Tuesday , December 16 2025
Breaking News

Classic Layout

मंदिरे झाली खुली : भाजपाचा आनंदोत्सव

मंदिरासभोवती व्यापाराला परवानगी द्या कोल्हापूर : गेल्या सहा महिन्यांपासून महाराष्ट्र राज्याच्या जुलमी आणि अधर्मी ठाकरे सरकारने राज्यातील सर्व धार्मिक स्थळांना कुलुपात बंद करुन ठेवले होते. या अन्याया विरोधात भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, विरोधीपक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने विविध मार्गाने आंदोलन केली. आज या सर्व आंदोलनांना …

Read More »

बडाल अंकलगी दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना राज्य सरकारकडून 35 लाखाची मदत

बेळगाव : मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी बडाल अंकलगी (ता. बेळगाव) येथील घर कोसळून मयत झालेल्या कुटुंबातील भिमाप्पा खनगावी यांच्याशी दूरध्वनीवरून संभाषण करून त्यांचे सांत्वन करण्याबरोबरच प्रत्येक मृतासाठी 5 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाची पूर्तता करताना आज गुरुवारी सकाळी जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी सहा मृतांसाठी …

Read More »

बेळगावात दुर्गामाता दौडला शानदार प्रारंभ

बेळगाव : बेळगावात नवरात्रौत्सव आणि दुर्गामाता दौड यांचं अतूट नातं आहे. हीच परंपरा कायम ठेवत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आज नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दुर्गामाता दौडला शानदार प्रारंभ करण्यात आला. दुर्गामाता दौडचे बेळगावातील हे 25वे रौप्यमहोत्सवी वर्ष. देश आणि धर्माच्या रक्षणाचा संदेश देण्यासाठी दरवर्षी नवरात्रीतील 9 दिवस बेळगाव आणि परिसरातील अनेक गावात …

Read More »

शेतकरी नेते व ज्येष्ठ पत्रकार कल्याणराव मुचळंबी यांच्यावर अंत्यसंस्कार

बेळगाव : बेळगावचे ज्येष्ठ पत्रकार आणि शेतकरी कार्यकर्ते कल्याणराव मुचळंबी यांच्यावर शेकडो जणांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. बुधवारी गोकाक तालुक्यातील सावळगी येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालेल्या कल्याणराव मुचळंबी यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी बेळगावच्या अंजनेय नगर येथील निवासस्थानी व्यवस्था करण्यात आली होती. गुरुवारी दुपारी सजविलेल्या वाहनातून मुचळंबी यांची अंतिम यात्रा …

Read More »

कोल्हापूर : अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवल्याच्या फोनने खळबळ!

कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात पूजेच्या ठिकाणी बॉम्ब ठेवल्याच्या निनावी फोनने सुरक्षा यंत्रणेसह भाविकांचं धाबं दणाणलं. दरम्यान, तात्काळ देवीच्या दर्शनासाठीची रांग थांबविण्यात आली. विशेष पथकासह श्वानपथक, बॉम्बशोध पथक व वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी मंदिर परिसराची कसून तपासणी केली. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अंबाबाई …

Read More »

उद्योजक, कंत्राटदारांच्या निवासस्थानावर आयटी छापे

येडियुराप्पांच्या स्वीय सहाय्यकांवरही कारवाई, 50 ठिकाणी छापे बंगळूरू : कर्नाटक व गोवा शाखेच्या आयकर विभागाच्या अधिकार्‍यांनी गुरुवारी पहाटे बंगळूरसह 50 ठिकाणी एकाच वेळी छापे टाकून शोध कार्य हाती घेतले. प्राप्तिकर अधिकार्‍यांनी शहरातील आघाडीचे व्यापारी, व्यावसायिक कंपन्या आणि चार्टर्ड अकाउंटंट यांच्या घरावरही छापे टाकले आहेत. विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री बी. एस. …

Read More »

आमवस्येनिमित्त मलप्रभा नदीवर भाविकांची गर्दी

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील मलप्रभा नदीच्या घाटावर गुरूवारी सर्वपित्री दर्श आमवस्येनिमित्त बेळगावसह खानापूर तालुक्यातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गुरूवारी सकाळपासून भाविकांनी मलप्रभा नदीच्या काठावर स्नानासाठी गर्दी केली. यावेळी भाविकानी मलप्रभा नदीची मनोभावे पूजा केली. मलप्रभा नदीवर भाविकांच्या सेवेसाठी पोलिस उपस्थित होते. कोणतीही दुर्घटना घडू नये. यासाठी सतर्कता पाळण्यात …

Read More »

जागतिक शिक्षक दिनानिमित्त बी. एस. पाटील यांचा सत्कार

येळ्ळूर : श्री शिवाजी विद्यालय येळ्ळूरच्या गेल्या 50 वर्षातील माजी विद्यार्थ्यांकडून जागतिक शिक्षक दिनाचे औचित्य साधून आदर्श शिक्षक श्री. बी. एस. पाटील सर यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यालयात सेवा केलेल्या सर्व दिवंगत गुरूजनांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यापैकी स्व. श्री. वाय. बी. चौगुले, श्री. वाय. डी. सायनेकर, श्री. आर. …

Read More »

56व्या वाढदिवसानिमित्त वाचनालयास 56 पुस्तके भेट

कालकुंद्री येथील शिक्षक श्रीकांत पाटील यांचा अनोखा उपक्रम तेऊरवाडी (एस. के. पाटील) : कालकुंद्री ता. चंदगड गावचे सुपुत्र उपक्रमशील शिक्षकप्रिय व विद्यार्थीप्रिय शिक्षक तीन राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारांचे मानकरी श्रीकांत वैजनाथ पाटील यांनी गावातील ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालयास आपल्या 56 व्या वाढदिवसानिमित्त 56 वाचनीय व उपयुक्त पुस्तके भेट दिली. केंद्र शाळा …

Read More »

कोरोनाच्या सावटात नवरात्रोत्सवाची तयारी!

बाजारपेठेतही उत्साह कमी : मूर्तिकारही अडचणीत निपाणी : नवरात्रोत्सव अवघ्या 1 दिवसांवर आला आहे. मात्र यंदाही कोरोनाच्या सावटात नवरात्रोत्सवाची तयारी दिसत आहे. दरम्यान गुरुवारी (ता. 7) घटस्थापना होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर घरोघरी त्याची तयारी सुरू झाली आहे. कोरोना प्रादुर्भाव कमी असला तरी खबरदारी म्हणून नवरात्रोत्सवही साधेपणानेच साजरा करावा लागणार आहे. …

Read More »