Tuesday , December 16 2025
Breaking News

Classic Layout

चार महिन्यानंतर ओलांडली महाराष्ट्र बसने कर्नाटकाची सीमा!

रिक्षा व्यवसायिकांनी केला सत्कार : आंतरराज्य बससेवेमुळे सुटकेचा निश्वास निपाणी(वार्ता) : कोरोनाचा संसर्ग, कोगनोळी टोलनाक्यावरील आरटीपीसीआरची सक्ती, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील आगारांचा गोंधळ, महाराष्ट्रातील बस कर्मचाऱ्यांचा संप अशा विविध कारणांमुळे कर्नाटक महाराष्ट्रातील आंतरराज्य सेवा गेल्या चार महिन्यापासून बंद होती. या काळात प्रवाशांसह नोकरदार विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांची मोठी गैरसोय झाली. शिवाय …

Read More »

कोगनोळी येथे बांबरवाडीचा श्वान प्रथम

कोगनोळी : येथे माजी मंत्री वीरकुमार पाटील व महिला प्रियदर्शनी बँकेच्या अध्यक्षा आशाराणी पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अंबिका स्पोर्ट्स क्लब यांच्यावतीने आयोजित श्वान स्पर्धेत बांबरवाडी येथील हनुमान प्रसन्न राणू या श्वानने प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेचे उद्घाटन माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेत अक्षय …

Read More »

कॉंग्रेसचे आता विधानसभेत ‘दिवस-रात्र’ आंदोलन

ईश्वरप्पांच्या राजीनाम्याची मागणी कायम; विधान परिषदेतही पडसाद बंगळूर : राष्ट्रध्वजाबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांची हकालपट्टी करण्यात यावी आणि त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी काँग्रेसची निदर्शनेने गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी विधानसभेत सुरूच राहीली. त्यामुळे विधानसभेचे कामकाज आजही ठप्प झाले. त्यामुळे सभाध्यक्षानी …

Read More »

काॅंग्रेसकडून ईटी यांच्या राजीनाम्याची मागणी

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर पालिकेचे मुख्याधिकारी जगदीश ईटी यांचा मनमानी कारभार चांगला आहे. संकेश्वरात २४×७ पाणीपुरवठा योजनेच्या नावाखाली ईटी साहेब लोकांची लुबाडणूक करीत आहेत. अशा हट्टीखोर मुख्याधिकारीची संकेश्वरकरांना आवश्यकता नाही. हुक्केरीचे आमदार व राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांनी ईटी यांची बदली अन्यत्र करावी, अशी मागणी …

Read More »

म. ए. समिती सांगली शाखा पदसिद्ध अध्यक्ष दिग्विजय सूर्यवंशी यांचा युवा समितीकडून सत्कार

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका महापौर तसेच मागील काही महिन्यांपूर्वी सीमाभागातील अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी सर्वपक्षीय कृती समिती तथा म. ए. समिती सांगली शाखा पदसिद्ध अध्यक्ष श्री. दिग्विजय सूर्यवंशी यांचा सांगली भेटीवेळी सत्कार करण्यात आला. डिसेंबर महिण्यात म. ए. समितीच्या वतीने महावेळाव्याचे आयोजन …

Read More »

प्रभाग क्रमांक 6 मध्ये समस्यांचे रडगाणे

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर प्रभाग क्रमांक ६ मधील समस्या निवारण सभेत प्रभागातील नागरिकांनी अनेक समस्यांचे रडगाणे सादर केले. सभेत मुख्याधिकारी जगदीश ईटी, अभियंता आर. बी. गडाद, उपतहसीलदार आर. एस. बडचीकर, नगरसेवक सचिन भोपळे यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. सभेत लोकांनी वेंकटेश नगर मधील रस्ता निर्माण कामांचा विषय उचलून तरला. दोन …

Read More »

जिव्हाळा फौंडेशनच्यावतीने विद्यार्थिनींसाठी आरोग्य मार्गदर्शन

बेळगाव : “आरोग्य हीच खरी धनसंपदा” शालेय वयातच मुलांना आरोग्याचे महत्व, आरोग्य विषयक समस्या व उपाय याविषयी जागरूकता निर्माण व्हावी यासाठी कॅन्टोनमेंट मराठी प्राथमिक शाळेत मुलींसाठी आरोग्य मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शक म्हणून स्त्रीरोग तज्ञ डॉ. सविता कद्दू, आय.एम.ए. अध्यक्षा डॉ. राजश्री अनगोळ तसेच जिव्हाळा फौंडेशनच्या अध्यक्षा …

Read More »

सरकारी अधिकाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांना तडीपार करा

बेळगाव : चित्रदुर्ग पंचायतीच्या कार्यकारी अधिकाऱ्यांवर करण्यात आलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ कर्नाटक कर्मचारी संघ, ग्रामविकास आणि पंचायत तसेच कर्मचारी संघाच्या सदस्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर केले. चित्रदुर्ग जिल्ह्यातील चळकेरे तालुक्यातील कार्यकारी अधिकारी मडगीन बसाप्पा यांच्यावर दि. १४ फेब्रुवारी रोजी तालुका पंचायत कार्यालयात काहींनी अर्वाच्च शब्दात शिवीगाळ करत हल्ला केला. या दुष्कर्म्यांना …

Read More »

तणावमुक्त राहून दहावी परीक्षेस सामोरे जा : युवा नेते उत्तम पाटील

बोरगाव येथे ‘अरिहंत’तर्फे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन निपाणी : शैक्षणिक जीवनात दहावी परीक्षा ही महत्त्वाची आहे. हे ओळखून विद्यार्थी परीक्षेत जास्त गुण मिळविण्यासाठी धडपडत असतात. परीक्षा जवळ आल्यावर विद्यार्थी गोंधळात राहून अभ्यासाबाबत तणाव वाढून घेतात. त्यामुळे परीक्षेचे नियोजन बिघडते. तरी विद्यार्थ्यांनी तणावमुक्त राहून अभ्यास करावे व आपले ध्येय निश्चित ठरवून पुढील करिअरच्या …

Read More »

उन्हाळा सुरू खानापूरात शहाळ्याना वाढती मागणी

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका हा भौगोलिकदृष्ट्या उन्हाळ्यात कडक उन्हाळा, पावसाळ्यात मुसळधार पाऊस, हिवाळ्यात कडाक्याची थंडी अशी खानापूर तालुक्याची ख्याती आहे. त्यामुळे खानापूर तालुक्याची प्रसिद्धी सर्वाहुन वेगळी आहे. नुकताच थंडीचे प्रमाण कमी झाले आहे. आणि गेल्या काही दिवसापासून कडक उन्हाचे चटके खानापूर शहरवासीयांना बसत आहे. त्यामुळे आता खानापूर शहरात शहाळे …

Read More »