Tuesday , December 16 2025
Breaking News

Classic Layout

गोधोळी मराठी शाळेत कन्नड शाळेचा घाट थांबवा : विकास आघाडीची मागणी

खानापूर (प्रतिनिधी) : गोधोळी (ता. खानापूर) मराठी शाळेत कन्नड शाळा सुरू करण्याचा प्रयत्न गटशिक्षणाधिकाऱ्यांनी केला असल्याचा खानापूर विकास आघाडीचे अध्यक्ष भरमाणी पाटील यांनी आरोप केला आहे. यासाठी संबंधित शिक्षण खात्याला गोधोळी ग्रामस्थांच्यावतीने निवेदन देऊन गोधोळी मराठी शाळेवर अन्याय झाल्यास खपवुन घेणार नाही, असा ईशाराही भरमाणी पाटील यांनी दिला. निवेदनात म्हटले …

Read More »

कंग्राळी खुर्द येथील पाटील कुटुंबियांनी फडकविला केदारनाथ येथे भगवा!

बेळगाव : कंग्राळी खुर्द येथील श्रीनाथ पाटील आणि विजय पाटील हे कुटुंबिय केदारनाथ आणि बद्रीनाथ येथे गेले असता. पाटील कुटुंबियांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा ध्वज फडकाविला आणि केदारनाथ मंदिरात रुद्राभिषेक घातला. यावेळी पाटील कुटुंबातील सदस्यांनी मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.

Read More »

प्रकाश हुक्केरी यांचा 5055 मतांनी विजय

बेळगाव : विधान परिषदेच्या कर्नाटक वायव्य शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीच्या आज झालेल्या मतमोजणीमध्ये पहिल्या फेरीपासून आघाडी घेत काँग्रेसचे उमेदवार प्रकाश हुक्केरी यांनी 5055 मतांनी विजय संपादन केला. प्रकाश हुक्केरी यांना 11460 मते तर भाजपचे उमेदवार अरुण शहापूर यांना 6405 मते पडली. त्यांनी धुळ चारल्यामुळे आता शिक्षकांच्या समस्या मांडणारा नवा लोकप्रतिनिधी …

Read More »

क्षत्रिय मराठा समाज परिषद खानापूर तालुका अध्यक्ष अभिलाष देसाई यांच्याकडून भरीव देणगी

खानापूर (प्रतिनिधी) : कर्नाटक राज्य क्षत्रिय मराठा समाज परिषदेचे खानापूर तालुका अध्यक्ष अभिलाष देसाई यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधुन मण्णूर येथील शिक्षण खात्याच्या डाएट ट्रेनिग सेंटर कार्यालयाला एक लाख रूपये किमतीची विद्यार्थ्याच्या अभ्यासक्रमाची पुस्तके डाएटचे प्राचार्य श्री. सिंदुर यांच्याकडे सुपूर्द केली. त्यानंतर खानापूर येथील कार्यालयात साधेपणाने वाढदिवसाचे आयोजन केले. यावेळी …

Read More »

मराठी भाषिक वकीलांची कै. अ‍ॅड. मुकुंद परब यांना श्रद्धांजली

बेळगाव : बेळगाव मराठी भाषिक वकील संघटनेचे पहिले अध्यक्ष कै. मुकुंद परब यांची शोकसभा चव्हाट गल्ली येथील श्री जालगार मारुती मंगल कार्यालयामध्ये नुकतीच गांभीर्याने पार पडली. शोकसभेच्या अध्यक्षस्थानी अ‍ॅड. पी. एम. टपालवाले हे होते. प्रारंभी दिवंगत मुकुंद परब यांना दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी बोलताना अ‍ॅड. बालमुकुंद …

Read More »

बसवराज होरट्टी यांचा विजय

प्रकाश हुक्केरी, निराणी यांची आघाडी बेळगाव : पश्चिम शिक्षक मतदार संघात माजी शिक्षण मंत्री सध्या भाजपात आलेले भाजपाचे उमेदवार बसवराज होरट्टी यांनी 4669 मते मिळवत विजय संपादन केला आहे. बसवराज होरट्टी यांना 9266 मते मिळाली तर यांच्याविरोधातील काँग्रेसच्या उमेदवाराला 4597 मते मिळाली आहेत. या विजयाने होरट्टी यांनी आपल्यावरील भ्रष्टाचाराचा आरोप …

Read More »

दुसर्‍या दिवशीही वकीलांचे आंदोलन सुरूच!

बेळगाव : स्टेट कंझ्युमर फोरम कलबुर्गी येथे हलविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र त्याला विरोध करत येथील वकिलांनी मंगळवार दि. 14 जूनला कामावर बहिष्कार घालून तीव्र आंदोलन छेडले. दरम्यान आज बुधवार दि. 15 जून रोजीही हे आंदोलन सुरू आहे. बेळगावमध्ये स्टेट कंझ्युमर आयुक्त फोरम स्थापन करण्यासाठी सरकारने मान्यता दिली होती. …

Read More »

सशस्त्र दलांमधील महिलांची वाढती संख्या प्रेरणादायी

राष्ट्रपती रामनाथ कोविंद, राष्ट्रीय मिलिटरी स्कूलचा अमृत महोत्सव बंगळूर : संरक्षण दलांचे सर्वोच्च कमांडर व राष्ट्रपती रामनाथ कोविंद, यांनी देशाच्या सशस्त्र दलांमध्ये महिलांच्या वाढत्या संख्येबद्दल आनंद व्यक्त केला. सर्वोच्च कमांडर या नात्याने, लढाऊ भूमिकांसह सशस्त्र दलांमध्ये महिलांची वाढती संख्या पाहून मला आनंद होत आहे, असे राष्ट्रपती बंगळुर येथील राष्ट्रीय मिलिटरी …

Read More »

हुक्केरी तालुक्यातील होसूरमध्ये महिलेचा खून करून दागिने लंपास

हुक्केरी : हुक्केरी तालुक्यातील होसूरमध्ये घरात एकट्या असलेल्या महिलेचा खून करून दागिने लंपास केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. गावातील निवृत्त पीएसआय भीमराय अक्कतंगेरहाळ यांची दुसरी पत्नी मालुताई या घरात एकटी असल्याचे पाहून दरोडेखोरांनी त्यांच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबून हत्या केली. त्यानंतर त्यांच्या अंगावरील दागिने लुटले. या घटनेने होसूर गावात एकच …

Read More »

ऑलिम्पिकवीर नीरज चोप्राची कमाल, मोडला राष्ट्रीय विक्रम

नवी दिल्ली : ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण कामगिरी करणारा भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने पुन्हा एका नव्या विक्रमाला गवसणी घातली. फिनलॅण्डमधील पावो नूरमी गेम्स 2022 मध्ये नीरजने 89.30 मीटर दूर भालाफेक करत नवा राष्ट्रीय विक्रम केला. यापूर्वीचा विक्रमही नीरजच्याच नावे होता. मागील वर्षी मार्च महिन्यात त्याने पतियालामध्ये 88.07 मीटर दूर भाला फेकला होता. …

Read More »