Tuesday , December 16 2025
Breaking News

Classic Layout

कोल्हापूरचे काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांचं निधन

कोल्हापूर : कोल्हापूरमधील काँग्रेस आमदाराचं निधन झाल्याची दुःखद बातमी आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत जाधव यांचं निधन झालं. हैदराबाद येथे हृदयविकाराच्या धक्क्याने चंद्रकांत जाधव यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या अवघ्या 57 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. चंद्रकांत जाधव हे 2019 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडून …

Read More »

आश्वासनानंतर शेतकर्‍यांचे आमरण उपोषण मागे

बेळगाव : सहकार खात्याच्या सहाय्यक निबंधकांसह बँकेच्या अधिकार्‍यांनी कृषी कर्जाबाबत ठोस आश्वासन दिल्यामुळे मुतगे कृषी पत्तीन सहकारी संघाच्या विरोधात छेडलेले आमरण उपोषण शेतकर्‍यांनी आज मागे घेतले. मुतगे कृषी पत्तीन सहकारी संघाने कृषी कर्ज देण्यास टाळाटाळ चालविल्याच्या निषेधार्थ संतप्त शेतकर्‍यांनी काल मंगळवारी संघाच्या कार्यालयात टाळे ठोकून आमरण उपोषण सुरू केले होते. …

Read More »

37 व्या स्टेट रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये बेळगावच्या स्केटिंगपटुंचे स्पर्धेत घवघवीत यश

बेळगाव : कर्नाटक रोलर स्केटिंग असोसिएशन आयोजित 37 व्या राज्यस्तरीय रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप-2021 स्पर्धेत बेळगावच्या स्केटिंगपटूंनी चमकदार कामगिरी केली. बेंगळूर येथील सिटी स्केटर्स ट्रॅक आणि कस्तुरी नगर ट्रॅकवर दिनांक 25 ते 28 नोव्हेंबर या दरम्यान झालेल्या या स्पर्धेत बेळगाव जिल्ह्यातील स्केटिंगपटूंनी 17 सुवर्ण, 3 रौप्य आणि 12 कांस्य पदकांसह एकंदर …

Read More »

कुर्ली येथे राहत्या घराला शॉर्टसर्किटने आग; लाखो रुपयांचे नुकसान

कोगनोळी : कुर्ली ता. निपाणी येथील शिंदे गल्लीत राहत्या घराला शॉर्टसर्किटने आग लागून सुमारे लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना मंगळवार तारीख 30 रोजी रात्री आठच्या सुमारास घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, कुर्ली तालुका निपाणी येथील शिंदे गल्लीत आप्पासाहेब शामराव पाटील, लक्ष्मीबाई संभाजी पाटील यांचे राहते घर आहे. मंगळवार तारीख …

Read More »

इंडियन मेडिकल असोसिएशनकडून पोलिसांना प्रशिक्षण कार्यशाळा

बेळगाव : इंडियन मेडिकल असोसिएशन बेळगाव शाखेच्यावतीने बेळगाव शहर पोलिसांसाठी एक विशेष कार्यशाळा घेण्यात आली. स्वत:चा जीव संपवून घेणे, भाजून घेणे किंवा विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणे अशा प्रकारात नागरिकांना हाताळण्याचे प्रशिक्षण यावेळी पोलिसांना देण्यात आले. 60 हून अधिक पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी या पायाभूत कार्यशाळेमध्ये सहभागी …

Read More »

महापरिनिर्वाण दिन पूर्वतयारीची बैठक

बेळगाव : भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने येत्या 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिनाच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेली पूर्वतयारीची बैठक आज सकाळी पार पडली. सदाशिवनगर येथील बौद्ध विहारमध्ये झालेल्या या बैठकीमध्ये सालाबादप्रमाणे महापरिनिर्वाण दिनानिमित्त 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता धर्मवीर संभाजी चौक येथून सामाजिक एकता प्रकाश फेरीचे (कॅन्डल मार्च) आयोजन करणे. याचप्रमाणे येत्या …

Read More »

प्रा. सुभाष सुंठणकर यांचा वाड्:मय चर्चा मंडळतर्फे सत्कार

बेळगाव : बेळगावचे प्रसिद्ध विनोदी कथा लेखक, रसायन शास्त्राचे प्राध्यापक, मंडळाचे ज्येष्ठ माजी कार्यकारिणी सदस्य प्रा. सुभाष सुंठणकर यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त शनिवार दि. 27 नोव्हेंबर 2021 रोजी मंडळाच्या सभागृहात मंडळाचे ज्येष्ठ शाखा चिटणीस आणि ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक विठ्ठल याळगी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, फळकरंडी, पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक …

Read More »

बी. के. कॉलेजमध्ये झंकार भित्तीपत्रकाचे अनावरण

बेळगाव : बेळगाव शहरातील भाऊराव काकतकर महाविद्यालयामध्ये (बी. के. कॉलेज) नुकताच झंकार आणि भित्ती पत्रकाचा अनावरण कार्यक्रम उत्साहात पार पडला. महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आरपीडी महाविद्यालयाच्या प्राचार्य शोभा नाईक आणि अर्जुन पुरस्कार विजेते मुष्टियुद्ध मुकुंद किल्लेकर उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झाडाच्या रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाचे …

Read More »

उगार साखर कारखाना कर्मचार्‍यांचा संप : संपामुळे कारखाना बंद

कागवाड : कागवाड तालुक्यातील उगार शुगर वर्क्स हा कारखाना कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या संपामुळे बंद ठेवण्यात आला आहे. या कारखान्यातील कर्मचार्‍यांनी आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी कारखान्याच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन केले आहे. कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विजय यादव, अनिल नावलीगेर, कल्लाप्पा करगार, गुंडू कदम, खालील खुदावंत यांच्या नेतृत्वाखालील शेकडो कार्यकर्त्यांनी अनियमित काळासाठी संप पुकारला …

Read More »

2024च्या निवडणुकांच्या अनुषंगाने ममता बॅनर्जींसोबत शरद पवारांची बैठक

मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामधील आजच्या बैठकीची गेल्या दोन दिवसांपासून चर्चा सुरू होती. राज्याच्या राजकीय वर्तुळासोबतच राष्ट्रीय पातळीवर देखील ही भेट चर्चेत होती. भाजपाविरोधी आघाडीच्या मुद्द्यावर ममता बॅनर्जी शरद पवारांशी चर्चा करणार असल्याचं बोललं जात होतं. अखेर ही शक्यता खरी ठरली …

Read More »