Monday , December 15 2025
Breaking News

Classic Layout

संकेश्वरात रविवारी बाल महोत्सवाचे आयोजन

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर रुक्मिणी मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलतर्फे रविवार दि. ५ जून २०२२ रोजी दुपारी ३ ते ७ वाजता रुक्मिणी गार्डन येथे छोट्या दोस्तांसाठी बाल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बाल महोत्सवात ६ ते १३ वर्षे वयोगटातील मुला-मुलींना सहभागी होता येणार आहे. बाल महोत्सवात सहभागी होण्यासाठी मुलांनी नोंदणीसाठी डॉ. स्मृती …

Read More »

संकेश्वर श्री संतसेना नाभिक समाजातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर श्री संतसेना नाभिक समाजातर्फे दहावी परिक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. येथील श्री संत सेना सभाभवन मध्ये सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी श्रींची पूजा करुन मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने सत्कार सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. नाभिक समाजाच्या विद्यार्थ्यांनी दहावी परिक्षेत …

Read More »

ज्ञानवापी अतिक्रमणमुक्त होत नाही, तोपर्यंत आमचा लढा चालूच राहिल! : हिंदु जनजागृती समिती

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मा. मोहनजी भागवत यांनी काशी येथील ज्ञानवापी मशिदीच्या संदर्भात नकुतेच वक्तव्य केले आहे. आम्ही मा. मोहनजींचा आदर करतो; परंतु ही त्यांची भूमिका आहे. काशी ही मोक्षनगरी आहे, असे हिंदु धर्मशास्त्रांत वर्णिले आहे. हिंदु जीवनदर्शन तिच्याशिवाय अपुरे आहे. ज्ञानवापीमधील अविमुक्तेश्वराला मुक्त केल्याशिवाय हिंदु समाज मुक्त …

Read More »

सुवर्णसौध समोर घडलेल्या प्रकारावर पोलिसांविरोधात तक्रार भीमाप्पा गडाद यांची मागणी

बेळगाव : बेळगाव सुवर्णसौध समोर शेवया सुकविण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर अनेकांनी याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली असून माहिती हक्क कार्यकर्ते भीमाप्पा गडाद यांनीही याप्रकरणी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सुवर्णसौध समोर तेथील कंत्राटी तत्वावर कार्यरत असलेल्या स्वच्छता कर्मचारी महिलेने शेवया सुकविण्यासाठी घातल्या होत्या. हा प्रकार संपूर्ण राज्यासाठी अवमानकारक असल्याचे सांगत या प्रकारासाठी …

Read More »

सुवर्णसौधमध्ये शेवया वाळविणारी मल्लम्मा पुन्हा कामावर

घरही मिळणार बांधून! बेळगाव : बेळगावातील सुवर्णसौधसमोर शेवया वाळवल्यावरून कामावरून काढलेल्या मल्लम्मा या महिलेचे नशीब पालटले आहे. तिला पुन्हा कामावर घेण्यासह घरही बांधून मिळणार आहे. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी ही माहिती दिली. सुवर्णसौधसमोर शेवया वाळत घातल्याने कामावरून काढून टाकलेल्या मल्लम्माला नेटिझन्समुळे चांगले दिवस येणार आहेत. काही दिवसांपूर्वी सुवर्णसौधसमोर शेवया वाळत …

Read More »

वारकरी महासंघाचे अहवाल, पत्रक प्रकाशन उत्साहात

बेळगाव : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा -2022 वारकरी महासंघ बेळगाव यांचा वार्षिक अहवाल आणि पत्रक प्रकाशन कार्यक्रम नुकताच उत्साहात पार पडला. शहरातील महाद्वार रोड क्रॉस नं. 3 विठ्ठल -रुक्माई मंदिर येथे आयोजित या कार्यक्रमास ह.भ.प. गुरुवर्य श्री भाऊसाहेब महाराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीसह बेळगाव व कोल्हापूर येथील वारकरी …

Read More »

सायकलिंग मोहिमेद्वारे जागतिक सायकल दिन साजरा

बेळगाव : बेळगाव शहरातील वेणूग्राम सायकलिंग क्लबतर्फे ‘ग्रह वाचवा, सायकल चालवा’ या घोषवाक्यासह सायकलिंग मोहीमेचे आयोजन करण्याद्वारे आजचा ‘वर्ल्ड बायसिकल डे -2022’ अर्थात जागतिक सायकल दिन आरोग्यपूर्णरित्या साजरा करण्यात आला. जागतिक सायकल दिनानिमित्त शहरातील वेणुग्राम सायकलिंग क्लबतर्फे आज शुक्रवारी सकाळी 15 कि. मी. सायकलिंग मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. टिळकवाडी …

Read More »

‘माझी चारधाम यात्रा’ पुस्तकाचे 5 रोजी प्रकाशन

बेळगाव : नेताजी गल्ली, होनगा येथील ॲड. नितीन आनंदाचे लिखित ‘माझी चारधाम यात्रा’ या प्रवास वर्णन पुस्तकाचा प्रकाशन सोहळा येत्या रविवार दि. 5 जून 2022 रोजी सायंकाळी 4 वाजता आयोजित करण्यात आला आहे. कॅम्प येथील मराठी विद्यानिकेतन सभागृहामध्ये जिजामाता महिला सहकारी बँकेच्या चेअरमन ॲड. अश्विनी बिडीकर यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा …

Read More »

अन्नपूर्णेश्वरी देवीच्या वार्षिक उत्सवाला प्रारंभ

बेळगाव : येळ्ळूर रोड अन्नपूर्णेश्वरी येथील अन्नपूर्णेश्वरी देवीचा वार्षिकोत्सव आजपासून सुरू झाला आहे. त्यानिमित्त मंदिरात सकाळपासून गणहोम, नवग्रह होम, वास्तु होम, सुदर्शन होम प्रार्थना करण्यात आली. तसेच उद्या शनिवार दिनांक 4 जून रोजी अभिषेक महा चंडिका हो देवीचा पालखी महोत्सव व दीपोत्सव कार्यक्रम होणार आहे. तसेच रविवार दिनांक 5 रोजी …

Read More »

संत मीरा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यारंभ होम संपन्न

बेळगाव : संत मीरा इंग्लिश मीडियम स्कूल गणेशपूर बेळगाव येथे बुधवारी विद्यारंभ होम आणि हळदी कुंकू समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमाला शाळेचे विद्यार्थी व शिक्षक वर्ग पारंपरिक वेशभूषेत हजर होते. विद्यार्थ्यांनी आलेल्या अतिथीचे स्वागत केले व मुलींनी हळदी कुंकू व वाण देऊन आलेल्या महिला वर्गाचे स्वागत केले. गणहोम शाळा सुधारणा …

Read More »