डॉ. सोनाली सरनोबत यांची टीका
बेळगाव : खानापूरच्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी बेळगाव सुवर्ण विधानसौधवर पादयात्रा आयोजित करणे केवळ राजकीय गिमिक आहे. आपल्या आमदारकीच्या काळात आलेले अपयश झाकण्यासाठी त्यांनी पदयात्रेचे तंत्र अवलंबविल्याची टीका, भारतीय जनता पार्टीच्या बेळगांव ग्रामीण महिला मोर्चा उपाध्यक्षा डॉ. सोनाली सरनोबत यांनी केली आहे.
यासंदर्भात पुढे बोलताना डॉ. सरनोबत म्हणाल्या, खानापूर तालुका पूर्वीपासून मागासलेला तालुका आहे. मतदारसंघात करण्यासाठी अनेक कामे आहेत. परंतू राज्यात 60 वर्षे कारभार केलेल्या काँग्रेस पक्षाने येथील विकासाला प्रतिसाद दिलेला नाही. विद्यमान स्थानिक आमदार समस्या जाणून घेऊन विकासकामे राबविण्यासाठी सरकारचे लक्ष वेधण्याचे काम करीत नाहीत असा आरोप डॉ. सरनोबत यांनी केला.
आमदारांनी आपल्या मतदारसंघातील आवश्यक विकास कामांची योजना तयार करून, सरकार दरबारी योजना पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करणे आवश्यक होते. परंतु केवळ आरोप केल्याने, धरणे, आंदोलन केल्याने कांही उपयोग होत नाही. लोक विकास करणार्याच्या बाजूने असताना, गिमिक करणार्यावर विश्वास ठेवण्यास लोक मूर्ख नाहीत. विधानसभा निवडणुक जवळ येत असल्याची जाणीव झाल्यानंतर आम. निंबाळकर यांना विकासाची आठवण आली आहे. मतदारसंघात आमदारांच्या कामाविषयी जनतेस असंतोष पसरला आहे. जनतेच्या समस्यांना त्या प्रतिसाद देत नाहीत. आपल्या मतदारसंघातील जनतेशी त्यांचा संपर्क होत नसल्याची नाराजी जनता व्यक्त करत आहे. त्यामुळे पुढील निवडणूक लक्षात आल्याने त्यांनी पदयात्रा आयोजित केली आहे, डॉ. सोनाली सरनोबत यांनी सांगितले.
Check Also
शिरोली येथील बेकायदेशीर वृक्षतोडी प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करा; डॉ. अंजली निंबाळकर यांचे वनमंत्री ईश्वर खंड्रे यांना निवेदन
Spread the loveखानापूर : खानापूर तालुक्यातील शिरोली येथील सर्वे नंबर 97 मध्ये खासगी जमिनीत बेकायदेशीररित्या …