा …

Read More »

खानापूरात क्षत्रिय मराठा संघटनेच्या गुरूवंदना कार्यक्रमाची तयारी जोरात

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका क्षत्रिय मराठा संघटनेची येत्या दि. 19 मे रोजी होणाऱ्या गुरुवंदना या कार्यक्रमाची तयारी सुरू आहे. यासाठी कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन प्रचार यंत्रणा चालवलेली आहे. तसेच खानापूर रिक्षा असोषेशन च्या कार्य कर्त्यांनी आपापल्या रिक्षावार परम पूज्य श्री. श्री. श्री. मंजुनाथ स्वामी यांच्या फोटोचे अनावरण केले. तत्पूर्वी संघटनेच्या …

Read More »