Tuesday , December 16 2025
Breaking News

Classic Layout

निपाणीचा रोहित कामत बनला लेफ्टनंट

ओटीए गया येथे घेतली शपथ : निपाणीच्या शिरपेचात मानाचा तुरा निपाणी (विनायक पाटील) : गरिबीची जाण, आई-वडिलांचे कष्ट आणि गुरुवर्यांच्या मागदर्शनानुसार जिद्द व चिकाटीच्या जोरावर भारतीय सैन्यात चमकदार कामगिरी करण्याचे स्वप्न पूर्ण केलेल्या रोहित प्रदीप कामत याची लेफ्टनंटपदी निवड झाली आहे. येथील साखरवाडी हौसाबाई कॉलनीतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या रोहित …

Read More »

निपाणी राष्ट्रीय महामार्गावर ऊसाने भरलेला ट्रक पलटी

सुदैवाने जीवितहानी नाही : ट्रकसह ऊसाचे नुकसान निपाणी : राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांची मालिका संपता संपत नाही आहे. काल रात्री साडे बारा ते एकच्या दरम्यान निपाणी राष्ट्रीय महामार्गावरील अमर हॉटेल शेजारी ऊसाचा ट्रक पलटी होऊन झालेल्या अपघातात वाहनाचे प्रचंड नुकसान झालेले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार सदरचा …

Read More »

तारिहाळ येथे धाडसी चोरी : 12 लाखाचा ऐवज लंपास

बेळगाव : घरातील मंडळी परगावी लग्नासाठी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी काल रात्री घराचा दरवाजा फोडून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम अशा सुमारे 12 लाख रुपयांच्या ऐवजाची धाडसी चोरी केल्याची घटना तारीहाळ गावात आज सकाळी उघडकीस आली. तारीहाळ (ता. जि. बेळगाव) गावातील श्री अय्यप्पा स्वामी मंदिरानजीक असणार्‍या पांडू कल्लाप्पा खणगांवकर ज्यांच्या …

Read More »

आम. निंबाळकरांकडून अपयश झाकण्यासाठी पदयात्रेचे राजकीय ढोंग

डॉ. सोनाली सरनोबत यांची टीका बेळगाव : खानापूरच्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी बेळगाव सुवर्ण विधानसौधवर पादयात्रा आयोजित करणे केवळ राजकीय गिमिक आहे. आपल्या आमदारकीच्या काळात आलेले अपयश झाकण्यासाठी त्यांनी पदयात्रेचे तंत्र अवलंबविल्याची टीका, भारतीय जनता पार्टीच्या बेळगांव ग्रामीण महिला मोर्चा उपाध्यक्षा डॉ. सोनाली सरनोबत यांनी केली आहे. यासंदर्भात पुढे …

Read More »

पोर्णिमेला श्री रेणुका देवीचे दर्शन कोरोना नियमांचे काटेकोर पालन करूनच, जिल्हा प्रशासनावतीने खबरदारी

बेळगाव : परदेशात नवीन ओमिक्रोन व्हायरसचा शोध लागल्यानंतर कर्नाटक सरकार सतर्क झाले आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्ममई यांनी आंतरराष्ट्रीय प्रवाश्यांप्रमाणेच महाराष्ट्र आणि केरळमधून येणार्‍या प्रवाशांना आरटीपीसीआर नकारात्मक अहवाल अनिवार्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान कर्नाटक सरकारच्या नव्याने लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे, 19 डिसेंबरला होणार्‍या सौंदत्ती येथील पोर्णिमेला कोरोना नियमांचे काटेकोर पालन …

Read More »

कोगनोळी परिसरात ऊसाला तुरे शेतकरी वर्गात चिंता

कोगनोळी : कोगनोळीसह परिसरातील हणबरवाडी, दत्तवाडी, सुळगाव, मत्तीवडे, हदनाळ, आप्पाचीवाडी भागात ऊसाला तुरे फुटल्याने ऊस वजनात घट झाली आहे. यामुळे शेतकरी चिंतातुर बनला आहे. ऊसाला तुरे फुटून ऊस पोकळ होऊन 20 ते 25 टक्के वजनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या भागाला बारमाही वाहणारी दूधगंगा नदी वरदान ठरली आहे. …

Read More »

महामेळाव्यासंदर्भात येळ्ळूरमध्ये जनजागृती बैठक

बेळगाव : येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने महामेळाव्यासंदर्भात बैठक झाली असून हजारोच्या संख्येने मेळाव्याला उपस्थित रहाण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला. या बैठकीचे अध्यक्ष शांताराम कुगजी अध्यक्ष येळ्ळूर विभाग समिती येळ्ळूर हे होते. प्रास्ताविक येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीचे चिटणीस प्रकाश आष्टेकर यांनी केले. भारताचे पहिले सीडीएस प्रमुख जनरल बिपीन …

Read More »

मुख्यमंत्र्यांनी बेळगावसाठी विशेष पॅकेज द्यावे : आमदार अनिल बेनके

बेळगाव : बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार अनिल बेनके यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्याकडे बेळगावातील अनुभव मंडप मॉडेलच्या बांधकामासाठी विशेष पॅकेज देण्याची विनंती केली आहे. बेळगाव येथील सांबरा विमानतळावर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आमदार अनिल बेनके यांनी बेळगाव शहराच्या विकासावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. मंडप उभारणीसाठी विशेष अनुदान देण्याची मागणी केली आहे. बेळगावच्या …

Read More »

रांगोळी रेखाटून सीडीएस बिपीन रावत यांना श्रद्धांजली

बेळगाव : कुन्नूर (तामिळनाडू) येथे हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू पावलेले देशाच्या तीनही संरक्षण दलाचे प्रमुख सीडीएस बिपीन रावत यांच्या स्मरणार्थ त्यांची हुबेहूब रांगोळी चितारून बेळगावचे सुप्रसिद्ध कलाकार अजित औरवाडकर यांनी रावत यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. नाझर कॅम्प, वडगाव येथील आपल्या ज्योती फोटो स्टुडिओमध्ये विविध रंगाच्या रांगोळीचा सुरेख मिलाफ करून …

Read More »

अधिवेशनाची जय्यत तयारी; रस्त्यांवर एलईडी दिवे बसवण्याचे काम जोरात

बेळगाव : सोमवार दिनांक 13 डिसेंबरपासून बेळगावच्या सुवर्णसौध येथे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहरातील अनेक कामे हाती घेण्यात आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांवर एलईडी दिवे बसवण्याचे काम आहे जोरात सुरू झालेले पाहायला मिळत आहे. स्मार्ट सिटी योजनेतून बेळगाव शहरात सर्वत्र एलईडी …

Read More »