Monday , December 15 2025
Breaking News

Classic Layout

गणेश समुदाय भवनाचा चापगावात स्लॅब सोहळा संपन्न

खानापूर (प्रतिनिधी) : चापगाव (ता. खानापूर) येथील श्री गणेश समुदाय भवनाचा स्लॅब भरणी सोहळा सोमवारी पार पडला.कार्यक्रमा अध्यक्षस्थानी गावडू फोंडू पाटील होते.यावेळी माजी आमदार अरविंद पाटील यांच्याहस्ते स्लॅब भरणी शुभारंभ करण्यात आला.प्रारंभी दीपप्रज्वलन सुरेश पाटील माजी अध्यक्ष कुस्ती संघटना खानापूर, मारुती मादार ग्राम पंचायत उपाध्यक्ष, सयाजी पाटील माजी सभापती यांच्याहस्ते …

Read More »

जागतिक वैद्यकीय दिनानिमित्त गर्लगूंजीतील डॉक्टरांचा सत्कार

खानापूर प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील गर्लगूंजी गावच्या डाॅक्टरांचा जागतिक वैद्यकिय दिनाचे औचित्य साधुन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समिती गर्लगुंजीतील डॉ. शहापुरकर, डॉ.अरुण भातकांडे, डॉ. कृष्णा वड्डेबैलकर, डॉ. नामदेव शिवाप्पाचे यांना मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.देशभरात कोरोनाच्या महामारीमुळे सामान्य जनतेला मृत्यूशी झुंज द्यावी लागली. या काळात खानापूर तालुक्याच्या दुर्गम …

Read More »

जांबोटी सोसायटीच्यावतीने अंकिता सलामचा सत्कार

खानापूर (प्रतिनिधी) : तळावडे (ता. खानापूर) येथील प्राथमिक मराठी शाळेची विद्यार्थिनी कु. अंकिता सलाम हिने केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयामार्फत घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवले याबद्दल जांबोटी मल्टीपर्पज सोसायटीचे अध्यक्ष विलास बेळगावकर, उपाध्यक्ष पुंडलिक नाकाडी, सामाजिक कार्यकर्ते भैरू वाघू पाटील, ग्रामपंचायत सदस्य हणमंत कोदाळकर, दिलीप हन्नूरकर यांच्या वतीने सत्कार …

Read More »

कोरोना रुग्णांच्या रुग्णांच्या प्रदीर्घ सेवेनंतर मराठा मंदिरातील कार्यक्रम पूर्ववत सुरू

बेळगाव : बेळगाव शहर आणि परिसरात वाढलेले कोरोना रुग्ण लक्षात घेऊन महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने मराठा मंदिरच्या सहकार्याने मराठा मंदिर आवारात सुरू करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल झालेले अनेक रुग्ण विनामूल्य बरे झाले आणि आम्ही सामाजिक कार्यातही अग्रेसर आहोत हे मराठा मंदिरने दाखवून दिले. रुग्णांच्या प्रदीर्घ सेवेनंतर गेल्या पंधरा दिवसापासून …

Read More »

कोल्हापूर जिल्हा परिषद काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ताब्यात

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे राहुल पाटील यांची तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जयवंत शिंपी यांची उपाध्यक्षपदी आज (सोमवार) बिनविरोध निवड झाली. ही निवड बिनविरोध करण्यात महाविकास आघाडीला यश आले. भाजपाने निवडणूक लढवण्याची तयारी केली होती; मात्र ऐनवेळी माघार घेतली. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असणाऱ्या नाट्यमय घडामोडींमुळे या निवडणुकीची उत्सुकता …

Read More »

खानापूर तालुक्यातील शाळा इमारतीची दुरूस्ती, शिक्षकांची नियुक्ती करा

जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना खानापूर युवा समितीच्यावतीने निवेदनखानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका हा अतिपावसाचा तालुका व मुसळधार पाऊस पडणार तालुका आहे. तालुक्याच्या दुर्गम भागात अनेक शाळा इमारतीची दुरूवस्था झाली आहे. अनेक शाळा इमारतीची पडझड झाली आहे. काही ठिकाणी नविन शाळा इमारतीचे काम संथगतीने चालू आहे. तर काही ठिकाणी शाळा इमारतीचे काम बंद …

Read More »

बेळ्ळारी नाल्यामुळे खरवडून गेलेल्या ‘त्या’ शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई

बेळगाव : पावसाळाच्या सुरुवातीला बेळगाव शहरात अतिवृष्टी होऊन अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी खरवडून निघाल्या होत्या. त्या अनुषंगाने खरवडलेल्या जमिनीसाठी मोबदला शासनाकडून मिळणार होता. मात्र या मदतीमधून काही शेतकऱ्यांची कागदपत्रे व्यवस्थित नसल्यामुळे शासकीय मदतीपासून वंचित होते. मात्र आता या शेतकऱ्यांना देखील मोबदला मिळणार आहे. बेळगाव शेतकरी संघटनेमुळे शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. बेळगाव …

Read More »

भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या धाबा मालकाचा खून

बेळगाव (प्रतिनिधी) : पुणे-बंगलोर महामार्गावरील एम. के. हुबळी येथे धाबा चालवणाऱ्या एका युवकाची हत्या झाली आहे. दोन गटातील भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या या धाबा मालकावर हल्ला झाल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. प्रकाश नागनुर (वय 38) असे त्याचे नाव आहे. या घटनेमध्ये कित्तूर पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंद केला असून पुढील तपास सुरू आहे. …

Read More »

कुस्तीगीर संघटनेच्यावतीने तिर्थकुंडेत पैलवानाचा सत्कार

खानापूर (प्रतिनिधी) : तालुक्यातील कुस्तीगीर संघटनेच्यावतीने कोरोनाच्या महामारीत गेल्या दोन वर्षापासुन कुठेच कुस्तीचा आखाडाच झाला नाही. अशाने कुस्तीपटूनाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. कुस्तीपटूना खुराक मिळण्याचीही समस्या निर्माण झाली. आर्थिक संकट आल्याने त्यांना मदत व्हावी. यासाठी खानापूर तालुका कुस्तीगीर संघटनेचावतीने तिर्थकुंडेत (ता. खानापूर) येथे खुराक किट व प्रमाणपत्र देऊन कुस्तीपटूचा …

Read More »

डेंगू, चिकूनगुनिया लसीकरणाला गर्लगुंजीत सुरूवात

खानापूर : यंदाही गर्लगुंजी (ता. खानापूर) येथील मारूती मंदिरात डेंगू चिकूनगुनिया लसीकरण पार पडले. यावेळी ग्राम पंचायत सदस्य आणि सामजिक कार्यकर्ते प्रसाद पाटील यांच्याहस्ते मोहिमेला प्रारंभ झाला. गावातील युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. गेल्या वर्षी आणि यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून आर्सेनिक अल्बम 300 या गोळ्यांचे वितरण त्यांचबरोबर …

Read More »