Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

बेळगाव जिल्ह्यात हत्ती रोगाचे थैमान

५२ रुग्णांवर उपचार, त्यात २१ नव्या रुग्णांची भर बेळगाव : कोरोनाचे संकट कायम असतानाच जिल्ह्यात हत्ती रोगाने थैमान घातले आहे. जिल्ह्यात यापूर्वी हत्ती रोगाची लागण झालेल्या ५२ रुग्णांवर उपचार सुरू असतानाच पुन्हा २१ नवीन रुग्ण आढळून आल्याने आरोग्य खात्याची झोप उडाली आहे. विशेष म्हणजे सर्व बाधित रुग्ण हे रामदुर्ग तालुक्यातील …

Read More »

आनंदीबाई जोशी सरकारी प्रसुती रुग्णालयाचा लाभ गोरगरिबांना : आमदार अभय पाटील

स्मार्ट सिटीतील सुसज्ज रुग्णालयाचे लोकार्पण बेळगाव (वार्ता) : केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने जनतेच्या आरोग्याची काळजी घेत विविध योजना हाती घेण्यात आल्या आहेत. सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याचे काम सरकारी अधिकारी आणि कर्मचार्‍यांचे आहे. वडगाव येथे आनंदीबाई जोशी सरकारी प्रसूती रुग्णालयाचे आज लोकार्पण करण्यात आले आहे. या रुग्णालयातून गोरगरीब व …

Read More »

पहिल्या दिवशी ६.३८ लाख मुलांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट

उद्यापासून लसीकरण, ४,१६० लसीकरण शिबीरे बंगळूर : राज्यातील १५ ते १८ वर्षाच्या मुलांसाठी लसीकरण अभियानाची आरोग्य खात्याने तयारी पूर्ण केली आहे. लसीकरण मोहिम उद्या (ता. ३) पासून राज्यभरात सुरू होणार असून यासाठी शैक्षणिक संस्थांमध्ये ४,१६० लसीकरण शिबिरे सज्ज करण्यात आली आहेत. पहिल्या दिवशी ६.३८ लाख बालकांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे. …

Read More »

तुर्केवाडीला ५ कोटींचा निधी देणार : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

तुर्केवाडी येथील श्री ब्रह्मलिंग देवालय वास्तुशांती व श्री सोपानदेव पुण्यतिथी शताब्दी महोत्सवाची सांगता तेऊरवाडी (एस. के. पाटील) : तुर्केवाडी ( ता. चंदगड ) येथील श्री ब्रह्मलिंग देवालयाला पर्यटन ‘ब’ वर्ग दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू तसेच ५ कोटीचा निधी मंदिरासाठी देण्याचे आश्वासन ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. तुर्केवाडी …

Read More »

जय किसान व्होलसेल भाजी मार्केटचे उद्या उद्घाटन

बेळगाव : बेळगावतील बहुचर्चित दुसऱ्या व्होलसेल भाजी मार्केटला राज्य शासनाकडून परवाना मिळाला आहे. जय किसान व्हेजिटेबल असोसिएशनच्या पुढाकाराने पुणे-बेंगळुरू महामार्गच्या बाजूला व्होलसेल भाजी मार्केट उभारण्यात आले आहे. याचे उद्घाटन उद्या सोमवार दि. 3 जानेवारी रोजी संध्याकाळी 5 वा. होणार आहे अशी माहिती भाजी मार्केट असोसिएशनचे अध्यक्ष दिवाकर पाटील यांनी दिली. …

Read More »

चंदगड तालुक्यावर झालेला अन्याय दूर करणार : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

यशवंतनगर येथे केडीसीसीचा प्रचार मेळावा संपन्न तेऊरवाडी (एस. के. पाटील) : चंदगडच्या लाल मातिचा सुगंध कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाला येतो. गेल्या काही निवडणूकात चंदगड तालुक्यावर मोठा अन्याय झाला आहे. हा अन्याय आगामी काही दिवसात दूर करून चंदगडच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील रहाणार असल्याचे विचार महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त …

Read More »

वडगाव येथील श्री विष्णू मंदिरात सव्वालाख तुळशी दल अर्पण

बेळगाव : भक्त प्रल्हाद संस्कार केंद्र वडगाव यांच्यातर्फे विष्णू गल्ली वडगाव येथील श्री विष्णू मंदिरमध्ये भगवान श्री विष्णू यांना आणि प्रभू राम लक्ष्मण, माता सीता यांना 1,25000 तुळशी दल अर्पण केले. नूतन वर्ष सुख, समृद्धी, समाधानाने जावो, जगावर जे संकट आले आहे ते मुक्त व्हावे याकरिता केंद्राचे अध्यक्ष श्री. गणेश …

Read More »

खानापूरात पारिश्वाड-जांबोटी रस्त्यावर वाहतुकीची कोंडी

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरात दर रविवारी आठवडीचा बाजार भरतो. या आठवडी बाजाराला तालुक्यातील अनेक खेड्यापाड्यातील नागरीक हजेरी लावतात. खानापूर शहरातील पारिश्वाड-जांबोटी रस्त्यावर मिरचीचा बाजार भरतो. मात्र या रस्त्यावरून वाहनांची वर्दळ नेहमी गजबजलेली असते. त्यामुळे पारिश्वाड-जांबोटी रस्त्यावर वाहतुकीची कोंडी निर्माण होऊन याचा त्रास सर्वानाच होतो. यासाठी खानापूर नगरपंचायतीने याकडे लक्ष …

Read More »

बेळगावात कोरोनाचा सुपर स्प्रेडर आठवडी बाजार, प्रशासन गाफील….

बेळगाव : ओमिक्रोन बरोबरच कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागला आहे. कोरोना आणि ओमिक्रोनच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नवे निर्बंध जारी केले आहेत. कर्नाटक राज्यात कोरोनाला आळा घालण्यासाठी दहा दिवसांचा नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी राज्य सरकारने जिल्हा प्रशासनाला विविध प्रकारच्या सक्त सूचना केल्या आहेत. …

Read More »

आदर्श नगर श्रीराम कॉलनी परिसरात सांडपाण्याची समस्या

नगरसेवक मंगेश पवार यांच्याकडून पाहणी बेळगाव : बेळगाव उपनगर परिसरात अनेक नव्या वसाहती निर्माण होत आहेत. नव्या वसाहतींमुळे सांडपाण्याची समस्या दिवसेंदिवस जटिल बनत आहे. अशाच प्रकारे आदर्श नगर श्रीराम कॉलनी परिसरात सांडपाण्याची समस्या गंभीर बनली आहे. यासंदर्भात स्थानिक नागरिकांनी नगरसेवक मंगेश पवार यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी तात्काळ सदर परिसराला भेट …

Read More »